राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नववीच्या वर्गात असल्यापासूनच विद्यार्थ्यांना व्यवसायाचे धडे देण्याच्या निर्णयाचं कौतुक होत आहे. इयत्ता ९ व्हीच्या विद्यार्थ्यांच्या सामाजिक विज्ञानाच्या पुस्तकात विद्यार्थ्यांसाठी स्टार्टअप्स आणि उद्योजकतेवर नवीन धडा सुरु करण्यात आला आहे. NCERT च्या नववीच्या 'अंडरस्टँडिंग सोसायटी : इंडिया अँड बियॉन्ड - पार्ट २' या समाजशास्त्राच्या पुस्तकात आता 'फ्रॉम आयडियाज टू स्टार्टअप्स' या धड्याद्वारे विद्यार्थ्यांना उद्योजकता आणि स्टार्टअप्सच्या जगाची ओळख करून देईल.
यामध्ये विद्यार्थ्यांना व्यावसायिक संधी, बाजारपेठ, व्यवसाय नियोजन, भारताची स्टार्टअप परिसंस्था आणि व्यावसायिक निर्णयप्रक्रियेत AI ची भूमिका यावर भारतीय उद्योजकांच्या खऱ्या गोष्टींमधून, अनुभवातून प्रकाश टाकण्यात आला आहे. या प्रकरणात तीन प्रश्न आहेत. ज्याच्या उत्तरांभोवती हे संपूर्ण प्रकरण आहे. १)उद्योजकतेचा समाज आणि अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होतो? २) व्यवसायाची मुख्य कार्यात्मक क्षेत्रे कोणती? ३) एक प्रभावी व्यवसाय योजना कशी तयार केली जाते.
नवी दिल्ली: पुरूष हॉकी स्पर्धेत भारत आणि मलेशिया यांच्यात एशियन गेम्स 2026 स्पर्धेचा अंतिम सामना रंगला. भारताने मलेशियाला 5-1 गोलने पराभवाची धूळ चारून ...
त्यासोबतच या पुस्तकात AI ला सुद्धा महत्त्व दिले आहे. बाजारपेठेचे विश्लेषण आणि व्यवसायाशी संबंधित निर्णयप्रक्रियेत AI ची मदत कशी होऊ शकते, AI चा वापर कसा होऊ शकतो, हे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच या पुस्तकात विविध स्टार्टअप्सची सुरुवात कशी झाली, प्रसिद्ध कंपन्या कशा नावारूपाला आल्या तसेच उद्योजकांचे अनुभवसुद्धा मांडले आहेत. जेणेकरून विद्यार्थ्यांना हा विषय अधिक जवळचा वाटेल. सात गृहिणींनी मिळून ८० रुपये जमा करून सुरू झालेल्या 'लिज्जत पापड' आणि हॉटेल व्यावसायिक मोहन सिंग ओबेरॉय यांच्या व्यावसायिक प्रवासासारख्या उदाहरणांद्वारे उद्योजकतेचा शोध घेते. भारतातील वेगवेगळ्या कंपनीच्या गोष्टींमुळे हे प्रकरण अधिकच महत्त्वाचं बनलं आहे.
त्यासोबतच या पुस्तकात विद्यार्थ्यांना शासन, वैयक्तिक वित्त, आयकर आणि उद्योजकता यांसारख्या विषयांची ओळख केलेली आहे. नागरिक, संस्था आणि व्यवसाय समाज आणि आर्थिक विकासात कसे योगदान देतात, हे स्पष्ट करण्यासाठी या पुस्तकात ऐतिहासिक उदाहरणे, सरकारी धोरणे आणि भारतीय व्यावसायिक केस स्टडीजचा वापर केला आहे. वैयक्तिक वित्तावरील एक प्रकरण विद्यार्थ्यांना नवीन करप्रणालीनुसार आयकर स्लॅब कसे काम करतात, त्यासोबत सोडवलेली आकडेमोड आणि सार्वजनिक सेवांच्या निधीमध्ये करांची भूमिका शिकवते. या पाठ्यपुस्तकात भारताची युनिकॉर्न इकोसिस्टम आणि ई-कॉमर्स, फिनटेक, आरोग्यसेवा व ॲग्रीटेक यांसारख्या क्षेत्रांवरही चर्चा केली आहे.