Asian Games 2026: भारतीय हॉकी संघाने नागोयात रचला इतिहास; सुवर्णपदकासह 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकचे तिकीट कन्फर्म

नवी दिल्ली: पुरूष हॉकी स्पर्धेत भारत आणि मलेशिया यांच्यात एशियन गेम्स 2026 स्पर्धेचा अंतिम सामना रंगला. भारताने मलेशियाला 5-1 गोलने पराभवाची धूळ चारून सुवर्ण पदकावर नाव कोरलं. यासह भारताने सलग दुसऱ्या एशियन गेम्स स्पर्धेत जेतेपदाला गवसणी घातली आहे. यापूर्वी असं कधीच घडलं नव्हतं.



या सामन्यात पहिल्या क्वॉर्टरपासून चुरशीची लढाई पाहायला मिळाली. 12व्या मिनिटाला भारताने एक गोलची आघाडी घेतली. भारतीय संघाला मिळालेला पेनाल्टी कॉर्नर पंचांनी पुन्हा घेण्याची परवानगी दिली. या सुवर्णसंधीचा पुरेपूर फायदा घेत कर्णधार हरमनप्रीत सिंगने अप्रतिम आणि अचूक ड्रॅगफ्लिकद्वारे चेंडू गोलपोस्टमध्ये धाडला. या गोलसह भारताला 1-0 अशी शानदार सुरुवात मिळाली. पण पुढच्या मिनिटाला भ्रमनिरास झाला. भारताने आघाडी घेतल्यानंतर अवघ्या एकाच मिनिटात मलेशियाने सामन्यात पुनरागमन केले. मैदानाबहेरील बाजूने मारलेला एक लांब पल्ल्याचा शॉट भारतीय गोलकीपर सूरज करकेराकडून जज करण्यात मोठी चूक झाली आणि चेंडू गोल लाईन ओलांडून आत गेला. या गोलमुळे सामना 1-1 अशा बरोबरीत आला.


दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने आक्रमक चढाया वाढवल्या, ज्याचा फायदा म्हणून भारताला आणखी एक पेनाल्टी कॉर्नर मिळाला. 24व्या मिनिटाला जुगराज सिंगने गोल मारला. ड्रॅगफ्लिक घेण्यासाठी अमित रोहिदाससोबत जुगराज सिंग सज्ज झाला. जुगराजने कोणताही दबाव न घेता अत्यंत शांत डोक्याने आणि ताकदीने चेंडू मलेशियाच्या गोलपोस्टमध्ये धाडला आणि भारताला सामन्यात 2-1 अशी पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली.



सामन्याच्या तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताला आणखी एक पेनाल्टी कॉर्नर मिळाला. कर्णधार हरमनप्रीत सिंगने शॉट मारला, पण त्याला थेट गोल करता आला नाही. त्यानंतर मैदानावर कमालीचा ड्रामा पाहायला मिळाला. पंचांनी हा पेनाल्टी कॉर्नर पुन्हा घेण्याचा निर्णय दिला, ज्याच्या विरोधात मलेशियाने रिव्ह्यू घेतला. रिव्ह्यू नंतर पंचांनी निर्णय बदलून तो 'लाँग कॉर्नर' केला. हार्दिक सिंगने 41व्या मिनिटाला गोल मारला.


सामन्याच्या अंतिम क्षणांमध्ये भारतीय संघाने मलेशियाच्या संरक्षणाची पूर्णपणे दाणादाण उडवली. 54 व्या मिनिटाला भारताचा स्टार फॉरवर्ड अभिषेकने मलेशियाच्या डिफेंडर्सना चकवत गोलपोस्टच्या अगदी जवळ असलेल्या शिलानंद लाक्राकडे अचूक पास दिला. शिलानंदने योग्य वेळी योग्य ठिकाणी उपस्थित राहत या उत्कृष्ट चालीचा सुरेख शेवट केला. यासह भारताला 4-1 अशी मजबूत मिळाली. हरमनप्रीत कौरने पेनल्टी कॉर्नरच्या माध्यमातून 57व्या मिनिटाला आणखी गोल मिळवून देत 5-1 अशी आघाडी मिळवून विजय निश्चित केला.





  • एशियन गेम्स 2026 स्पर्धेत भारताच्या पुरुष हॉकी संघाने मलेशियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात सुवर्ण पदक जिंकले आहे. यामुळे भारतीय हॉकीच्या इतिहासात अनेक मोठे आणि अभूतपूर्व जागतिक विक्रम नोंदवण्यात आले आहे.

  • इतिहासात पहिल्यांदाच सलग सुवर्ण पदकावर बाजी मारली आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाने यापूर्वी 1966, 1998, 2014 आणि 2023 मध्ये एशियन गेम्समध्ये सुवर्ण पदके जिंकली आहेत. मात्र, भारताला इतिहासात कधीही सलग दोन एशियन गेम्समध्ये सुवर्ण पदक जिंकता आले नव्हते. 2026 मध्ये विजय मिळवल्यानंतर भारत पहिल्यांदाच आपले विजेतेपद राखण्यात यशस्वी ठरला आहे.

  • एशियन गेम्समध्ये हरमनप्रीत सिंगने दोन वेळा सुवर्ण पदक जिंकवणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. कर्णधार हरमनप्रीत सिंग याने 2023 (हांगझोऊ) आणि आता 2026 (नागोया) या दोन्ही स्पर्धांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. एशियन गेम्सच्या इतिहासात भारतीय हॉकी संघाने सलग दोनवेळा सुवर्ण पदके जिंकले.

  • मनप्रीत सिंगने वैयक्तिक पातळी महाविक्रम केला आहे. भारताचा सर्वात अनुभवी खेळाडू मनप्रीत सिंगकडे पाहिले जाते. मनप्रीत सिंग 2014 (इंचेऑन), 2023 (हांगझोऊ) आणि 2026 (नागोया) अशा तीन सामन्यांवेळी सुवर्ण पदक विजेत्या संघांचा भाग होता. एशियन गेम्सच्या इतिहासात 3 सुवर्ण पदके जिंकणारा तो एकमेव आणि पहिला भारतीय हॉकी खेळाडू ठरला आहे.

  • दक्षिण कोरियाला मागे टाकत भारताने आपले दुसरे स्थान भक्कम केले आहे. पुरुष हॉकीमध्ये आतापर्यंत पाकिस्तानने सर्वाधिक 8 वेळा सुवर्ण पदक जिंकले आहे. भारत आणि दक्षिण कोरिया हे दोन्ही देश प्रत्येकी 4 सुवर्ण पदकांसह संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहेत. 2026 मध्ये मिळवलेल्या विजयामुळे भारताच्या सुवर्ण पदकांची संख्या 5 पर्यंत गेली आहे. भारताने दक्षिण कोरियाला मागे टाकून एशियन गेम्स हॉकीच्या इतिहासात दुसरा सर्वात यशस्वी संघ बनला आहे.

  • लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028 साठी भारतीय संघ पात्र झाला आहे. या सुवर्ण पदकाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे भारतीय संघाला कोणत्याही पात्रता फेऱ्या न खेळता 2028 च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिक खेळांसाठी थेट तिकीट मिळालं आहे.

Comments
Add Comment

Washington Sundar Catch: वॉशिंग्टन सुंदरचा 'तो' खतरनाक झेल...पाकिस्तानच्या माझ सदाकतला धूळ चारली

एशियन गेम्स 2026 च्या अंतिम फेरीत भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवला. जपानमधील निशिन येथील कोरोगी स्पोर्ट्स पार्क

Asian Games 2026 : कुस्तीत अमन सहरावतचा ऐतिहासिक पराक्रम! उत्तर कोरियाच्या मल्लाला लोळवत भारताला मिळवून दिले २० वे सुवर्ण पदक

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारतीय पैलवान अमन सहरावत (Aman Sehrawat) याने ६-७ अशा पिछाडीवर असताना अत्यंत

IND vs WI, 3rd ODI: रोहित शर्माचं वेस्ट इंडिजविरुद्ध शतक हुकलं, पण नोंदवला असा विक्रम

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तिसरा वनडे सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर भारताने प्रथम

IND vs WI 3rd ODI: बाबर आझमचा जागतिक विक्रम मोडण्याची शुभमन गिलची सुवर्णसंधी हुकली, झालं असं की..

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका भारताने 2-0 ने आधीच जिंकली आहे. त्यामुळे तिसरा वनडे

Asian Games 2026 स्पर्धेत भारताने पाकिस्तानला चिरडलं, सलग दुसऱ्यांदा गोल्डवर कोरलं नाव

एशियन गेम्स 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत झाली. या सामन्यात भारताने पाकिस्तान नमवत

Asian Games 2026: गोल्फ स्पर्धेत भारताची ऐतिहासिक कामगिरी, प्रणवीने गोल्ड मिळवून रचला इतिहास

एशियन गेम्स 2026 स्पर्धेचा शेवटचा टप्पा सुरू असताना भारतीय स्पर्धकांनी मोठी झेप घेतली आहे. धडाधड गोल्ड मेडल मिळवून