व्हॉट्सॲप बिझनेसचे दर बदलले! जाणून घ्या तुमच्या खिशावर याचा परिणाम होणार का?

१ ऑक्टोबर २०२६ पासून मेटाने व्हॉट्सॲप बिझनेस प्लॅटफॉर्मच्या दरात बदल केला आहे. यानुसार, मासिक मर्यादेपलीकडील मोफत सेवा बंद करण्यात आली आहे आणि २४ तासांच्या आत पाठवलेल्या युटिलिटी मेसेजेसाठी शुल्क आकारले जात आहे. यामुळे आता भारतातील व्हॉट्सॲप बिझनेस वापरणाऱ्या लहान विक्रेत्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. आम्हाला देखील स्वतःच्या फोनवरून टाईप केलेल्या उत्तरांसाठी पैसे मोजावे लागणार का? असा प्रश्न पडला आहे. हा गोंधळ निर्माण होण्याचं कारण म्हणजे दुकानदार वापरत असलेल्या मोफत ॲपसाठी आणि मोठ्या कंपन्या सॉफ्टवेअरद्वारे वापरत असलेल्या सशुल्क प्लॅटफॉर्मसाठी दोन्हींसाठी 'व्हॉट्सॲप बिझनेस' हेच नाव वापरले जाते. यामुळे या दोन्ही प्लॅटफॉर्ममधील फरक काय आहे आणि मेटा कशासाठी शुल्क आकारते हे समजून घेणं महत्त्वाचं आहे.


भारतात १ ऑक्टोबरपासून दरमहा १००० मोफत संदेशांपेक्षा जास्त संदेशांसाठी प्रत्येकी ०.११५ रुपये इतके शुल्क आकारले जाईल, तसेच २४ तासांच्या कालावधीत पाठवलेल्या युटिलिटी मेसेजसाठी प्रति संदेश ०.११५ रुपये आकारले जातील. परंतु, हे बदल फक्त व्हॉट्सॲप बिझनेस प्लॅटफॉर्म (API) ला लागू होतो, जे बिझनेस सोल्युशन प्रोव्हायडर्स किंवा थेट इंटिग्रेशनद्वारे वापरले जाते. मोफत व्हॉट्सॲप बिझनेस वापरणाऱ्या व्यवसायिकेला हे लागू होत नाही. जर तुम्ही स्वतः प्रतिसाद पाठवत असाल तर शुल्क लागू होत नाही. पण जर एखादा प्रोव्हायडर किंवा chatbot तुमच्याकडून प्रतिसाद देत असेल तर शुल्क आकारले जाईल. भारतात मार्केटिंग संदेशांसाठी प्रति वितरित संदेश शुल्क ₹0.8631 इतकेच आहे, आणि क्लिक-टू-व्हॉट्सॲप जाहिरातीपासून सुरू होणारे संभाषण विनामूल्य आहे.



मेटा बिझनेस एजंटद्वारे संदेश पाठवला जात असेल तर प्रति लाख १० टोकन्स $च्या दराने बिल आकारले जाईल. हा नियम १ ऑगस्ट २०२६ पासून लागू करण्यात आला आहे. जर नवीन शुल्क लागू झाल्या नंतर मोबाईलमध्ये पेमेंट पद्धत नसेल तर ही सेवा बंद केली जाईल, असे मेटाने स्पष्ट केले आहे. तर सामान्य ग्राहक वापरत असलेले मेटा बिझनेस व्हॉट्सॲप हे मोफत आहे. यामध्ये एक बिझनेस प्रोफाइल, एक कॅटलॉग आणि त्वरित प्रतिसाद देण्याची सोय आहे. यामध्ये प्रत्येक प्रतिसाद हा व्यक्तीकडून पाठवला जात असल्याने त्यावर शुल्क आकारले जात नाही.


Comments
Add Comment

Nagpur Water Cut: नागपूर शहरात मंगळवारी पाणीपुरवठा बंद, कोणत्या भागांना बसणारा फटका? वाचा यादी

नागपूर: नागपूर शहरामध्ये काही परिसरांमध्ये येत्या आठवड्यात पाणी पुरवठा बंद असणार आहे. शहराला पाणी पुरवठा केल्या

आपण कॉकरोच नाही पँथर आहोत, कॉकरोचवाल्यांची मगरुरी चांगली नाही - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

रिपब्लिकन पक्ष हा संघर्ष करणारा पक्ष आहे. सामाजिक न्यायाची लढाई लढणारा पक्ष आहे. आपण सत्तेत जरुर आहोत, पण अन्याय

'गर्जना मोर्चा नव्हे ही तर कोल्हेकुई' - ॲड. आशिष शेलारांचा विरोधकांवर हल्लाबोल

निवडणुकीत विजय मिळाला तर ईव्हीएम आणि निवडणूक आयोग योग्य, मात्र पराभव झाला की त्याच निवडणूक आयोगावर आणि

'महिला शेतकरी सक्षमीकरण कायदा २०२६': शेतात राबणाऱ्या हातांना मिळाला 'शेतकरी' म्हणून कायदेशीर दर्जा

राज्य सरकारच्या वतीने महाराष्ट्रात महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने एक महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे. २

Tree Cutting : सिध्दार्थ नगरमधील इमारत पुनर्विकासात ३७ झाडे बाधित

तब्बल १७ कापणार, २० पुनर्रोपित करणार या बदल्यात ६८७ झाडे लावली जाणार आहे, या झाडांचे रोपण प्रकल्पाच्या ठिकाणी

BMC : मुंबईतील रस्ते पुन्हा टँकरच्या पाण्याने धुणार

मुंबईतील सातही परिमंडळांमध्ये टँकर सेवांसाठी कंत्राटदारांची नियुक्ती तब्बल १५०दिवसांसाठी आठ कोटींचा केला