Khatron Ke Khiladi 15 : खतरों के खिलाडी 15 या लोकप्रिय स्टंट रिअॅलिटी शोचा विजेता अखेर जाहीर झाला आहे. अभिनेता अविनाश मिश्रा याने या पर्वाची ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. अंतिम फेरीत अविनाशची ऋत्विक धनजानी आणि ओरी यांच्याशी स्पर्धा झाली. धाडसी स्टंटमध्ये दमदार कामगिरी करत अविनाशने दोघांनाही मागे टाकत विजेतेपद मिळवलं. ( Khatron Ke Khiladi 15)
विजयानंतर अविनाशला ट्रॉफीसोबत 20 लाख रुपयांची रोख रक्कम, युरोपला जाण्याची संधी आणि एक कार बक्षीस म्हणून मिळाली. या पर्वात सहभागी झालेल्या स्पर्धकांनाही बाईक देण्यात आली आहे. त्यामुळे अविनाशसाठी हा विजय आणखी खास ठरला आहे.
स्टार प्रवाह वाहिनीवरील नावाजलेली मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. गेले ११ महिने अनेक नाट्यमय वळणांमुळे, मालिकेतील कथानकांमुळे लोकप्रिय झालेली ...
विजयानंतर आपल्या भावना व्यक्त करताना अविनाशने सांगितलं की, हा शो त्याच्यासाठी केवळ इतर स्पर्धकांना हरवण्याचा किंवा स्वतःची ताकद दाखवण्याचा प्रवास नव्हता. या शोदरम्यान त्याला स्वतःचीच ओळख नव्याने झाली. आतापर्यंत त्याला टीव्ही अभिनेता आणि त्याच्या लूकसाठी ओळखलं जात होतं. मात्र, स्टंटच्या माध्यमातून त्याला स्वतःमधील वेगळी क्षमता दाखवता आली.
well deserved avinash mishra my favourite❤️
@Avinash_galaxy https://t.co/Xg3f5y0UTj — Sumit Singh (@SumitSingh7781) October 4, 2026
अविनाशच्या या प्रवासाची सुरुवातही चांगली झाली होती. टीम वीकदरम्यान त्याने अनेक कठीण स्टंट पूर्ण केले. त्याच्या कामगिरीमुळे त्याला रोहित शेट्टीचं फिअर जॅकेट मिळालं. त्यानंतर पाण्याखालील एका कठीण स्टंटमध्ये त्याची करण वाहीसोबत स्पर्धा झाली. या स्टंटमध्ये अविनाशने बाजी मारत टॉप 5 मध्ये स्थान मिळवलं आणि फायनलमध्ये पोहोचणारा पहिला स्पर्धक ठरला.
फायनलपर्यंत पोहोचताना अविनाशने सातत्याने चांगली कामगिरी केली. शारीरिक ताकदीसोबतच त्याने भीतीवर नियंत्रण ठेवत अनेक आव्हानं पूर्ण केली. अखेर अंतिम स्टंटमध्येही त्याने दमदार कामगिरी केली आणि खतरों के खिलाडी 15 ची ट्रॉफी जिंकली. या विजयानंतर अविनाशच्या चाहत्यांमध्येही आनंदाचं वातावरण आहे.





