
मुंबई : घरातील जबाबदाऱ्या सांभाळताना कुटुंबासाठी सतत धडपडणारी स्त्री स्वतःच्या सुरक्षिततेसाठी, अस्तित्वासाठी आणि स्वाभिमानासाठी किती संघर्ष करते? अन्याय सहन करणं हीच तिची नियती असते की त्याविरोधात आवाज उठवण्याची ताकदही तिच्यात असते? स्त्रीच्या याच संघर्षाची आणि तिच्यातील दुर्गेच्या रूपाची दमदार कथा झी स्टुडिओजच्या आगामी ‘जिजाई’ या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येत आहे. अभिनेत्री रिंकू राजगुरू या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत असून, तिचा आजवर न पाहिलेला अॅक्शन अवतार प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.
रायझिंग स्टार्स आशिया कप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात भारताने आपला विजयी ठसा उमटवला. नेपाळने नाणेफेकीचा कौल जिंकल्याने भारताच्या वाटेला प्रथम ...
View this post on Instagram
या चित्रपटात रिंकू राजगुरूसोबत किशोर कदम, मयूर मोरे, रोहित कोकाटे आणि सानिका दिवाण हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये झळकणार आहेत. त्यामुळे चित्रपटातील व्यक्तिरेखांचे परस्परसंबंध, कथानकातील अनपेक्षित वळणं आणि थरारक घडामोडी प्रेक्षकांसाठी खास आकर्षण ठरणार आहेत.झी स्टुडिओजची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन तृशांत फुलवंती इंगळे यांनी केले आहे. झी स्टुडिओज आणि कोकोनट फिल्म्स यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून नुपूर गुहा आणि तुषार राऊत सहनिर्माते आहेत. गुलराज सिंग यांचे संगीत लाभलेल्या या चित्रपटातील गाण्यांनाही प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे.
स्त्रीच्या अस्तित्वाचा, स्वाभिमानाचा आणि अन्यायाविरोधात उभं राहण्याच्या तिच्या सामर्थ्याचा वेध घेणारा ‘जिजाई’ २० नोव्हेंबरपासून चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा प्रीमियर सोहळा दिमाखात पार पडला. यावेळी अभिनेते मकरंद देशपांडे, शिव ठाकरे, शिवराज वायचळ, सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांच्यासह मनोरंजनविश्वातील अनेक मान्यवर उपस्थित होते.





