Monday, October 5, 2026

असं कसं झालं! गोलंदाजाने टाकलेला बॉल एक टप्पा घेत थेट षटकार, पण मिळाल्या 5 धावा Video पाहा

असं कसं झालं! गोलंदाजाने टाकलेला बॉल एक टप्पा घेत थेट षटकार, पण मिळाल्या 5 धावा Video पाहा
क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये विक्रम रचणं आणि मोडणं, हे काय नवीन राहिलेलं नाही. आजवर अनेक विक्रम रचले गेले आणि ते मोडलेही जात आहेत. त्यामुळे विक्रमांबाबत क्रीडाप्रेमींमध्ये चर्चाही रंगतात. इतकंच काय तर मैदानातील काही घटना आश्चर्यकारक असतात. त्या घटना क्रीडाप्रेमींच्या कायम स्मरणात राहतात. अशीच एक घटना क्रिकेटच्या मैदानात घडली आहे. फलंदाजाने काहीही मेहनत न घेता संघाच्या खात्यात फुकटच्या धावा आल्या आहेत. असं कॅनडा सुपर 60 लीग स्पर्धेत घडलं. 5 ऑक्टोबरला टोरंटो सिक्सर्स आणि मिसीसौगा मास्टर्स यांच्यात लढत झाली. या लढतीत गोलंदाजाने एक बाउंसर चेंडू टाकला आणि थेट सीमापार गेला. विकेटकीपरने उंच उडी घेऊनही काही एक उपयोग झाला नाही. चेंडू त्याच्या कितीतरी वरून गेला तो थेट सीमापार...

नेमकं काय झालं या सामन्यात?

टोरंटो सिक्सर्सने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 130 धावा केल्या होत्या. तर मिसीसौगा मास्टर्सचा डाव अवघ्या 121 धाावंवर आटोपला. टोरंटो सिक्सर्सने हा सामना जिंकला पण उपांत्य फेरीच्या सामन्यात अली खानने टाकलेला चेंडू कायम लक्षात राहील. कारण त्याने टाकलेला चेंडू एक टप्पा घेत थेट सीमापार गेला. टोरंटो सिक्सर्स संघ फलंदाजी करत असताना 9व्या षटकात हा प्रकार घडला. अली खान गोलंदाजी करत होता आणि समोर किरोन पोलार्ड होता. अली खानने बाउंसर टाकण्यासाठी जोरात चेंडू टाकला. पण हा चेंडू टप्पा खाऊन थेट सीमापार गेला. फलंदाज आणि विकेटकीपरला हा चेंडू पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. हा चेंडू सीमेपार जाताच समालोचकांनी वाइड षटकार असल्याचं सांगितलं. पण टोरंटो सिक्सर्सच्या खात्यात फक्त 5 धावा आल्या.

टोरंटो सिक्सर्सला फक्त 5 धावा मिळाल्या कारण...

एमसीसीच्या नियमानुसार, कोणत्याही संघाला सहा धावा तेव्हाच दिल्या जातात, जेव्हा चेंडू बॅटला लागून गेला असेल. या प्रकारात फलंदाजाची बॅट काही बॉलला लागली नाही. त्यामुळे मैदानी पंचांनी फलंदाजाला 5 धावा दिल्या. कॅनडा सुपर 60 लीग स्पर्धेत एका डावात 10 षटकं असतात. त्यामुळे या स्पर्धेचा उपांत्य आणि अंतिम फेरीचा सामना एकाच दिवशी खेळला गेला. सिक्सरने उपांत्य फेरीत मास्टर्सला 9 धावांनी पराभूत केलं. तर अंतिम फेरीत वँकूवर अँकर्सला नमवत जेतेपदावर नाव कोरलं. अँकर्सने सिक्सर्ससमोर विजयासाठी 164 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान सिक्सर्सने 5 गडी राखून पूर्ण केलं.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >