मुंबई: विधान परिषदेच्या पुणे शिक्षक मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीतील तिढा अद्याप कायम असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यामुळे स्पष्ट झाले आहे. भाजपने या मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी जाहीर केली असतानाच शिवसेनेने मंगेश चिवटे यांना पक्षाचा एबी फॉर्म देऊन त्यांची उमेदवारी कायम ठेवली आहे. पुणे शिक्षक मतदारसंघाच्या जागेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासोबत चर्चा झाली होती. या चर्चेत पुणे शिक्षक मतदारसंघाची जागा शिवसेना लढवेल आणि मंगेश चिवटे हे पक्षाचे उमेदवार असतील, अशी भूमिका ठरल्याचे शिंदे यांनी सोमवारी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर दिल्लीत पत्रकारांशी बोलताना शिंदे यांनी विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारीबाबत महायुतीत चर्चा सुरू असल्याचे सांगितले. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून मंगळवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. त्यानंतर अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया होणार असल्याने या कालावधीत महायुतीमध्ये आणखी चर्चा होईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. ‘‘मी सध्या दिल्लीत आहे. महाराष्ट्राचे विषय आम्ही आमच्या पातळीवर सोडवू. अजून वेळ आहे, प्रक्रिया सुरू आहे,’’ असे त्यांनी सांगितले.
मुंबई: राज्यातील दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर टंचाईग्रस्त भागांमध्ये तातडीच्या उपाययोजना करण्यासाठी आमदार स्थानिक विकास निधीतून 25 लाख ...
दुष्काळावर पंतप्रधान मोदींशी चर्चा
शिंदे यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या भेटीचीही माहिती दिली. महाराष्ट्रातील दुष्काळाच्या परिस्थितीवर या भेटीत सविस्तर चर्चा झाली. पिण्याचे पाणी, चाऱ्याची उपलब्धता आणि पिकांचे नुकसान याबाबत मोदी यांनी माहिती घेतली. राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले असून केंद्र सरकारही त्यांच्या पाठिशी असल्याचे मोदी यांनी सांगितल्याचे शिंदे यांनी नमूद केले. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्राचे पथक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सर्वेक्षण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा आहे. तो संकटात असताना आम्ही हात आखडता घेणार नाही. शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही,’ असे आश्वासन शिंदे यांनी दिले.
मुंबई: युवा संघटन अधिक बळकट करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने सोमवारी युवा मोर्चाची नवी प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण ...
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारावर योग्य वेळी निर्णय
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा झाली का, या प्रश्नावर शिंदे यांनी या निर्णयाचा अधिकार पंतप्रधानांकडे असल्याचे सांगितले. ‘‘एनडीएचे प्रमुख पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. निर्णय घेण्याचे अधिकार त्यांनाच आहेत. ते योग्य वेळी निर्णय घेतील,’’ असे ते म्हणाले.
- दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्तारात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दोन मंत्रिपदे मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या दोन जागांसाठी खासदार श्रीकांत शिंदे आणि उबाठा गटातून शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेले खासदार बंडू जाधव यांच्या नावांची चर्चा असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे. यापूर्वी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नावाचीही मंत्रिपदासाठी चर्चा होती.