Flydubai Incident : फ्लायदुबईच्या FZ1073 विमानातील धक्कादायक घटनेच्या तपासात नवनवीन माहिती समोर येत आहे. दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या या विमानात ओमानी सहवैमानिक पायलट हम्माम अल हम्मामीने भारतीय कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर हल्ला करून विमानाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. UAE अधिकाऱ्यांनी या घटनेला दहशतवादी कृत्याचा प्रयत्न म्हटले आहे.
जुलै महिन्यातच हल्ला घडवून आणणार होतो पण...
दरम्यान, युएई आणि सऊदी अरेबियातील एजन्सींकडून ओमानच्या पायलटची चाैकशी केली जात आहे. ओमानच्या पायलटला विचारण्यात आले की, त्याने फ्लायदुबईचे विमानच का निवडले? त्यावर त्याने म्हटले की, मी सर्वकाही माहिती घेतली की, इस्त्रायलच्या तेल अवीवला सरळ कोणते विमान जाते. त्यामुळे मी फ्लायदुबईची निवड केली. मी या एअरलाईन्समध्ये नोकरी करण्यापूर्वीच सर्व कट रचला होता. हा कट अगोदरपासूनच माझ्या डोक्यात होता.मागच्या काही महिन्यात मी बऱ्याचदा गुरियन एअरपोर्टला आलो. जूनमध्ये इस्त्रायलला आलो. मी त्यावेळी सर्व गुप्त माहिती घेत होतो. मी नक्शाही तयार केला. जुलै महिन्यातच मी हा हल्ला घडवून आणणार होतो. पण त्यावेळी विमानात असलेल्या क्रू मेंबरमध्ये माझा जवळचा मित्र होता. ज्यामुळे मी ऐनवेळी प्लान बदलला.
मुंबई : सणासुदीच्या काळात विमानाने प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या खर्चात आता वाढ होण्याची शक्यता आहे. देशातील मोठ्या विमान कंपन्यांपैकी एक ...
काय घडलं होतं ?
३० सप्टेंबर रोजी FZ1073 हे विमान दुबईहून तेल अवीवच्या दिशेने रवाना झाले होते. प्रवासादरम्यान कॉकपिटमध्ये कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर ओमानी सहवैमानिक हम्माम अल-हम्मामी याने अचानकपणे हल्ला केला. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, सहवैमानिकाने कॉकपिटमधील क्रॅश अॅक्सने कॅप्टन मच्छार यांच्यावर हल्ला केला आणि विमानाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर विमानाने आपत्कालीन परिस्थिती दर्शवणारे संकेत दिले घटनेदरम्यान विमान काही वेळात सुमारे १७ हजार फूट उंचीपर्यंत खाली आले. मात्र, गंभीर जखमी असूनही कॅप्टन स्मित मच्छार यांनी कॉकपिटचा दरवाजा उघडण्यात यश मिळवले. त्यानंतर विमानातील इतर क्रू सदस्य आणि प्रवाशांनी हस्तक्षेप करून सहवैमानिकाला ताब्यात घेतले. विमान अखेर सौदी अरेबियातील ताबूक येथे आपत्कालीनरीत्या उतरवण्यात आले.
अनेक देशांकडून तपास सुरू
या प्रकरणाची चौकशी UAE आणि सौदी अरेबियातील यंत्रणांकडून सुरू आहे. ऑस्ट्रेलियन अधिकाऱ्यांनीही हम्माम अल-हम्मामीच्या ऑस्ट्रेलियाशी असलेल्या संबंधांचा तपास सुरू केला आहे. त्यामुळे FZ1073 प्रकरणाचा तपास आता आंतरराष्ट्रीय पातळीवरही पोहोचला आहे. कॅप्टन स्मित मच्छार यांच्या धाडसी कृतीमुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेनंतर इस्रायलने देशात येणाऱ्या परदेशी विमानांच्या वैमानिकांच्या सुरक्षा तपासणीबाबत नियम अधिक कडक करण्याची घोषणा केली आहे.





