Monday, October 5, 2026

भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची वनडे मालिका जिंकली, पण एक चूक महागात पडली; संपूर्ण संघाला भरावा लागला दंड

भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची वनडे मालिका जिंकली, पण एक चूक महागात पडली; संपूर्ण संघाला भरावा लागला दंड
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका पार पडली. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात भारताने विजय मिळवला होता. त्यामुळे ही मालिका भारताने खिशात घातली होती. मात्र तिसऱ्या वनडे सामन्यात भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. खरं तर हा सामना वेस्ट इंडिजने जिंकला असला तरी मालिकेवर भारताची पकड राहिली. भारताने तीन सामन्यांची वनडे मालिके 2-1 ने जिंकली, मात्र या विजयानंतर भारतीय संघाला फटका बसला आहे. आयसीसीने टीम इंडियाला दंड ठोठावला आहे. धीम्या गतीने षटकं टाकल्याने हा फटका बसला आहे. फक्त भारतीय संघच नाही तर वेस्ट इंडिज संघालाही या चुकीचा फटका बसला आहे. वेस्ट इंडिज संघाच्या सामना मानधनातून 10 टक्के रक्कम कापली गेली आहे.या संघाने दोन षटकं ठरलेल्या वेळेपेक्षा कमी टाकली. आयसीसीचे सामनाधिकारी प्रकाश भट्ट यांनी दोन्ही संघाला हा दंड ठोठावला आहे.

भारताने या षटकात किती षटकं कमी टाकली?

3 ऑक्टोबर 2026 रोजी भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तिसरा सामना खेळला गेला. हा सामना न्यू चंदीगडच्या मैदानात खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने ठरलेल्या वेळेत चार षटकं कमी टाकली. त्यामुळे आयसीसीने भारतीय संघावर 20 टक्के दंड ठोठावला आहे. भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांनी आपली चूक कबुल केली आहे. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी काही घेतली गेली नाही. स्लो ओव्हर रेटबाबतची तक्रार मैदानी पंच जयरामन मदनगोपाळ आणि सॅम नोगजस्की, तिसरे पंच शरफुद्दौला इब्ने शाहिद आणि चौथे पंच वीरेंद्र शर्मा यांनी केली होती. या तक्रारीनंतर दोन्ही संघांना दंड ठोठावला गेला आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा वनडे सामना ऐतिहासिक ठरला. या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी 352 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. हे लक्ष्य वेस्ट इंडिजने सहज गाठलं आणि मालिकेत क्लिन स्वीप मिळवण्यापासून वाचवलं. आता भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका होत आहे. या मालिकेला 6 ऑक्टोबरपासून सुरूवात होणार आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >