Nashik : नाशिक मनपाच्या बंद शाळा पुन्हा सुरू होणार, CSR फंडाचाही वापर

Nashik : नाशिक महानगरपालिका (Nashik Municipal Corporation) हद्दीतील बंद असलेल्या शाळांचे पुनरुज्जीवन करून त्या पुन्हा सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. आवश्यक दुरुस्ती, रंगरंगोटी आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यास मनपाच्या पाच ते सहा बंद शाळा तातडीने सुरू करता येतील, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे (Education Minister Dadaji Bhuse) यांनी व्यक्त केला. मंत्री भुसे यांनी नाशिक शहरातील पंचवटी येथील मनपा प्राथमिक शाळा क्रमांक ३०, सिडको येथील मनपा माध्यमिक शाळा आणि जेलरोड येथील मनपा शाळा क्रमांक ५६ या शाळांना भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी शाळांच्या सद्यस्थितीचा आढावा घेत प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या.



बंद शाळांचे वर्गीकरण करून तातडीने दुरुस्ती करा


महापालिका हद्दीतील सध्या बंद असलेल्या सर्व शाळांची पाहणी करून त्यांचे योग्य पद्धतीने वर्गीकरण करण्याच्या सूचना मंत्री भुसे यांनी दिल्या. ज्या शाळांच्या इमारती किंवा परिसरात दुरुस्तीची आवश्यकता आहे, तेथील कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. शाळा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या स्वच्छता, सुरक्षितता, वर्गखोल्या आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. शाळांमधील उपलब्ध शैक्षणिक साधने, वर्गखोल्या, इमारतींची स्थिती, पायाभूत सुविधा तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांचीही यावेळी माहिती घेण्यात आली.



मनपा शाळांमध्ये सेमी इंग्रजीचा पर्याय


पालकांमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे वाढता कल असल्याने मनपा शाळांमध्ये सेमी इंग्रजी माध्यम सुरू करण्याचा विचार असल्याचे भुसे यांनी सांगितले. त्यासाठी चांगले शिक्षक उपलब्ध करून देण्यासोबतच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी कला, क्रीडा आणि इतर उपक्रमांचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे.



CSR आणि शाळा दत्तक योजनेला प्राधान्य


मनपा शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारले जाऊ नये, असेही मंत्री भुसे यांनी स्पष्ट केले. शाळांच्या विकासासाठी काही संस्था किंवा कंपन्या CSR निधी देण्यास किंवा शाळा दत्तक घेण्यास इच्छुक असल्यास त्याला प्राधान्य दिले जाईल. मात्र, शाळांचा शैक्षणिक कामाव्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणासाठी वापर होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. शाळांच्या इमारती आणि परिसर आकर्षक करून विद्यार्थ्यांसाठी आनंददायी व सकारात्मक वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. त्यामुळे पालकांचा मनपा शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोनही सकारात्मक होण्यास मदत होईल, असे भुसे यांनी सांगितले.



आठवडाभरात सर्व शाळांचा अहवाल


बंद शाळा पुन्हा सुरू करण्यासोबतच विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी ठोस कृती आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नाशिकमधील सर्व मनपा शाळांचा अहवाल आठवडाभरात महापौरांसमोर सादर केला जाणार असल्याचेही मंत्री भुसे यांनी सांगितले. यावेळी महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे, अजय बोरस्ते, प्रवीण तिदमे यांच्यासह महापालिका प्रशासनातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून सतीश चव्हाण यांना पुन्हा उमेदवारी - उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा निर्णय

मुंबई : विधान परिषदेच्या मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून विद्यमान आमदार सतीश चव्हाण

मेगास्टार अनिल कपूर यांना एशियन अकादमी क्रिएटिव्ह अवॉर्ड्समध्ये 'सुभेदार' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार !

अनेक दशकांच्या विलक्षण कारकिर्दीनंतरही मेगास्टार अनिल कपूर हे त्यांच्या सिनेमॅटिक प्रवासात कायम चर्चेत असतात.

Nashik TCS Case : निदा खानसमोर नवं संकट ! गंभीर गुन्ह्यांत जामीन मिळाला, पण आता पतीने...

Nashik TCS Case : नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपनीतील तरुणी आणि तरुणाच्या धर्मांतर प्रकरणात आरोपी म्हणून नाव आलेल्या निदा

Nitesh Rane : आदित्य ठाकरे भारतात आहेत की देश सोडून गेले?

गर्जना मोर्चातील अनुपस्थितीवर मंत्री नितेश राणेंची टीका; पासपोर्ट जप्त करून लुकआऊट नोटीस काढण्याची

Nashik : हृदयद्रावक ! मेंढ्यांना पाणी पाजण्यासाठी गेले, अन् भयानक घडलं; मुलाला वाचवताना मामा-आजोबाचाही दुर्दैवी अंत

Nashik (Malegaon) : मेंढ्या धुण्यासाठी पाझर तलावात उतरलेल्या तीन मेंढपाळांचा खोल पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू

….चला,विहिर खोदूया!

सचिन धानजी आपल्याकडे एक म्हण आहे ‘तहान लागल्यानंतर विहिर खोदायची’… या उक्तीचा प्रत्यय सध्या तरी आपल्याला येत