पुरावे नष्ट करण्यासाठी AIची मदत
मुलीच्या मृत्यूची जाणीव झाल्यानंतर पुरुषोत्तम कदम यांनी काही वेळ विचार केला. पोलिसांपासून कसे वाचता येईल, याचा विचार करत असताना त्यांनी मोबाईलवर AI ची मदत घेण्याचा प्रयत्न केला. गुन्ह्याचा पुरावा कसा नष्ट करता येईल, असा प्रश्न त्यांनी AI ला विचारला. मात्र, गुन्ह्याशी संबंधित किंवा पुरावे नष्ट करण्यासाठी कोणतीही मदत करण्यास AI ने नकार दिला आणि पोलिसांना माहिती देण्याचा सल्ला दिला.
यानंतर कदम यांनी घरातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या अंगावरील रक्ताने माखलेला टी-शर्ट त्यांनी वॉशिंग मशीनमध्ये तीन वेळा धुतला. घराच्या फरशीवर पडलेले रक्ताचे डागही पाण्याने साफ केले. तसेच रक्त लागलेली बॅट त्यांनी टेरेसवर नेऊन ठेवली.
पंपिंग स्टेशनच्या जनरेटरवर प्रदुषण नियंत्रण प्रणाली बसवणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील सखल भागांमधील पावसाचा तुंबणाऱ्या पाण्याचा निचरा ...
यानंतर त्यांनी पोलिसांना फोन करून मुलगी स्वत: भिंतीवर डोके आपटून जखमी झाल्याचे सांगितले. मात्र, घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांना त्यांच्या या कथनावर संशय आला. घराची पाहणी करताना भिंतीवर रक्ताचे डाग आढळले. त्यानंतर टेरेसवर तपास केला असता रक्ताने माखलेली बॅट पोलिसांच्या हाती लागली.
टीव्हीवरून वाद झाला
तपासात घटनेमागे घरातील वाद असल्याचे समोर आले. रात्री टीव्हीच्या आवाजावरून कुटुंबात वाद झाला होता. यावेळी मृत मुलीने तिच्या लहान बहिणीच्या डोळ्यावर मारल्याचे सांगितले जात आहे. याच वादातून संतापलेल्या पुरुषोत्तम कदम यांनी मुलीच्या डोक्यात बॅटने प्रहार केला. या मारहाणीत मुलीचा मृत्यू झाला.
या प्रकरणी मृत मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांनी दिली.