Tuesday, October 6, 2026

Arijit Singh : अरिजीत सिंगची संगीतातील २० वर्षे : पार्श्वगायनातून निवृत्तीनंतर भव्य 'इंडिया टूर'ची घोषणा

संगीत क्षेत्रातील आपल्या २० वर्षांच्या प्रवासाचा आनंद साजरा करण्यासाठी त्याने २०२७ मध्ये ९ प्रमुख शहरांमध्ये भव्य 'इंडिया टूर' (India Tour) आयोजित करण्याची घोषणा केली आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून देशभरातील चाहत्यांना अरिजीतची सुपरहिट गाणी पुन्हा एकदा थेट ऐकण्याची आणि या संगीतमयी सोहळ्याचा भाग होण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

जानेवारी २०२७ पासून ९ शहरांमध्ये रंगणार धमाकेदार कॉन्सर्ट्स

पार्श्वगायक अरिजीत सिंग (Arijit Singh) आपल्या चाहत्यांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी घेऊन आला आहे. संगीत क्षेत्रातील आपल्या २० वर्षांच्या प्रवासाचा आनंद साजरा करण्यासाठी त्याने २०२७ मध्ये ९ प्रमुख शहरांमध्ये भव्य 'इंडिया टूर' (India Tour) आयोजित करण्याची घोषणा केली आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून देशभरातील चाहत्यांना अरिजीतची सुपरहिट गाणी पुन्हा एकदा थेट ऐकण्याची आणि या संगीतमयी सोहळ्याचा भाग होण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

दौऱ्याचे वेळापत्रक : कोणत्या शहरात कधी होणार कॉन्सर्ट ?

 
View this post on Instagram
 

A post shared by Team Innovation (@team.innovation)

या विशेष संगीत दौऱ्याची सुरुवात ९ जानेवारी २०२७ रोजी अहमदाबाद येथून होणार आहे. त्यानंतर पुढील काही महिन्यांत इतर आठ शहरांमधील मोठ्या स्टेडियम्समध्ये या ग्रँड कॉन्सर्ट्सचे आयोजन केले जाईल. अहमदाबादच्या पहिल्या शो नंतर, २३ जानेवारीला चंदीगड आणि ७ फेब्रुवारीला जयपूरमध्ये अरिजीतचा शो रंगेल. त्यानंतर २० फेब्रुवारीला मुंबई, १३ मार्चला बंगळुरू आणि २७ मार्चला नवी दिल्लीत ही संगीतमयी मैफल सजणार आहे. दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात १० एप्रिलला पुणे, १ मे रोजी इंदूर आणि १५ मे रोजी हैदराबाद येथे अंतिम शो पार पडेल.

पार्श्वगायनातून निवृत्तीनंतरचा पहिलाच मोठा संगीत दौरा

काही महिन्यांपूर्वीच अरिजीत सिंगने यापुढे नव्या चित्रपटांसाठी पार्श्वगायन (Playback Singing) न करण्याचा मोठा निर्णय जाहीर केला होता. त्या निर्णयानंतरचा हा त्याचा भारतातील पहिलाच सर्वात मोठा कॉन्सर्ट टूर असणार आहे. संगीतातील २० वर्षांचा टप्पा पूर्ण करत असताना आखलेला हा दौरा त्याच्या आतापर्यंतच्या सर्व भारतीय शोमध्ये सर्वात मोठा आणि खास ठरणार आहे.

कॉन्सर्टमध्ये चाहत्यांना काय पाहायला आणि ऐकायला मिळणार ?

या कॉन्सर्ट्समध्ये अरिजीतने आपल्या दोन दशकांच्या कारकिर्दीत गायलेली काही अजरामर आणि अत्यंत लोकप्रिय गाणी प्रेक्षकांना ऐकायला मिळतील. यामध्ये 'तुम ही हो', 'अगर तुम साथ हो' आणि 'विदा करो' यांसारख्या गाण्यांचा समावेश असेल. शोची भव्यता वाढवण्यासाठी आणि प्रेक्षकांचा अनुभव अधिक समृद्ध करण्यासाठी साध्या व्यासपीठांऐवजी अद्ययावत तंत्रज्ञानाने सज्ज असलेली बहुस्तरीय (multi-level) स्टेज रचना आणि रनवे तयार केला जाणार आहे, ज्यामुळे अरिजीत स्टेडियममधील प्रत्येक भागातील प्रेक्षकांच्या अधिक जवळ पोहोचू शकेल. याशिवाय, पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, या कॉन्सर्ट्समध्ये ३६०-डिग्री स्पेशल ऑडिओ सिस्टीम, पॅनोरामिक स्क्रीन, कायनेटिक एलईडी लाईट्स, लेझर शो आणि फटाक्यांची आतषबाजी यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, जेणेकरून स्टेडियमच्या कोणत्याही कोपऱ्यात बसलेल्या प्रेक्षकाला थेट अरिजीतच्या समोर असल्याचा अनुभव मिळेल.

 
View this post on Instagram
 

A post shared by Arijit Singh (@arijitsingh)

तिकीट बुकिंग आणि पूर्व-विक्रीची माहिती

'कोटक सॉलिटेअर प्रेझेंट्स अरिजीत सिंग इंडिया टूर २०२७' च्या सर्व तिकिटांची विक्री केवळ 'thumpN' या प्लॅटफॉर्मवर केली जाणार आहे.

पहिली प्री-सेल : कोटक सॉलिटेअर व्हिसा क्रेडिट कार्डधारकांसाठी १० ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजता सुरू होईल आणि ११ ऑक्टोबरला दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहील.

दुसरी प्री-सेल : कोटक व्हिसा क्रेडिट कार्डधारकांसाठी ११ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता सुरू होऊन १३ ऑक्टोबरला दुपारी २ वाजेपर्यंत चालेल.

सर्वसामान्यांसाठी तिकीट विक्री : सर्व नागरिक आणि चाहत्यांसाठी तिकिटांची खुली विक्री १३ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २ वाजल्यापासून सुरू होईल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >