पोलीस दल ते शिक्षण क्षेत्र... राज्य शासनाचे विविध घटकांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज (६ ऑक्टोबर) सर्वसामान्यांपासून ते पोलीस दलापर्यंत आणि विद्यार्थ्यांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत विविध घटकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि दिलासादायक निर्णय घेण्यात आले. पोलीस दलातील शूर कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी नवीन 'मुख्यमंत्री शौर्य पदक' जाहीर करण्यात आले आहे, तर वडार समाजाला दगडफोडी व उत्खननातील रॉयल्टीसाठी मोठी सवलत देण्यात आली आहे. यासोबतच उच्च व तंत्रशिक्षणाला चालना देण्यासाठी 'सी.एम. सृष्टी' योजनेसह सामाजिक न्याय व आदिवासी विकास विभागांतर्गत असणाऱ्या विद्यार्थी भत्त्यांमध्ये आणि वसतिगृह कर्मचाऱ्यांच्या मानधनात भरीव वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे.


राज्य मंत्रिमंडळाचे निर्णय:


१) पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना साहसी कामगिरीसाठी "मुख्यमंत्री शौर्य पदक" मिळणार. कर्तव्य बजावताना जोखीम पत्करून केलेल्या कामगिरीसाठी रोख पन्नास हजार रुपयांचा पुरस्कार, पदक तसेच प्रशस्तीपत्र मिळणार. निवडीसाठी त्रिस्तरीय विविध समित्यांच्या रचना होणार. वर्षभरातील कामगिरीची दखल घेतली जाणार, यावर्षी १ जानेवारी २०२६ पासूनची कामगिरी गृहीत धरली जाणार. दरवर्षी महाराष्ट्र दिन १ मेच्या पुर्वसंध्येला मुख्यमंत्री शौर्य पदकांची घोषणा होणार. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शौर्य पदक प्रदान होणार.


२) या बैठकीत वडार समाजाला मोठा दिलासा मिळाला असून पारंपरिक दगडफोडी व उत्खननातील गौण खनिज स्वामित्वधनासाठी (रॉयल्टी) वाढीव सवलत मिळणार. वार्षिक उत्खनन मर्यादा दोनशे ब्रास वरून, पाचशे ब्रास करण्यात येणार. त्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल (गौण खनिजांचे उत्खनन व ती काढणे), नियम १९६८ मध्ये सुधारणा करण्यास मंजुरी मिळणार.



३) शैक्षणिक संस्थांसाठी उच्च व तंत्रशिक्षण क्षेत्रातील नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान, संशोधनासाठी सी.एम. सृष्टी (CM SRISTHI (Scheme for Research, Innovations and Technological Hubs in Higher Education Institutions) योजना राबविण्यास मंजुरी. राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठे, शासकीय उच्च व तंत्रशिक्षण संस्था, शासकीय तंत्रनिकेतने, रसायन तंत्रज्ञान संस्था -आयसीटी, मुंबई, कॉलेज ऑफ इंजिनियरिंग तंत्रज्ञान विद्यापीठ, पुणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे- रायगड या संस्थांच्या माध्यमातून योजना राबविणार. (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)


४) पोलीस कोठडीतील मृत्युप्रकरणी नुकसानभरपाई देण्याबाबतच्या धोरणास मंजुरी. पोलीस कोठडीत असताना होणाऱ्या अनैसर्गिक मृत्युच्या बाबतीत मृताच्या कायदेशीर वारसांना वेळेत आर्थिक सहाय्य देण्यासाठी, सर्वसमावेशक असे धोरण. (गृह विभाग)


५) सामाजिक न्याय विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थाद्वारे चालविण्यात येणाऱ्या अनुदानित वसतिगृहांतील कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यास मंजुरी. अधीक्षक, स्वयंपाकी, मदतनीस, चौकीदारांच्या मानधनात भरीव वाढ. राज्यातील सुमारे २ हजार ३८८ अनुदानीत वसतीगृहांच्या कर्मचाऱ्यांना दिलासा. (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग)


६) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अनुदानात वाढ करण्यास मंजुरी. शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी पात्र पण अर्ज करूनही प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील अकरावी, बारावी, तसेच बारावीनंतरच्या व्यावसायिक, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भोजन, निवास व शैक्षणिक सुविधांसाठी मिळणाऱ्या भत्त्यांमध्ये वाढ. (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग)


७) अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेतील भत्त्यांमध्ये सुधारणा करण्यास मंजुरी. (आदिवासी विकास विभाग)

Comments
Add Comment

दुष्काळावर उपाययोजना सुचवण्यासाठी अभ्यासगट

मुंबई : राज्यात उद्भवलेल्या दुष्काळजन्य परिस्थितीवर मात करण्यासाठी उपाययोजना सुचवण्याकरिता अभ्यासगट स्थापन

Devendra Fadnavis : ‘एक्स्ट्रीम लेफ्टिस्ट’ प्रकारची सत्ता देशात आणण्याचा विरोधकांचा डाव- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

भारतातील सर्व लोकशाही संस्था संपविण्याचे षड्यंत्र मुंबई : "काँग्रेस आणि त्यांच्या

Pratap Sarnaik : अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांनो, स्थगितीचा काळ मराठी शिकण्यासाठी वापरा; 18 ऑगस्ट 2027 नंतर नियमांची अंमलबजावणी

मुंबई : महाराष्ट्रात व्यवसाय करताना प्रवाशांशी मराठीत संवाद साधता यावा, यासाठी अमराठी रिक्षा, टॅक्सी आणि

दुष्काळाच्या यादीत आणखी १९ तालुके; फेरविचाराचे आदेश

मुंबई : राज्यातील दुष्काळाची परिस्थिती गंभीर होत असताना, आधी दुष्काळ जाहीर केलेल्या २६५ तालुक्यांव्यतिरिक्त

परराज्यातील वाहनांवर आरटीओचा धडक मोर्चा, 5 ते 17 ऑक्टोबरदरम्यान विशेष तपासणी मोहीम

नाशिक : परराज्यातून आणलेली खासगी वाहने महाराष्ट्रात विनानोंदणी वर्षानुवर्षे वापरणाऱ्या वाहनमालकांची आता खैर

Maharashtra Weather : महाराष्ट्रात परतीचा पाऊस पुन्हा बरसणार? 'या' जिल्ह्यांना दिला अलर्ट; जाणून घ्या 6 ऑक्टोबरचे हवामान

मुंबई : यंदाच्या मान्सूनमध्ये राज्यात अनेक भागांत पावसाची तूट जाणवली. आता मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला