
Nashik : नाशिक शहरातील पंचवटीतील रामवाडी परिसरात रविवारी रात्री भरधाव कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चौघांना जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात पती-पत्नीसह दोन भावंडे जखमी झाली आहेत. अपघातानंतर कारचालकाने घटनास्थळावरच वाहन सोडून पलायन केले. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchavati Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित चालकाचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री सुमारे ११ वाजता रामवाडी येथील श्रद्धा पार्कजवळ सागर रमेश कापडे (३८) आणि त्यांची पत्नी कुसुम कापडे (३६), तसेच सौरभ आणि शुभम क्षीरसागर हे चौघे जेवण झाल्यानंतर रस्त्याच्या कडेला उभे राहून बोलत होते. त्याचवेळी चांदोरी येथील चेतन संतोष विसपुते हा इनोव्हा क्रेटा कार (एमएच १५ जीए ७८२१) भरधाव वेगाने चालवत त्या परिसरातून जात होता. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कारने रस्त्याच्या कडेला असलेल्या चौघांना जोरदार धडक दिली.
Nashik : नाशिक शहरातील बहुचर्चित डॉ. मनीषा जेजूरकर मृत्यू प्रकरणात महत्त्वाची कायदेशीर घडामोड समोर आली आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली ...
पती-पत्नीसह दोघे भावंडे जखमी
धडक इतकी जोरदार होती की कारच्या समोरील भागासह बोनेट, इंजिन आणि ग्रीलचे मोठे नुकसान झाले. अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताचे दृश्य परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाले आहे. या अपघातात सौरभ आणि शुभम क्षीरसागर यांना किरकोळ दुखापत झाली. तर सागर कापडे यांच्या पोटाला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या पत्नी कुसुम यांच्या कमरेला दुखापत झाली आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Nashik Crime : महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत माजी विद्यार्थ्याने महिला प्राध्यापिकेचा ऑनलाइन छळ केल्याचा धक्कादायक प्रकार ...
अपघातानंतर चालक पसार
अपघात घडल्यानंतर संशयित चालक चेतन विसपुते हा घटनास्थळावरून पसार झाला. त्यामुळे रामवाडी परिसरात काही काळ नागरिकांची गर्दी झाली होती. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी शुभम क्षीरसागर यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. संशयित चालकाविरोधात भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५ (ए), १२५ (बी), ३२४ (२) तसेच मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सार्वजनिक रस्त्यावर निष्काळजीपणे आणि भरधाव वेगाने वाहन चालवून अपघात केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित चालकाचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार नरेंद्र कोरडे करत आहेत.





