Devendra Fadnavis : ‘एक्स्ट्रीम लेफ्टिस्ट’ प्रकारची सत्ता देशात आणण्याचा विरोधकांचा डाव- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

भारतातील सर्व लोकशाही संस्था संपविण्याचे षड्यंत्र


मुंबई : "काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून संवैधानिक संस्थांना बदनाम करून त्यांच्यावरील लोकांचा विश्वास कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. संवैधानिक संस्था काम करू शकत नाहीत, त्या न्याय देऊ शकत नाहीत, अशी भावना लोकांच्या मनात निर्माण करून पुढे संविधानालाच नाकारण्याचा प्रयत्न केला जात आहे. संविधान हातात घेऊन असंवैधानिक कृत्य करण्याचा प्रकार सुरू असून, ‘एक्स्ट्रीम लेफ्टिस्ट’ प्रकारचे राज्य देशात आणण्याचे प्रयत्न होत आहे. भारतातील सर्व लोकशाही संस्था संपविण्याच्या दिशेने हे काम सुरू आहे", असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना केला.


मुंबईतील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत विचारले असता, पोलिसांकडून गैरवापर होत असल्याचा आरोप फडणवीस यांनी फेटाळला. मुंबई पोलीस व्यावसायिक असून ते कोणावरही चुकीची कारवाई करत नाहीत, असे त्यांनी सांगितले. कालच्या आदिवासी शिष्टमंडळाच्या मागण्या मान्य झाल्याबद्दल त्या विद्यार्थ्यांनी माझे अभिनंदन केले असून नाशिकमध्येही त्यांनी जल्लोष केला आणि फोनवरून माझ्याशी चर्चा केली, अशी माहिती फडणवीस यांनी दिली. मात्र, काही 'एनएसयुआय'चे पदाधिकारी आंदोलन सुरूच राहावे यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.


एमपीएससीच्या आंदोलनाबाबत विचारले असता, विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत फडणवीस यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न गंभीर आणि शंभर टक्के रास्त असल्याचे स्पष्ट केले. हे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेत निर्णय घेतले आहेत. मात्र, पक्षीय नेतृत्वासाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरून राजकारण केले जात असेल तर त्याला राजकीय पातळीवर उत्तर दिले जाईल; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना मात्र कृतीतून उत्तर दिले जाईल, अशी भूमिका त्यांनी मांडली.


एमपीएससीच्या अध्यक्षांचा राजीनामा घेणे किंवा त्यांना पदावरून हटविणे राज्य सरकारच्या हातात नाही. संविधानानुसार त्यांना राष्ट्रपतीच सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशीवरून हटवू शकतात, असे त्यांनी सांगितले. पेपरफुटीच्या वेळी विद्यमान अध्यक्ष पदावर नव्हते, त्यामुळे त्या काळात पदावर नसलेल्या अध्यक्षांना कोणतीही चौकशी न करता हटविण्याची मागणी कितपत योग्य आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. तरीही विद्यार्थ्यांच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी विद्यमान तसेच माजी अध्यक्षांसह संपूर्ण आयोगाची चौकशी करण्यास राज्य सरकार तयार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. या चौकशीत संविधानाच्या कलम ३१७ अन्वये गैरवर्तन आढळल्यास राष्ट्रपतींकडे कारवाईची शिफारस करण्यास सरकार मागेपुढे पाहणार नाही. यासंदर्भात राज्यपालांकडे सरकारने विनंती केली आहे. कोणालाही संरक्षण द्यायचे नसल्याने चौकशी समिती तसेच न्यायिक आयोगाच्या माध्यमातून चौकशी करण्याची सरकारची तयारी असल्याचे फडणवीस म्हणाले.




पुणे शिक्षक मतदारसंघावर पुन्हा चर्चा


पुणे शिक्षक मतदारसंघातील भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांबाबत दोन्ही पक्षांमध्ये अद्याप एकमत झाले नसल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यामुळे दोन्ही उमेदवारांनी अर्ज भरावेत आणि चर्चा सुरू ठेवावी, असे ठरले असून पुन्हा एकदा चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.



ऑगस्टपर्यंत पिण्याचे, जनावरांचे पाणी राखीव


- दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ बैठकीत पाण्याच्या नियोजनाबाबत निर्णय झाल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. ऑगस्टपर्यंत पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठीचे पाणी राखून ठेवण्यास प्रथम प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानंतर पाणी शिल्लक राहिल्यास उद्योग आणि शेतीसाठी त्याचा विचार केला जाईल. एखाद्या ठिकाणी अपवादात्मक परिस्थिती असल्यास जिल्हास्तरीय समितीने तो प्रस्ताव मंत्रिमंडळ उपसमितीकडे पाठवावा आणि योग्य कारण असल्यास अपवाद करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.


- केंद्र सरकारची समिती साधारण ६, ७ किंवा ८ तारखेपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार असून ११ तारखेपर्यंत राज्यातील विविध भागांचा दौरा करण्याची शक्यता असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. त्यानंतर राज्यातील प्रत्यक्ष परिस्थितीचा अहवाल केंद्राकडे सादर केला जाईल. सुमारे २३ हजार गावांमध्ये काही पिकांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून उर्वरित पिकांचे सर्वेक्षण सुरू आहे. ‘ग्राउंड ट्रुथिंग’चे काम वेगाने सुरू असून केंद्राकडून अपेक्षित मदतीसाठी आवश्यक प्रक्रिया विक्रमी वेळेत पूर्ण केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.



‘गोकुळ’ची निवडणूक महायुती एकत्रितपणे लढणार


कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’ची निवडणूक महायुती एकत्रितपणे लढणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. या निवडणुकीत हसन मुश्रीफ नेतृत्व करणार असून त्यांच्यासोबत महायुतीतील अन्य नेते आणि कार्यकर्ते एकत्रितपणे निवडणूक लढतील. चंद्रकांत पाटील, धनंजय महाडिक, प्रकाश आबिटकर, राजेश क्षीरसागर यांच्यासह अन्य नेते त्यात सहभागी होतील. ही स्थानिक आणि सहकार क्षेत्रातील निवडणूक असल्याने आपल्या स्तरावर यामध्ये हस्तक्षेप करण्यासारखे काही नसल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

दुष्काळावर उपाययोजना सुचवण्यासाठी अभ्यासगट

मुंबई : राज्यात उद्भवलेल्या दुष्काळजन्य परिस्थितीवर मात करण्यासाठी उपाययोजना सुचवण्याकरिता अभ्यासगट स्थापन

पोलीस दल ते शिक्षण क्षेत्र... राज्य शासनाचे विविध घटकांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज (६ ऑक्टोबर)

Pratap Sarnaik : अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांनो, स्थगितीचा काळ मराठी शिकण्यासाठी वापरा; 18 ऑगस्ट 2027 नंतर नियमांची अंमलबजावणी

मुंबई : महाराष्ट्रात व्यवसाय करताना प्रवाशांशी मराठीत संवाद साधता यावा, यासाठी अमराठी रिक्षा, टॅक्सी आणि

दुष्काळाच्या यादीत आणखी १९ तालुके; फेरविचाराचे आदेश

मुंबई : राज्यातील दुष्काळाची परिस्थिती गंभीर होत असताना, आधी दुष्काळ जाहीर केलेल्या २६५ तालुक्यांव्यतिरिक्त

परराज्यातील वाहनांवर आरटीओचा धडक मोर्चा, 5 ते 17 ऑक्टोबरदरम्यान विशेष तपासणी मोहीम

नाशिक : परराज्यातून आणलेली खासगी वाहने महाराष्ट्रात विनानोंदणी वर्षानुवर्षे वापरणाऱ्या वाहनमालकांची आता खैर

Maharashtra Weather : महाराष्ट्रात परतीचा पाऊस पुन्हा बरसणार? 'या' जिल्ह्यांना दिला अलर्ट; जाणून घ्या 6 ऑक्टोबरचे हवामान

मुंबई : यंदाच्या मान्सूनमध्ये राज्यात अनेक भागांत पावसाची तूट जाणवली. आता मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला