रोहित शर्मा आणि विराट कोहली मैदानात कधी परतणार? कसं आहे पुढचं वेळापत्रक? जाणून घ्या

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील वनडे मालिका पार पडली. त्यामुळे रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या चाहत्यांच्या मनात थोडी निराशा आहे. कारण आपल्या लाडक्या खेळाडूंना खेळताना पाहण्यासाठी काही वाट पाहावी लागणार आहे.

[caption id="attachment_1064539" align="aligncenter" width="800"] वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी20 मालिकेनंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. तिथे कसोटी, वनडे आणि टी20 मालिका खेळणार आहे. या दौऱ्यात दोन्ही संघ एकूण पाच वनडे सामने खेळतील. ही मालिका 4 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान खेळवली जाईल. (Photo: ANI)[/caption]

[caption id="attachment_1064538" align="aligncenter" width="800"] भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील शेवटचा एकदिवसीय 3 ऑक्टोबर रोजी खेळला गेला. एका महिन्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा भारतीय संघासाठी पुन्हा मैदानात उतरतील. भारत आपली पुढील वनडे मालिका न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे. ही मालिका 4 नोव्हेंबरपासून सुरू होईल. (Photo: ANI)[/caption]

[caption id="attachment_1064537" align="aligncenter" width="800"] विराट कोहली आणि रोहित शर्माने कसोटी आणि टी20मधून निवृत्ती घेतल्यानंतर गेल्या वर्षापासून वनडे फॉरमॅटमध्ये खेळत आहेत. पुढच्या वर्षी वनडे वर्ल्डकप असल्याने भारतीय संघ या वर्षी धडाधड वनडे मालिका खेळणार आहे. त्यामुळे रोहित आणि कोहली मैदानावर बऱ्याचदा एकत्र दिसू शकतात.(Photo: ANI)[/caption]

[caption id="attachment_1064536" align="aligncenter" width="800"] विराट कोहली आणि रोहित शर्माच्या चाहत्यांना आता हे दोघं मैदानात कधी उतरतील? हा प्रश्न पडला आहे. पुढची वनडे मालिका कधी होणार? त्याचं वेळापत्रक काय? असे एक ना अनेक प्रश्न आहे. तर रोहित आणि कोहलीला मैदानावर पाहण्यासाठी चाहत्यांना आणखी एक महिना वाट पाहावी लागणार आहे. (Photo: ANI)[/caption]

[caption id="attachment_1064535" align="aligncenter" width="800"] वेस्ट इंडिजविरूद्धची वनडे मालिका भारताने 2-1 ने जिंकली. आता दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू होईल. या मालिकेत भारताचा टी20 संघ मैदानात उतरला आहे. म्हणजेच या संघात विराट कोहली आणि रोहित शर्मा नाहीत. कारण त्यांनी टी20 फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली आहे. (Photo: ANI)[/caption]

 
Comments
Add Comment

Jio चं खास रिचार्ज, 200 जीबी डेटा आणि 90 दिवसांची मुदत

[caption id="attachment_1064555" align="aligncenter" width="800"] जिओच्या 899 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये 35100 रुपये किमतीचे गुगल जेमिनी प्रोचे

Paris Fashion Week 2026 मधील नोरा फतेहीचा हा बॉसी लूक पाहून चाहत्यांच्या खिळल्या नजरा!

नोरा फतेहीला सध्याच्या फॅशन ट्रेंड्स आणि शैलीची उत्तम जाण आहे, हे आता सर्वांनाच माहित झाले आहे. फॅशनच्या जगात

Testing Gallery

[caption id="attachment_1061768" align="aligncenter" width="650"] फोटो सौजन्य : ANI Image[/caption] [caption id="attachment_1061764" align="aligncenter" width="650"]