मुंबई पुस्तक महोत्सवात गौतम अदानींची उपस्थिती! पुस्तकांतून शिकून राष्ट्रनिर्मितीत योगदान द्या, विद्यार्थ्यांना आवाहन

1/8 मुंबई विद्यापीठ परिसरात आयोजित मुंबई पुस्तक महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी उद्योगपती गौतम अदानी यांनी उपस्थिती लावली. पुस्तक महोत्सवातील विद्यार्थ्यांची मोठी संख्या पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला. वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. (Photo: Prahaar)

2/8 पुस्तक महोत्सवात बोलताना गौतम अदानी यांनी पुस्तके ही ज्ञानाचा मोठा खजिना असल्याचे सांगितले. विद्यार्थी, मुले आणि नागरिकांनी पुस्तकांमधून शिकून आपल्या ज्ञानाचा उपयोग राष्ट्रनिर्मितीत करावा, असे आवाहन त्यांनी केले. (Photo: Prahaar)

3/8 मुंबई पुस्तक महोत्सवात विद्यार्थी, पुस्तकप्रेमी आणि नागरिकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळत आहे. विविध विषयांवरील पुस्तके, साहित्य, ज्ञानपर सामग्री आणि प्रकाशनांचा समृद्ध संग्रह या महोत्सवात उपलब्ध असल्याने वाचकांना आकर्षित करणारा हा उपक्रम ठरत आहे. (Photo: Prahaar)

4/8 मुंबई पुस्तक महोत्सवात 200 प्रकाशक सहभागी झाले असून, 600 हून अधिक स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. विविध भाषांतील साहित्य, कथा, कादंबऱ्या, शैक्षणिक पुस्तके, इतिहास, विज्ञान, तंत्रज्ञान आणि इतर विषयांवरील पुस्तकांची विस्तृत श्रेणी येथे उपलब्ध आहे. (Photo: Prahaar)

5/8 नॅशनल बुक ट्रस्टचे संचालक युवराज मलिक यांनी मुंबईकरांमध्ये वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन देणे हा मुंबई पुस्तक महोत्सवाचा प्रमुख उद्देश असल्याचे सांगितले. विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना साहित्याच्या विविध विश्वाशी जोडण्याचा प्रयत्न या महोत्सवातून केला जात आहे. (Photo: Prahaar)

6/8 मुंबई पुस्तक महोत्सवात ‘पत्रकारिता जनतेचा आवाज’ या विषयावर विशेष सत्र आयोजित करण्यात आले. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रेम शुक्ल यांच्याशी मीडिया व्यावसायिक देवता पाटील यांनी संवाद साधला. पत्रकारितेच्या बदलत्या स्वरूपावर, तिच्या प्रभावावर आणि समाजातील भूमिकेवर यावेळी चर्चा झाली. (Photo: Prahaar)

7/8 विशेष चर्चासत्रात प्रेम शुक्ल यांनी गेल्या दीड दशकात पत्रकारिता अधिक प्रभावशाली आणि व्यापक झाल्याचे मत व्यक्त केले. पत्रकारितेच्या विविध आयामांचा विस्तार झाला असून, सामाजिक आणि राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वपूर्ण निर्णयांवरही माध्यमांचा प्रभाव असल्याचे त्यांनी सांगितले. (Photo: Prahaar)

8/8 मुंबई विद्यापीठ परिसरात आयोजित सहा दिवसीय मुंबई पुस्तक महोत्सव 29 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. पुस्तक प्रदर्शन, नामवंत लेखकांचे संवाद, संकल्पनाधारित प्रदर्शने आणि सांस्कृतिक कार्यक्रम हे महोत्सवाचे प्रमुख आकर्षण आहेत. पुस्तकप्रेमी, विद्यार्थी आणि नागरिकांसाठी प्रवेश पूर्णपणे विनामूल्य ठेवण्यात आला आहे. (Photo: Prahaar)
Comments
Add Comment

पनवेल- कर्जत लोकल प्रवासाचा मार्ग मोकळा! 15 डिसेंबरपासून महत्त्वाची ट्रायल पार पडणार

मुंबई: कर्जत- पनवेल मार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 29.6 किमी लांबीच्या पनवेल- कर्जत मार्गिकेच्या

रात्री शोरमाची मेजवानी, सकाळी रुग्णालयाची पायरी! गर्भवती महिला, चिमुकल्यांसह 34 जणांना विषबाधा

बाहेरचे खाद्यपदार्थ खाताना स्वच्छता आणि अन्नाच्या गुणवत्तेकडे लक्ष देणं किती महत्त्वाचं आहे, हे पुन्हा एकदा

'मुंबई पुस्तक महोत्सव' संवेदना आणि माणुसकीचा उत्सव - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) युगात तंत्रज्ञानाचा वेग वाढत असला, तरी मानवी संवेदना, प्रेम आणि भावभावना

मुंबईत भारत-सायप्रस सागरी व्यवसाय मंच; जहाज बांधणी, हरित नौवहनात सहकार्यावर भर

सायप्रस प्रजासत्ताकाच्या नौवहन उपमंत्री मरीना हाजीमानोलिस यांच्या भारत दौऱ्याच्या निमित्ताने आज मुंबईत

Mission Pedestrian First: महापालिका आयुक्तांच्या ‘मिशन पेडेस्ट्रियन फर्स्ट’लाच अधिकारीच घालतात खिळ?

मुंबई (विशेष प्रतिनिधी): पदपथावरील अतिक्रमण हटवले जाते, पादचारी मुक्त झाले पदपथ बनवले जातात, पण काही दिवसांतच

येत्या गुरुवारी मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांत घेतला जाणार 24 तासांचा पाणीब्लॉक, कोणकोणत्या परिसरात बंद असेल पाणी पुरवठा

मुंबई (विशेष प्रतिनिधी): पवई उच्चस्तरीय जलाशय क्रमांक 1 ते सहार गाव दरम्यान विविध ठिकाणी मुख्य जलवाहिन्यांवरील