Tuesday, October 6, 2026

Maharashtra Weather : महाराष्ट्रात परतीचा पाऊस पुन्हा बरसणार? 'या' जिल्ह्यांना दिला अलर्ट; जाणून घ्या 6 ऑक्टोबरचे हवामान

मुंबई : यंदाच्या मान्सूनमध्ये राज्यात अनेक भागांत पावसाची तूट जाणवली. आता मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असून बंगालच्या उपसागरातील बदलांचा परिणाम राज्याच्या हवामानावर होत आहे. त्यामुळे काही भागांत पाऊस तर काही ठिकाणी उष्ण आणि दमट वातावरण अशी स्थिती पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने 6 ऑक्टोबर रोजी काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

मुंबई : यंदाच्या मान्सूनमध्ये राज्यात अनेक भागांत पावसाची तूट जाणवली. आता मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असून बंगालच्या उपसागरातील बदलांचा परिणाम राज्याच्या हवामानावर होत आहे. त्यामुळे काही भागांत पाऊस तर काही ठिकाणी उष्ण आणि दमट वातावरण अशी स्थिती पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने 6 ऑक्टोबर रोजी काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

कोकणातील पालघर, ठाणे आणि मुंबईमध्ये हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याचा अंदाज आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये मात्र पावसाची शक्यता असून या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. संध्याकाळनंतर काही भागांत हलक्या सरी पडू शकतात. या भागात कमाल तापमान 35 अंश, तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिकमध्ये पावसाची शक्यता कमी असून हवामान मुख्यतः कोरडे राहू शकते. काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह उकाडा आणि दमटपणा जाणवण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 31 अंशांपर्यंत पोहोचू शकते.

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, नगर आणि सोलापूरमध्ये हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. तर कोल्हापूर, सातारा आणि घाट परिसरात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात.

मराठवाड्यात बहुतांश जिल्ह्यांत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिवमध्ये कमाल तापमान 31 ते 33 अंशांच्या दरम्यान राहू शकते.

विदर्भात बहुतांश भागात कोणताही अलर्ट नसला तरी गडचिरोलीला यलो अलर्ट देण्यात आला आहे. येथे काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. 7 ऑक्टोबरलाही गडचिरोलीसाठी यलो अलर्ट कायम आहे.

एकूणच, राज्यात सध्या मिश्र हवामानाचा अनुभव येत असून काही भागांत पावसाच्या हलक्या सरी तर काही ठिकाणी उष्णता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत परतीचा पाऊस आणि ऑक्टोबर हिट यापैकी कोणाचा प्रभाव अधिक राहतो, याकडे नागरिक आणि शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >