यामी गौतम मुंबई सोडणार? मंडीतील 100 वर्षे जुन्या अलिशान बंगल्याची किंमत ऐकून डोळे विस्फारतील; पाहा Photos...

Yami Gautam Bungalow News: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम मुंबई सोडून हिमाचल प्रदेशमध्ये स्थायिक होणार आहे. अभिनेत्रीच्या घराची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

मुंबई: प्रसिद्ध बॉलिवूड कपल यामी गौतम आणि आदित्य धर गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. आर्टिकल 370 चित्रपटासाठी या कपलला राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. सध्या आदित्य आणि यामी मुंबई सोडून त्यांच्या मुळ गावी हिमाचल प्रदेशला स्थायिक होण्याच्या विचारात असल्याचं बोललं जात आहे. झगमगाटापासून दूर राहून त्यांना निवांत आयुष्य जगायचं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आदित्य- यामी त्यांच्या हिमाचल प्रदेशातील 100 वर्षे जुन्या घरात शिफ्ट होणार असल्याचं बोललं जात आहे. आता स्वत: आदित्या धरच्या पीआर टीमने माध्यमांना अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे.



हिमाचल प्रदेशला शिफ्ट होणार असल्याच्या चर्चांवर आदित्यच्या जनसंपर्क टीमने नकार दिला आहे. आदित्य धरच्या टीमने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, "नाही, यामी- आदित्य मुंबई सोडून हिमाचल प्रदेशला जाणार नाहीत. तुम्हाला या अशा बातम्या कोण पाठवत आहेत?" असं म्हणत त्यांनी सर्व चर्चांना धुडकवून लावले आहे. पण गेल्या काही दिवसांपासून आदित्य- यामीच्या घराची चर्चा सुरू आहे. ते नेमकं घर कसं आहे? या बॉलिवूड कपलच्या घराची नेमकी खासियत काय आहे? याची माहिती जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. मंडीतल्या गोहरमध्ये यामीने तिच्या लग्नाआधी 25 एकरामध्ये 100 वर्षे जुनं हेरिटेज घर खरेदी केलं होतं. लाकूड आणि दगडापासून बनवलेल्या ह्या बंगल्याभोवती सफरचंद, बटाटा, आलूबूखारा आणि आल्लं या पिकांची शेती सुद्धा आहे.


 


यामी- आदित्यने जून 2021 मध्ये हिमाचलमधील याच बंगल्यामध्ये लग्नगाठ बांधलं होतं. या घरासोबत अभिनेत्रीच्या आणि तिच्या कुटुंबीयांच्या अनेक आठवणी आणि भावनिक संबंध जोडलेले आहेत. फायनान्शियल एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, यामी गौतमच्या हेरिटेज घराची किंमत तब्बल 8 कोटी इतकी आहे. ई- टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीने या घराची खरेदी 2016 साली केलेली होती. या घराच्या माध्यमातून अभिनेत्री आपल्या वडिलोत्पार्जित संपत्तीचे जतन करतेय. अभिनेत्रीने आपल्या ह्या घरातील अनेक फोटोज् सोशल मीडियावर देखील शेअर केलेले आहेत. यामीसाठी आपल्या गावी घर खरेदी करणे म्हणजे, गुंतवणुकी पेक्षा गावासोबत कनेक्ट राहणं हा तिचा मुख्य उदेश होता. बालपणापासूनच यामीचं तिच्या गावासोबत नातं आहे. प्रत्येक सुट्टीला ती गावी एन्जॉय करण्यासाठी जायची.



दरम्यान, यामीने आजही तिच्या घरातील जुनेपण जपले आहे. या घराला आलिशान बंगल्यामध्ये बदलण्याऐवजी त्यांनी घराचा साधेपणा कायम ठेवला आहे. याआधीही शुटिंग संपल्यानंतर, फावल्या वेळी यामी आणि आदित्य गावच्या घरी राहण्यासाठी जायची. पण, आता यामी आणि आदित्य यांनी कायमस्वरूपी हिमाचलमध्येच राहण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.


 

Comments
Add Comment

Shreya Ghoshal : श्रेया घोषालच्या कॉन्सर्टचा मुंबईत धमाका! २० हजारांचे तिकीट; 'The Unstoppable Tour' ची जोरदार चर्चा!

मुंबई : मुंबईकरांसाठी आणि गानकोकिळा श्रेया घोषालच्या (Shreya Ghoshal) चाहत्यांसाठी एक अतिशय आनंदवार्ता आहे. श्रेया घोषाल

Arijit Singh : अरिजीत सिंगची संगीतातील २० वर्षे : पार्श्वगायनातून निवृत्तीनंतर भव्य 'इंडिया टूर'ची घोषणा

जानेवारी २०२७ पासून ९ शहरांमध्ये रंगणार धमाकेदार कॉन्सर्ट्स पार्श्वगायक अरिजीत सिंग (Arijit Singh) आपल्या

Gondhal Movie Screening: ‘गोंधळ’ चित्रपट पाहायचाय का? 9 ऑक्टोबरपासून देशभरातील ‘या’ 6 शहरांमध्ये होणार स्पेशल शो

मुंबई: संतोष दावखर दिग्दर्शित, 'गोंधळ' या सायकोलॉजिकल थ्रिलर मराठी चित्रपटाची 99 व्या अकादमी पुरस्कारांसाठी

'Drishyam 3'ची बॉक्स ऑफिसवर तुफान घोडदौड; पटकथा लिहिण्यासाठी १०० हून अधिक ड्राफ्ट, चित्रपटाचा क्लायमॅक्स ठेवला गुप्त

अजय देवगणचा बहुप्रतीक्षित असलेला दृश्यम द कन्क्लुजन हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. पहिल्या दोन

Ramayana Movie Set On Fire: रणबीर कपूरच्या 'रामायण' चित्रपटाच्या सेटवर आग, सुदैवाने जीवितहानी नाही...

मुंबई: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरच्या 'रामायणा' चित्रपटाच्या सेटला आग लागल्याची घटना घडली आहे. आज (05 ऑक्टोबर-

Sanjay Dutt : संजय दत्तच्या ‘शांतते’च्या वक्तव्यावरून वाद ! आता स्पष्टीकरण, म्हणाला- ‘भावना दुखावण्याचा हेतू नव्हता’

Sanjay Dutt : बॉलिवूड अभिनेता संजय दत्त आपल्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. शेखर सुमन यांच्या ‘शेखर टूनाइट’ या चॅट