मुंबई: संतोष दावखर दिग्दर्शित, 'गोंधळ' या सायकोलॉजिकल थ्रिलर मराठी चित्रपटाची 99 व्या अकादमी पुरस्कारांसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाली आहे. भारतासाठी एवढी सन्मानाची गोष्ट ठरलेल्या ह्या मराठी चित्रपटाची संपूर्ण देशभरामध्ये उत्सुकता लागून राहिली आहे. ऑस्करवारी साठी गेलेल्या ह्या मराठी चित्रपटाचे येत्या 9 ऑक्टोबरपासून देशातील प्रमुख सहा शहरांमध्ये स्पेशल स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आले आहे. याबद्दलची माहिती दिग्दर्शकांनी 'टाईम्स ऑफ इंडिया' सोबत बोलताना माहिती दिली. त्यामुळे जर प्रेक्षकहो तुम्ही हा चित्रपट अजूनही पाहिला नसेल, तर आता पुन्हा एकदा हा चित्रपट पाहण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे.
अजय देवगणचा बहुप्रतीक्षित असलेला दृश्यम द कन्क्लुजन हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. पहिल्या दोन भागांच्या भरघोस यशानंतर अंतिम भागातील ...
दरम्यान संपूर्ण जगभरामध्ये प्रदर्शित होण्यापूर्वी 'गोंधळ' चित्रपट प्रेक्षकांना मुंबई, पुणे, दिल्ली, चेन्नई, हैदराबाद आणि बेंगळुरू या प्रमुख सहा शहरांमध्ये चित्रपट पाहायला मिळू शकतो. सध्या तरी प्रेक्षकांना मराठी आणि हिंदी अशा दोन भाषांमध्ये पाहता येणार आहे. पण जेव्हा जगभरामध्ये हा चित्रपट रिलीज होणार, त्यावेळी मराठी, हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड अशा प्रमुख सहा भाषेंमध्ये रिलीज होणार आहे. जगभरामध्ये हा चित्रपट केव्हा रिलीज होणार? याबद्दलची माहिती गुलदस्त्यातच आहे. सध्या तरी प्रेक्षकांना 'गोंधळ' चित्रपट प्रेक्षकांना भारतातील मुंबई, पुण्यासह इतरत्र चार प्रमुख शहरांमध्ये पाहता येणार आहे.
महाराष्ट्रामध्ये ज्या प्रमाणे, दमदार प्रतिसाद मिळाला, त्याप्रमाणेच आता संपूर्ण देशभरातील प्रेक्षकही चित्रपटाला दमदार प्रतिसाद देताना पाहायला मिळतील. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत, संतोष डावखर यांनी सांगितले की, “आमच्यासाठी हे केवळ प्रिव्ह्यूज शो नाहीत, तर प्रेक्षकांना थिएटरमध्ये जाऊन 'गोंधळ' चित्रपटाच्या माध्यमातून खास अनुभव देण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा प्रेक्षकांपर्यंत 'गोंधळ' चित्रपट पोहोचवण्याची एक संधी आहे. ही कथा महाराष्ट्राच्या मातीतून जन्माला आली आहे. 'गोंधळ' चित्रपटाच्या माध्यमातून आम्हाला प्रेक्षकांना चित्रपटाचे वातावरण, त्यातला आवाज आणि संपूर्ण जग रूपेरी पडद्यावर दाखवायचा आहे. थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहण्याचा अनुभव एकदम खास आहे. ऑस्करमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा सन्मान मिळाल्यानंतर, प्रेक्षकांसाठी चित्रपटाचे दरवाजे उघडणे आणि त्यांना 'गोंधळ'चा स्वतः अनुभव घेऊ देणे, हे विशेष अर्थपूर्ण वाटते. मला आशा आहे की प्रेक्षकांनी कोणतीही पुर्वकल्पना न ठेवता, थिएटरमध्ये यावे आणि कथा, संस्कृती आणि त्यातील मनोवैज्ञानिक प्रवासाचा अनुभव घ्यावा.”
मुंबई: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरच्या 'रामायणा' चित्रपटाच्या सेटला आग लागल्याची घटना घडली आहे. आज (05 ऑक्टोबर- सोमवार) दुपारी चित्रपटाच्या सेटला भीषण आग ...
चित्रपटाविषयी बोलायचे तर, 'गोंधळ' चित्रपटाचे दिग्दर्शन संतोष डावखर यांनी केले आहे. चित्रपटाची कथा महाराष्ट्रातील गावांमध्ये केली जाणारी पारंपरिक पूजा 'गोंधळ'च्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. या विधीमध्ये देवांच्या कथा, संगीत आणि नृत्य यांचा समावेश आहे. या चित्रपटात इशिता देशमुख, किशोर कदम आणि योगेश सोहनी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाने अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांवर आपले नाव कोरले आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी IFFI पुरस्कार, बेंगळुरू आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये FIPRESCI पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. इतकंच नाही तर, चित्रपटाची ऑस्करवारी ठरल्यानंतर चित्रपटाच्या टीमने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यावेळी सुद्धा त्यांनी चित्रपटाचे भरभरून कौतुक केले होते.