मुंबई : अजय देवगणचा बहुचर्चित 'दृश्यम 3' सिनेमा रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. पहिल्या वीकेंडला मोठी कमाई केल्यानंतर आता आठवड्याच्या दिवसांतही चित्रपटाची घोडदौड सुरू आहे. प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता सिनेमाने अवघ्या 5 दिवसांत मोठा टप्पा गाठला आहे.(Drishyam 3 Box Office Collection)
'दृश्यम 3'च्या पाचव्या दिवसाच्या कमाईचे आकडेही समोर आले आहेत. सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, रिलीजच्या पाचव्या दिवशी म्हणजेच मंगळवारी या चित्रपटाने भारतात सुमारे 19 कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे पहिल्या 5 दिवसांतील सिनेमाचे भारतातील एकूण नेट कलेक्शन 216.50 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
चित्रपटाने पहिल्याच दिवशी 62 कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी 53.50 कोटी, तिसऱ्या दिवशी 61 कोटी आणि चौथ्या दिवशी 21 कोटी रुपये कमावले. त्यानंतर पाचव्या दिवशीही सिनेमाने चांगली कमाई करत आपली पकड कायम ठेवली आहे.
मुंबई: प्रसिद्ध बॉलिवूड कपल यामी गौतम आणि आदित्य धर गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. आर्टिकल 370 चित्रपटासाठी या कपलला ...
या कमाईसोबत 'दृश्यम 3'ने 2026 मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीतही स्थान मिळवलं आहे. चित्रपटाने अक्षय कुमारच्या 'भूत बंगला'ची 199.23 कोटी रुपयांची एकूण कमाई मागे टाकली आहे. आता 'मिर्झापूर: द मुव्ही'च्या 233.12 कोटी रुपयांच्या कमाईला मागे टाकण्याकडे चित्रपटाचे लक्ष असेल.
2026 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत 'धुरंधर 2' 1186.32 कोटी रुपयांसह पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर 'बॉर्डर 2'ने 362.76 कोटी, 'हनुमान अंश'ने 325.48 कोटी आणि 'मिर्झापूर: द मुव्ही'ने 233.12 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
अभिषेक पाठक दिग्दर्शित 'दृश्यम 3' हा सिनेमा 2 ऑक्टोबरला प्रदर्शित झाला. अजय देवगणसोबत तब्बू, श्रिया सरन, रजत कपूर, इशिता दत्ता आणि मृणाल जाधव पुन्हा प्रमुख भूमिकेत आहेत. प्रकाश राज आणि जयदीप अहलावत हे कलाकार यावेळी नव्याने या चित्रपटाच्या टीममध्ये सहभागी झाले आहेत.