Wednesday, October 7, 2026

भुवनेश्वर कुमारचं भारतीय संघात पुनरागमन, पण आरसीबीला बसणार फटका; लिलावाचं गणित असं बिघडणार!

न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आणि क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला. कारण या संघात एक नाव होतं भुवनेश्वर कुमारचं.. त्याने भारतीय संघात चार वर्षांनी पुनरागमन केलं आहे. असं असताना आयपीएल फ्रेंचायझी आरसीबीला याचा फटका बसणार आहे. कसं काय ते समजून घ्या.

भारतीय संघ 22 ऑक्टोबरपासून न्यूझीलंड दौऱ्यात टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयच्या निवड समितीने 6 ऑक्टोबर 2026 रोजी संघ निवडला. या संघात एकूण 16 खेळाडूंची नावं आहे. यापैकी एक नाव सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारं ठरलं. ते नावं होतं वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचं... कारण त्याचं टीम इंडियात चार वर्षांनी पुनरागमन झालं आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. कारण भुवनेश्वर कुमार हा एक चांगला गोलंदाज आहे. मात्र मागच्या काही वर्षात संघात स्थान मिळणं कठीण झालं होतं. पण आयपीएल स्पर्धेत केलेल्या कामगिरीच्या जोरावर बीसीसीआय निवड समितीला विचार करणं भाग पडलं. सलग दोन आयपीएल स्पर्धेत भुवनेश्वर कुमारने आरसीबीसाठी चमकदार कामगिरी केली. त्याच्या या कामगिरीवरून बीसीसीआयच्या निवड समितीने न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत त्याची निवड केली आहे. असं असताना या निर्णयाचा रॉयल चॅलेंजर्स फ्रेंचायझीला फटका बसला आहे.

भुवनेश्वर कुमारला तेव्हापासून भारतीय संघात स्थान मिळालं नव्हतं?

भुवनेश्वर कुमार आता 36 वर्षांचा असून त्याला चार वर्षानंतर टीम इंडियाची दारं खुली झाली आहे. भुवनेश्वर कुमार नोव्हेंबर 2022 पासून टीम इंडियाच्या बाहेर आहे. त्याने शेवटचा टी20 सामना वर्ल्डकप स्पर्धेत खेळला होता. त्या सामन्यात टीम इंडियाचा 10 विकेट्सने पराभव झाला होता. एकहाती पराभव झाल्याने भुवनेश्वर कुमारला संघातून बाहेरचा रस्ता दाखवला गेला. त्यानंतर पुन्हा संघात पुनरागमन करेल असं वाटलं होतं. पण त्याला काही संधी मिळाली नाही. गेली चार वर्षे संधी मिळेल या आशेवर होता. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याची कामगिरीची छाप दिसत होती. अखेर त्याला टीम इंडियात स्थान मिळालं.पण आता आयपीएल फ्रेंचायझीला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला फटका बसणार आहे. त्याला अनकॅप्ड प्लेयर म्हणून रिटेन करता येणार नाही.

लिलावाचं गणित काय असेल?

आयपीएल 2028 स्पर्धेपूर्वी मेगा लिलाव होणार आहे. या स्पर्धेपूर्वी आरसीबीकडे भुवनेश्वर कुमारला अनकॅप्ड प्लेयर म्हणून घेण्याची संधी होती. पण आता गणित बदललं आहे. कारम एखादा खेळाडू सलग पाच वर्षे टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मधून बाहेर असेल किंवा बीसीसीआयच्या वार्षिक करारात नसेल तर त्याला अनकॅप्ड प्लेयर म्हणून रिटेन करता येऊ शकते. भुवनेश्वर कुमार मागच्या चार वर्षांपासून भारतीय संघ आणि वार्षिक कराराचा भाग नव्हता. नोव्हेंबर 2027 मध्ये त्याला पाच वर्षे पूर्ण झाली असती आणि त्याला अनकॅप्ड खेळाडू म्हणून रिटेन करता आलं असतं.पण आता ती शक्यता संपली आहे. कारण जसप्रीत बुमराहच्या गैरहजेरीत भुवनेश्वर कुमार न्यूझीलंडमध्ये टीम इंडियाचा मुख्य गोलंदाज असेल.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा