Wednesday, October 7, 2026

स्मृती आणि हरमनप्रीत कौर यांच्यात वाद? ड्रेसिंग रुममध्ये कसं होतं वातावरण? अफवांवर मंधानाने मौन सोडलं

भारतीय महिला क्रिकेट संघाचं कर्णधारपद हरमनप्रीत कौरने सोडलं आणि स्मृती मंधानाला मिळालं. असं असताना एका मीडिया रिपोर्टमध्ये स्मृती मंधाना आणि हरमनप्रीत कौर यांच्यात बिनसल्याचं नमूद करण्यात आलं आहे. पण स्मृतीच्या एका पोस्टने अफवांचा बाजार थंड झाला आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या नेतृत्वाबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. एशियन गेम्स 2026 स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावल्यानंतर बदल होईल असं काही वाटलं नव्हतं. पण गेल्या दोन दिवसात वेगाने घडामोडी घडल्या. हरमनप्रीत कौरने कर्णधारपद सोडलं आणि स्मृती मंधानाला कर्णधारपद सोपवण्यात आलं. वनडे आणि टी20 संघाची धुरा स्मृती मंधानाच्या खांद्यावर असणार आहे. पण कर्णधारपद सोडणं आणि दुसऱ्याला मिळणं इतक्यावरच हा विषय संपलेला नाही. या प्रक्रियेत बरंच काही घडल्याची चर्चा क्रीडावर्तुळात आणि सोशल मीडियावर रंगली आहे. मीडिया रिपोर्ट आणि सोशल मीडियावर या संदर्भात बरंच काही बोललं जात आहे. खरंच हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंधाना यांच्यात बिनसलं होतं का? असाही प्रश्न विचारला जात आहे. त्यामुळे ड्रेसिंग रूममधील वातावरण गढूळ झाल्याचं सांगण्यात येत आहे. पण तसं काहीच नव्हतं. या बातम्यांनंतर स्मृती मंधानाने एक पोस्ट आणि विषयच संपवून टाकला आहे.

स्मृती मंधाना आणि हरमनप्रीत कौरमध्ये वादाचं कारण काय?

स्मृती मंधाना आणि हरमनप्रीत कौर यांच्यात बिनसल्याचं चर्चांवर कोणीही सहज विश्वास ठेवणार नाही. कारण यापूर्वी अशा बातम्या कधीच समोर आल्या नव्हत्या. पण कर्णधारपद बदलताच या चर्चांना उधाण आलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, दोघांमधील वादाचं कारणच कर्णधारपद होतं. एका मुलाखतीत मंधानाने सांगितलं होतं की, जर तिला कर्णधारपद मिळालं तर तिच्यासाठी अभिमानाची बाब असेल. तेव्हापासून हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंधाना यांच्यात बिनसल्याची चर्चा मीडियात आहे. पण या बातम्यांची पुष्टी प्रहार डॉट इन करत नाही. असं असताना स्मृती मंधानाने एक लक्षवेधी पोस्ट केली आहे. त्यामुळे या निव्वळ अफवा असल्याचं स्पष्ट झालं आहे.

काय म्हणाली स्मृती मंधाना?

स्मृती मंधानाला कर्णधारपदाची जबाबदारी मिळताच दुसऱ्याच दिवशी तिने हरमनप्रीतबाबत एक पोस्ट केली आहे. तिने हरमनप्रीतच्या नेतृत्वाची प्रशंसा केली. इतकंच काय तर एकत्र खेळलेल्या वर्षांच्या आठवणींना उजाळा दिला. स्मृती मंधाना इंस्टा स्टोरीत म्हणाली की, "इतकी वर्षे तुमच्यासोबत खेळणे हा एक आनंददायी अनुभव होता. तुमच्या नेतृत्वाची दहा वर्षे शानदार होती आणि आपण एकत्र मिळून आपल्या देशासाठी आणखी अनेक गौरव मिळवण्यासाठी प्रयत्न करू."
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा