
मथुरा-वृंदावन : संत प्रेमानंद महाराज यांचे शिष्य दीपक कुमार ऊर्फ रसिक दुलारी शरण यांच्या संशयास्पद मृत्यूचे गूढ अद्याप कायम आहे. २५ सप्टेंबर रोजी आश्रमातील इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेतल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला होता. मात्र, मृत्यूपूर्वी त्यांच्या शरीरावर झालेल्या गंभीर दुखापती आणि घटनास्थळी मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमुळे पोलिस तपासाला वेगळे वळण मिळाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी आत्महत्या असल्याच्या प्राथमिक शक्यतेसोबतच इतर बाबींचाही तपास सुरू केला आहे. रक्ताचे नमुने फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले असून, ते कोणत्याही अमली पदार्थ किंवा इतर पदार्थांच्या प्रभावाखाली होते का, याचीही तपासणी केली जात आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये नेमकं काय दिसलं ?
पोलिसांना आश्रमातून मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये रसिक दुलारी शरण आपल्या खोलीतून बाहेर पडताना दिसत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर ते पायऱ्यांच्या दिशेने जात छतावर पोहोचल्याचे फुटेजमध्ये दिसते. छतावरील कॅमेऱ्यात ते काही वेळ संरक्षक भिंतीजवळ बसल्याचे आणि त्यानंतर तेथे झोपल्याचे दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले. काही वेळाने ते अचानक उठले, संरक्षक भिंतीवर चढले आणि चौथ्या मजल्यावरून खाली उडी घेतली. घटनेपूर्वी त्यांच्या शरीरावर गंभीर दुखापत झाल्याचेही तपासात समोर आले आहे. त्यामुळे या संपूर्ण घटनेमागे नेमके काय घडले, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
Nashik : नाशिकचा पौराणिक, ऐतिहासिक आणि अध्यात्मिक वारसा जगभरातील पर्यटकांसमोर प्रभावीपणे मांडण्यासाठी शहरात दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारण्यात ...
वैद्यकीय अधिकाऱ्यांकडूनही आश्चर्य व्यक्त
मथुराचे उप-मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. भूदेव यांनी आश्चर्य व्यक्त करताना सांगितले की, एखादी व्यक्ती इलेक्ट्रिक ग्राइंडरचा वापर करून स्वतःचे गुप्तांग कसे काय कापू शकते, हे समजण्यापलीकडचे आहे. इतक्या वेदनादायी परिस्थितीतही न ओरडणे, वेदनेने न तळमळणे किंवा धडपड न करता हालचाल करत राहणे, हे वैद्यकीय शास्त्राच्या दृष्टीने जवळपास अशक्य वाटते. त्यामुळे, या घटनेच्या वेळी रसिक कदाचित तीव्र नशेत किंवा अमली पदार्थांच्या प्रभावाखाली असावा, असा पोलिसांना संशय आहे. याची खात्री करण्यासाठी रक्ताचे नमुने फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. तसेच, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांशी काही छेडछाड केली गेली आहे का, हे तपासण्यासाठी फॉरेन्सिक तपासणीही केली जात आहे.
शवविच्छेदन अहवालात सात दुखापतींची नोंद
रसिक दुलारी शरण यांच्या शवविच्छेदन अहवालात शरीरावर एकूण सात गंभीर दुखापतींची नोंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. चौथ्या मजल्यावरून पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापती झाल्या होत्या. तसेच हात, पाय आणि टाचांच्या भागालाही इजा झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय शरीराच्या संवेदनशील भागावर झालेल्या गंभीर दुखापतीमुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याचे शवविच्छेदनातून समोर आले आहे.
महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्याची सुरुवात होताच अनेक भागांत उन्हाचा चटका वाढला आहे. दिवसा वाढलेली उष्णता आणि दमट हवेमुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास ...
पोलिस तपासानंतरच मृत्यूचे नेमके गूढ उलगडणार
शवविच्छेदन अहवालानुसार मोठ्या प्रमाणात झालेला रक्तस्त्राव हे मृत्यूचे प्राथमिक कारण असल्याचे डॉक्टरांकडून नमूद करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सीसीटीव्ही फुटेज, फॉरेन्सिक अहवाल, रक्ताच्या नमुन्यांचा तपास आणि इतर पुराव्यांच्या आधारे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. रसिक दुलारी शरण यांच्या मृत्यूचे प्रकरण आत्महत्या, अपघात की अन्य कोणत्या कारणामुळे घडले, याबाबत अद्याप अंतिम निष्कर्ष समोर आलेला नाही. त्यामुळे फॉरेन्सिक अहवाल आणि पोलिस तपासाचा निष्कर्ष महत्त्वाचा ठरणार आहे.






