Vijayendra Kumeria Preeti Bhatia Divorced : प्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोट, १४ वर्षाच्या सुखी संसारानंतर जोडप्याने घेतला काडीमोड

१४ वर्षाच्या सुखी संसारानंतर विजयेंद्र कुमारिया आणि प्रीती भाटिया या जोडप्याने घेतला काडीमोड, दोघं गेल्या ४ वर्षांपासून होते विभक्त

मुंबई : अभिनेता विजयेंद्र कुमेरिया (Vijayendra Kumaria) यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठी बातमी समोर आली. "नागिन" फेम अभिनेता विजयेंद्र कुमारिया आणि पत्नी प्रीती भाटिया यांचा घटस्फोट झाल्याची स्पष्ट माहिती समोर आली आहे. २०१२ मध्ये विजयेंद्र कुमेरिया आणि प्रीती भाटिया ह्यांचं लग्न झालं होत त्यांच्या लग्नाला १४ वर्ष पूर्ण झाली होती.


विजयेंद्रने अलीकडेच दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रीती भाटियासोबत घटस्फोट (Divorced) झाल्याचा स्पष्ट केलं आहे. महत्वाची बाब म्हणजे बऱ्याच काळापासून ते दोघे वेगळे होण्याबाबत सोशल मीडियावर (Social Media) चर्चा सुरु होती. सर्वात आधी २०२३ मध्ये त्यांच्या विभक्त होण्याबाबतची माहिती समोर आली होती. आता हे जोडपं गेल्या ४ वर्षांपासून वेगळे रहात होते हे विजयेंद्र यांनी स्पष्ट देखील केलं आहे.



विजयेंद्र यांनी चार वर्षानंतर व्यक्त होत सांगितलं की, पत्नीसोबत होणारे सततचे मतभेद, वादविवाद यामुळे एकत्र संसार करणं कठीण होत होतं. काडीमोड घेण्यापूर्वी एकमेकांना समजून घेऊन समस्या सोडवण्याचा प्रयत्न देखील केला होता. पण ते काही जमलं नाही. त्यामुळे 2022 मध्ये आम्ही परस्पर संमतीने वेगळे झालो. 2025 मध्ये आम्हाला कायदेशीर आदेश प्राप्त झाला. विजयेंद्रने पुढे असे देखील स्पष्ट केले कि, "हा निर्णय (Decision) आम्ही एका रात्रीत घेतला नाही. आम्ही खूप प्रयत्न केले एकमेकांना समजून घेयायचा,आमच्या मुलीसाठी आम्ही हे नातं टिकवण्याचा प्रयत्न करत होतो. मुलगी लहान असल्यामुळे आम्हाला हा निर्णय घेणे अधिकच कठीण होतं. आमच्या मुलीला वेगवेगळं का होईना प्रेम मिळणं आम्हाला जास्त महत्वाचं वाटतं."


विजयेंद्र यांनी पुढे स्पष्ट केलं की, मला वैयक्तिक आयुष्यातील बदल जाणून घ्यायला आणि स्वीकार करायला वेळ लागला आणि माझ्यासाठी ते फार कठीण होतं. असं असताना चाहत्यांनी कोणतेही तर्क लावू नये, अथवा वेगळे होण्याबाबद कोणतेही अफवा पसरवू नये. म्हणूनच आम्ही काडीमोड घेतल्याची बातमी जाहीरपणे बोलायला मी वेळ घेतला.

Comments
Add Comment

एक स्त्री, एक सत्य आणि एक लढा! अभिषेक कंवर दिग्दर्शित ‘जनक’ चित्रपटाचा दमदार मोशन पोस्टर प्रदर्शित !

मराठी चित्रपटसृष्टीत एक नवा आणि उत्कंठावर्धक कोर्टरूम ड्रामा प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज झाला आहे.

चेक बाउन्स प्रकरणात राजपाल यादव यांना १३ ऑक्टोबरपर्यंत २ कोटी रुपये जमा करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

‘भूल भुलैया’ मधला छोटा पंडित असो, ‘हंगामा’ मधला राजा असो किंवा ‘वेलकम’ मधला तो अतरंगी अभिनेता… राजपाल यादव यांनी

Kalyani Sadanand : अभिनेत्री कुनिका सदानंद यांच्या आईचं निधन, वयाच्या ८३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कुनिका सदानंद (Kunika Sadanand) ह्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कुनिका यांनी

Kiara And Siddharth Second Child : 'कुणीतरी येणार येणार गं...' कियारा-सिद्धार्थ पुन्हा होणार आई-बाबा; लाडक्या लेकीसोबत केली सेकंड प्रेग्नेंसीची घोषणा!

मुंबई : बॉलिवूडचे लाडके जोडपे अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Adwani) आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (siddharth Malhotra) यांच्या घरी

यामी गौतम मुंबई सोडणार? मंडीतील 100 वर्षे जुन्या अलिशान बंगल्याची किंमत ऐकून डोळे विस्फारतील; पाहा Photos...

मुंबई: प्रसिद्ध बॉलिवूड कपल यामी गौतम आणि आदित्य धर गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे.

Shreya Ghoshal : श्रेया घोषालच्या कॉन्सर्टचा मुंबईत धमाका! २० हजारांचे तिकीट; 'The Unstoppable Tour' ची जोरदार चर्चा!

मुंबई : मुंबईकरांसाठी आणि गानकोकिळा श्रेया घोषालच्या (Shreya Ghoshal) चाहत्यांसाठी एक अतिशय आनंदवार्ता आहे. श्रेया घोषाल