चेक बाउन्स प्रकरणात राजपाल यादव यांना १३ ऑक्टोबरपर्यंत २ कोटी रुपये जमा करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

‘भूल भुलैया’ मधला छोटा पंडित असो, ‘हंगामा’ मधला राजा असो किंवा ‘वेलकम’ मधला तो अतरंगी अभिनेता… राजपाल यादव यांनी गेली अनेक दशकं आपल्या विनोदाने प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावलं. पण प्रेक्षकांना हसवणाऱ्या या चेहऱ्यावर निराशेचे ढग आहेत.सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी अभिनेता राजपाल यादवला, चेक बाउन्स प्रकरणात तक्रारदाराला देय असलेली २ कोटी रुपये रक्कम १३ ऑक्टोबरपर्यंत जमा करण्याचे निर्देश दिले. ही रक्कम भरल्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या यादवच्या याचिकेवर विचार केला जाईल, असे न्यायालयाने म्हटले आहे.


राजपाल यादव हे न्यायालयात हजर होते. त्यांनी १.१५ कोटी रुपयांचा डिमांड ड्राफ्ट आणला होता. उर्वरित ८५ लाख रुपये १३ ऑक्टोबरपर्यंत त्यांच्या मालमत्तेच्या खरेदीदारामार्फत द्यायचे आहेत. मात्र खंडपीठाने राजपाल यादव यांच्या वर्तवणुकीवर देखील टीका केली असून त्यांच्या शिक्षेत वाढ होऊ शकते असे सांगितले आहे. यादव यांच्या वकिलांनी बाजू मांडताना सांगितले की, अभिनेत्याने पैसे भरण्यासाठी रजिस्ट्रीकडे संपर्क साधला होता. पण आरटीजीएसला परवानगी नव्हती. त्यामुळे यादव यांनी १.१५ कोटींचा डिमांड ड्राफ्ट आणला होता. उर्वरित रक्कम मालमत्तेचा खरेदीदार न्यायालयात हजर असून व्यवहार पूर्ण झाल्यावर दिली जाईल, असे वकिलांनी सांगितले.






खंडपीठासोबत झालेल्या अनौपचारिक चर्चेत यादव यांनी 'अता पता लापता' या चित्रपटामुळे २०० ते २५० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले. यावेळी 'तुमचे पैसेही तुमच्या चित्रपटाप्रमाणे अता पता लापता आहेत ' असे भारतीय सरन्यायाधीश गंमतीने म्हणाले. पुढे त्यांनी राजपाल यादव यांना चांगला चित्रपट बनवून लोकांचे मनोरंजन करण्याचा सल्ला दिला. तसेच पुन्हा एकदा गंमत करत सर्वोच्च न्यायालयासमोर हजर होणारे वकील हे उत्तम अभिनेते असून त्यांना त्याच्या चित्रपटांमध्ये भूमिका देता येईल, अशी टिप्पणी केली.


सुनावणीनंतर माध्यमांशी बोलताना राजपाल यादव म्हणाले, 'चित्रपटांसाठी कर्ज घेतले जात नाही. मी आधी स्वतःच शंभर चित्रपटांवर काम करत आहे, मग एक चित्रपट बनवण्यासाठी मला कर्जाची गरज का लागेल? माझ्या देशाबद्दल , सर्वोच्च न्यायालयाबद्दल आणि न्यायव्यवस्थेबद्दल मला आदर आहे. कोणताही निर्णय घेतला गेला तरी तो सर्वांना मान्य असेल.' असे राजपाल यादव म्हणाले.

Comments
Add Comment

Kaun Banega Crorepati : स्वप्न सत्यात उतरलं! KBC च्या मंचावर भूषण ठाकरे ठरला या सीजनचा पहिला करोडपती

मुंबई :  जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर एखादी व्यक्ती किती मोठे यश मिळवू शकते, याचे उदाहरण जळगावच्या 28 वर्षीय

महागुरु सचिन पिळगावकरांना मानद डॉक्टरेट! ग्वाल्हेरच्या ITM विद्यापीठाकडून गौरव

Sachin Pilgaonkar Doctorate University: मराठी चित्रपटसृष्टीतील महागुरुंचा ग्वालेरमध्ये डॉक्टर ऑफ लिट्रेचर पदवीने गौरव करण्यात आला आहे.

Nitesh Rane : ‘सिरीयल किलर’ नाटकाच्या 100 व्या प्रयोगाला मंत्री नितेश राणे यांची खास उपस्थिती; टीमचे केले कौतुक

मुंबई : मराठी रंगभूमीवरील ‘सिरीयल किलर’ या नाटकाने 100 प्रयोगांचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. मुंबईतील दादर

गोव्यात IFFI महोत्सवात महाराष्ट्राचे विशेष दालन; चित्रनगरीच्या 50 वर्षांचा गौरव

गोवा: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट

KBC मधील पंजाबवरील प्रश्नामुळे वाद; अमिताभ बच्चन आणि सोनी टीव्हीला कायदेशीर नोटीस

Kaun Banega Crorepati: महानायक अमिताभ यांचा कौन बनेगा करोडपती या सोनी टीव्हीवरील शोमुळे खुद्द बिग बी आणि चॅनेल दोघांच्या

Krrish 4: हृतिक रोशनच्या 'क्रिश 4' ला मिळणार भव्य रूप? नमित मल्होत्रा यांच्यासोबत चर्चा सुरू

Krrish 4: हृतिक रोशनच्या 'क्रिश' या चित्रपटाच्या पुनरागमनाची चर्चा गेल्या काही काळापासून सुरू आहे. आता 'क्रिश 4'