दुष्काळातही लाडकी बहीण योजना बंद होणार नाही - परभणीतील सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही

मुंबई : दुष्काळातही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी परभणी येथील सभेत दिली. ‘कोणीही आले तरी लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही’, असे त्यांनी स्पष्ट केले.


विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली. अडीच लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असलेल्या पात्र महिलांना या योजनेअंतर्गत दरमहा १ हजार ५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. योजनेसाठी विविध अटी निश्चित करण्यात आल्या असून, पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात रक्कम जमा केली जाते. योजनेचा लाभ पात्र महिलांनाच मिळावा आणि अपात्र लाभार्थींना वगळता यावे, यासाठी सरकारने ई-केवायसी प्रक्रिया सुरू केली. त्यानंतर ई-केवायसी न करणाऱ्या तसेच निकषांनुसार अपात्र ठरणाऱ्या अनेक महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आली. काही ठिकाणी पात्रतेच्या अटींचे पालन न करताही लाभ घेतल्याचे आढळून आले होते. त्यामुळे योजनेच्या लाभार्थी संख्येत घट झाली आहे.



दरम्यान, लाभार्थी महिलांची नावे वगळण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून योजना बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. योजनेच्या आर्थिक भाराबाबतही चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी योजना बंद होणार नसल्याचे स्पष्ट केले.

Comments
Add Comment

अंमली पदार्थांची साखळी तोडण्यासाठी पोलीस, एफडीए, एमआयडीसी एकत्र - २०२९ पर्यंत ‘अंमली पदार्थमुक्त महाराष्ट्रा’चे लक्ष्य

मुंबई : औद्योगिक वसाहतींच्या आडून होणाऱ्या सिंथेटिक आणि सेमी-सिंथेटिक अंमली पदार्थांच्या निर्मितीला, विक्रीला

25 Years Of Seva : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जनसेवेची 25 वर्षे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शुभेच्छा

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनाला 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने महाराष्ट्राचे

Nitesh Rane : मंत्री नितेश राणे आंध्र प्रदेशच्या दोन दिवसीय अभ्यास दौऱ्यावर

सिंधुदुर्ग : मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे आजपासून आंध्र प्रदेशच्या दोन दिवसीय अभ्यास

नीती आयोगाच्या 'डेल्टा रँकिंग'मध्ये गडचिरोली देशात प्रथम

मुंबई : नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्ह्यांच्या तिमाही डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोली जिल्ह्याने देशात प्रथम

Maharashtra Farmers : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्राकडे १७ हजार ५०० कोटींचा प्रस्ताव

- पिकांच्या नुकसानीसाठी १३ हजार कोटी; पशुधनासाठी चाऱ्याकरिता ४५०० कोटींची मागणी मुंबई : महाराष्ट्रातील

Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा हवामान बदलणार;'या' जिल्ह्यांत पावसाची शक्यता

महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्याची सुरुवात होताच अनेक भागांत उन्हाचा चटका वाढला आहे. दिवसा वाढलेली उष्णता आणि दमट