महाराष्ट्रातील बंदर विकासाला मिळणार नवी दिशा; मंत्री नितेश राणे यांच्याकडून कृष्णापटणम अदानी पोर्टची पाहणी

आंतरराष्ट्रीय स्तरावरील पायाभूत सुविधांचा अभ्यास करत महाराष्ट्रातील बंदरांचा चेहरामोहरा बदलण्यासाठी राज्य सरकार सज्ज झाले आहे. मंत्री नितेश राणे यांनी कृष्णापटणम पोर्टला भेट देऊन अत्याधुनिक कार्यपद्धतीची पाहणी केली.

राज्यातील बंदर क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी आणि सागरी व्यापाराला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आज आंध्र प्रदेशातील अत्याधुनिक कृष्णापटणम अदानी पोर्टला भेट देऊन तेथील जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. महाराष्ट्राच्या विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्याचा वापर करून राज्यातील बंदरांचा विकास जागतिक स्तरावर करण्याच्या दृष्टीने हा अभ्यासदौरा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. या दौऱ्यादरम्यान मंत्री नितेश राणे यांनी बंदरातील कार्गो हाताळणी व्यवस्था, खोल पाण्यातील जहाजांसाठी उपलब्ध असलेल्या विशेष सुविधा आणि दैनंदिन कामकाजातील अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा आढावा घेतला. बंदर विकास आणि जहाजबांधणी क्षेत्रातील सर्वोत्तम पद्धतींचा अभ्यास करून, त्यातील महाराष्ट्रासाठी उपयुक्त बाबींची राज्यात प्रभावी अंमलबजावणी केली जाईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या भेटीदरम्यान बंदर क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.



गुंतवणूक वाढवण्यासाठी धोरणात्मक चर्चा


बंदर क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी शासनाची भूमिका काय असावी, मंजुरी प्रक्रिया कशा पद्धतीने अधिक सुलभ करता येईल, उद्योगांसमोरील कामकाजातील अडचणी कशा दूर करता येतील आणि बंदरांच्या माध्यमातून व्यापक आर्थिक विकासाला चालना देणारी सक्षम परिसंस्था कशी निर्माण करता येईल, यावरही यावेळी चर्चा करण्यात आली.




महाराष्ट्रातील वाढवण बंदर, मरीन क्लस्टर, दिघी पोर्ट यांसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी आवश्यक असलेले कुशल आणि प्रशिक्षित मनुष्यबळ राज्यातच तयार करण्यासाठी आधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्रे उभारण्याचा येणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिली. आंध्र प्रदेशातील अदानी पोर्ट कृष्णापटनम येथील कार्गो हँडलिंग इक्विपमेंट ट्रेनिंग सिम्युलेटर्स तसेच ऑक्युपेशनल हेल्थ अँड सेफ्टी एक्सलन्स सेंटरला मंत्री नितेश राणे यांनी भेट देऊन तेथील प्रशिक्षण पद्धती आणि कौशल्यविकासाच्या उपक्रमांची माहिती घेतली. आधुनिक बंदरांसाठी कुशल, सुरक्षित आणि तंत्रज्ञानसज्ज मनुष्यबळ कशा पद्धतीने तयार केले जाते, याची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.


मंत्री नितेश राणे म्हणाले की, महाराष्ट्रात वाढवण बंदर, मरीन क्लस्टर, दिघी पोर्ट यांसारख्या प्रकल्पांच्या माध्यमातून बंदर आणि सागरी क्षेत्राच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. या प्रकल्पांना आवश्यक असलेले प्रशिक्षित मनुष्यबळ महाराष्ट्रातील तरुणांमधूनच उपलब्ध व्हावे, यासाठी कृष्णापटनम येथील प्रशिक्षण केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्रातही स्किल ट्रेनिंग सेंटर उभारणार आहे.


या माध्यमातून महाराष्ट्रातील तरुणांना आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योगाभिमुख कौशल्यांचे प्रशिक्षण मिळणार असून, रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्यासोबतच बंदर आणि सागरी क्षेत्राला आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ राज्यातच तयार होईल. विशेषतः कोकणासह राज्यातील किनारपट्टी भागातील तरुणांना स्थानिक पातळीवर कौशल्यविकासाच्या संधी उपलब्ध करून देत सागरी आणि बंदर क्षेत्रात उत्तम करिअर घडविण्याचा मार्ग खुला होईल, असा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.



महाराष्ट्राच्या किनारपट्टीचा होणार जागतिक विकास


महाराष्ट्राला मोठा समुद्रकिनारा लाभला असून राज्यातील बंदर विकासाला अथांग वाव आहे. राज्यातील बंदरांना आधुनिक, सक्षम आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनवण्यासाठी या अभ्यास दौऱ्यातून मिळालेले अनुभव मैलाचा दगड ठरणार आहे. या महत्त्वपूर्ण पाहणी दौऱ्यावेळी कृष्णापटणम पोर्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश पटेल, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे सीईओ प्रदीप पी., मुख्य बंदर अधिकारी प्रवीण खरा, आणि कार्यकारी अभियंता मनिष मेटकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


Comments
Add Comment

‘एमपीएससी’चे आंदोलन आता राजकीय झाले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; विद्यार्थ्यांच्या पाचही मागण्या आधीच मान्य

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांबाबत विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला आता

Mahila Shetkari Praman Patra : महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी ३७ लाखांहून अधिक अर्ज राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद

८९५ ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा, ६८ हजार ४३६ महिलांना प्रमाणपत्र मुंबई : शेतीतील महिलांच्या योगदानाला ओळख

अंमली पदार्थांची साखळी तोडण्यासाठी पोलीस, एफडीए, एमआयडीसी एकत्र - २०२९ पर्यंत ‘अंमली पदार्थमुक्त महाराष्ट्रा’चे लक्ष्य

मुंबई : औद्योगिक वसाहतींच्या आडून होणाऱ्या सिंथेटिक आणि सेमी-सिंथेटिक अंमली पदार्थांच्या निर्मितीला, विक्रीला

दुष्काळातही लाडकी बहीण योजना बंद होणार नाही - परभणीतील सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही

मुंबई : दुष्काळातही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी

25 Years Of Seva : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जनसेवेची 25 वर्षे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शुभेच्छा

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनाला 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने महाराष्ट्राचे

Nitesh Rane : मंत्री नितेश राणे आंध्र प्रदेशच्या दोन दिवसीय अभ्यास दौऱ्यावर

सिंधुदुर्ग : मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे आजपासून आंध्र प्रदेशच्या दोन दिवसीय अभ्यास