एकदा बाहेर तो कायमचा बाहेर! सुनेत्रा पवारांचा पक्षांतर्गत विरोधकांना इशारा; ‘अजितदादा मोठ्या मनाचे होते, दादांसारखी मी नाही’

मुंबई : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उफाळलेल्या बंडाळीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बंडखोरांना दम भरला आहे. ‘‘एकदा बाहेर तो कायमचा बाहेर, एवढे लक्षात ठेवा. अजितदादा खूप मोठ्या मनाचे होते, दादांसारखी मी नाही,’’ असे सांगत सुनेत्रा पवार यांनी नाव न घेता पुरुषोत्तम जगताप यांच्यावर निशाणा साधला. कारखाना निवडणुकीपुरते मर्यादित असलेले हे वक्तव्य पक्षातील मतभेदांच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ नेत्यांनाही सूचक इशारा मानले जात आहे.


सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली असून पुरुषोत्तम जगताप यांनी भाजपच्या पाठिंब्याने ‘लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनल’ निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. या पार्श्वभूमीवर प्रचारादरम्यान सुनेत्रा पवार यांनी कार्यकर्त्यांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. ‘‘आपल्या सर्वांचे संबंध चांगले आहेत. नंतर कोण जवळ येणार, अशा अनेक अफवा आहेत. कुठल्याही चुकीच्या अफवेला बळी पडू नका. एकदा बाहेर तो कायमचा बाहेर,’’ असे त्यांनी स्पष्ट केले.






अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली यापूर्वी काही नेत्यांशी मतभेद झाले तरी त्यांनी त्यांना पुन्हा सोबत घेतल्याचे संदर्भ देत सुनेत्रा पवार यांनी, ‘‘अजितदादा मोठ्या मनाचे होते; दादांसारखी मी नाही,’’ असे सांगितले. त्यामुळे सोमेश्वरच्या निवडणुकीतील बंडखोरीवरून त्यांनी पक्षातील भविष्यातील समीकरणांबाबतही कठोर भूमिका सूचित केल्याची चर्चा आहे.


दरम्यान, कारखान्याच्या अध्यक्षपदावरूनही सुनेत्रा पवार यांनी स्पष्टीकरण दिले. ‘‘अनेक चुकीच्या अफवा ऐकायला येत आहेत. कारखान्याचा अध्यक्ष सर्वसमावेशक असेल. सर्वांच्या मर्जीनुसार अध्यक्षाची निवड केली जाईल. अध्यक्ष अगोदरच ठरवलेला नाही. निवडणुकीच्या निकालानंतर अध्यक्ष कोण, हे ठरवू,’’ असे त्यांनी सांगितले.

तिरंगी निवडणूक


सोमेश्वर कारखान्याची निवडणूक आता तिरंगी झाली आहे. अजित पवार यांच्या पॅनलविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाने ‘सोमेश्वर शेतकरी विकास पॅनल’ उभे केले असून या पॅनलची जबाबदारी युगेंद्र पवार यांच्याकडे आहे. दुसरीकडे, पुरुषोत्तम जगताप यांच्या स्वतंत्र पॅनलमुळे निवडणुकीतील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. त्यामुळे कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने बारामतीतील पवार कुटुंबीयांच्या राजकारणातील अंतर्गत समीकरणेही चर्चेत आली आहेत.

Comments
Add Comment

Jharkhand Accident News: पत्नीच्या शिक्षकपदी निवडीचा आनंद ठरला अखेरचा प्रवास; भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू

Jharkhand Accident News: पत्नीची शिक्षकपदी निवड झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी मंदिरात निघालेल्या एका कुटुंबावर काळाने घाला

Uttar Pradesh Viral video : हुंड्याच्या हव्यासापोटी मागितली थेट 'महिंद्रा थार'; वधूच्या कुटुंबीयांनी भरमांडवात दाखवला आरसा!

Uttar Pradesh Viral video: हुंड्याच्या मागणीला उत्तर देण्यासाठी वधूच्या कुटुंबीयांनी अनोखी शक्कल लढवल्याची घटना उत्तर

Solapur Crime News: आईला त्रास देत असल्याच्या रागातून भावानेच भावाचा कुऱ्हाडीने वार करून खून; सोलापुरातील घटना

Solapur Crime News: सोलापूर शहरातील उमा नगरी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास भावानेच भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना

Haridwar Pod Taxi : हरिद्वारमध्ये 3,028 कोटींचा पॉड टॅक्सी प्रकल्प; हर की पौरी, मनसा देवीसह प्रमुख ठिकाणे जोडणार

Haridwar Pod Taxi : हरिद्वारमध्ये धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्या भाविकांना आणि पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू

Nashik Accident : नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर भीषण अपघात ! सिमेंट मिक्सरखाली चिरडून 18 वर्षीय तरुणीचा मृत्यू

नाशिक : नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध रस्त्यांची कामे वेगाने सुरू आहेत. मात्र, या

Jain Diksha Mahotsav : प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार; अहिंसा आणि जीवदयेचा विचार भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारतीय संस्कृती प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार देते. अहिंसा, त्याग, आत्मसंयम आणि जीवदया ही मूल्ये