मराठी चित्रपटसृष्टीत एक नवा आणि उत्कंठावर्धक कोर्टरूम ड्रामा प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘जनक’ असे या आगामी चित्रपटाचे नाव असून, चित्रपटाची संपूर्ण संकल्पना 'एक स्त्री, एक सत्य आणि एक लढा' या तीन महत्त्वाच्या सूत्रांभोवती फिरते. एका घटनेमुळे माणसाचे संपूर्ण आयुष्य कसे बदलून जाते आणि त्यातून स्वतःच्या स्वाभिमानाचा व न्यायाचा प्रश्न कसा निर्माण होतो, याचे वास्तववादी दर्शन या कोर्टरूम ड्रामाद्वारे घडवले जाणार आहे. रहस्याचे जाळे आणि तीव्र संघर्षाची जोड यामुळे हा थ्रिलर सिनेमा प्रेक्षकांना खिळवून ठेवेल, असा विश्वास मोशन पोस्टरवरून व्यक्त होत आहे.
स्वाभिमान, सत्य आणि न्यायाची लढाई ! कोर्टरूम ड्रामाचा अनोखा मेळ साधणाऱ्या ‘जनक’ या आगामी मराठी चित्रपटाचा मोशन पोस्टर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. दिग्दर्शक अभिषेक कंवर यांच्या या चित्रपटाच्या मोशन पोस्टरमधून रहस्य, संघर्ष आणि न्यायाच्या लढाईची झलक पाहायला मिळते. काही सेकंदांच्या या मोशन पोस्टरमधूनच चित्रपटातील संघर्षाची तीव्रता आणि पुढे उलगडणाऱ्या रहस्याची उत्सुकता निर्माण होते.
‘भूल भुलैया’ मधला छोटा पंडित असो, ‘हंगामा’ मधला राजा असो किंवा ‘वेलकम’ मधला तो अतरंगी अभिनेता… राजपाल यादव यांनी गेली अनेक दशकं आपल्या विनोदाने ...
आर. टी. बी. फिल्म्स निर्मित आणि अभिषेक कंवर दिग्दर्शित या कोर्टरूम ड्रामा मध्ये अविनाश नारकर, सायली संजीव आणि सुरेश विश्वकर्मा हे प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. त्याचबरोबर विनिता काळे, अनुष्का पिंपुटकर, ओंकार भसमे, प्रसाद ओझरकर यांच्यासह अनेक नामवंत मराठी कलाकार सिनेमात दिसणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक कंवर यांनी केले असून, कथा, पटकथा आणि संवादलेखन ओंकार भसमे यांचे आहे. त्रिलोक सिंग राजपूत असोसिएट प्रोड्युसर, सुजीत मुकाटे कार्यकारी निर्माते असून आदित्य कडताने यांनी संगीताची जबाबदारी सांभाळली आहे.
एक स्त्री… एक सत्य… आणि एक लढा या तीन सूत्रांभोवती गुंफलेली ही कथा नेमकं सत्य काय आहे आणि न्यायाच्या या लढाईत कोण जिंकणार ? याची उत्सुकता निर्माण करते. अभिषेक कंवर दिग्दर्शित आणि आर टी बी फिल्म्स प्रस्तुत जनक हा थ्रिलर कोर्टरूम ड्रामा नोव्हेंबर २०२६ मध्ये महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.