Maharashtra Farmers : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्राकडे १७ हजार ५०० कोटींचा प्रस्ताव

शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी राज्याने १३ हजार कोटी रुपयांची मागणी केली आहे.

- पिकांच्या नुकसानीसाठी १३ हजार कोटी; पशुधनासाठी चाऱ्याकरिता ४५०० कोटींची मागणी


मुंबई : महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकरी आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे १७ हजार ५०० कोटी रुपयांच्या अंतरिम आर्थिक मदतीचा प्रस्ताव पाठवला आहे. यामध्ये खरीप पिकांच्या नुकसानीपोटी १३ हजार कोटी, तर दुष्काळग्रस्त भागातील पशुधनासाठी चारा उपलब्ध करून देण्यासाठी ४ हजार ५०० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाकडून हा प्रस्ताव केंद्राकडे सादर करण्यात आला आहे.


राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचे पथकही पाहणीसाठी येणार असून, पिकांचे नुकसान, पाणीटंचाई आणि पशुधनावरील परिणामाचा प्रत्यक्ष आढावा घेतला जाणार आहे. खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी राज्याने १३ हजार कोटी रुपयांची मागणी केली आहे. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे आणि सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष नुकसान स्पष्ट होणार असून, त्याच्या आधारे मदतीचे वितरण केले जाणार आहे.


दुष्काळाचा फटका शेतीबरोबरच पशुधनालाही बसत आहे. पावसाअभावी चाऱ्याची उपलब्धता कमी झाल्याने दुष्काळग्रस्त भागातील जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. त्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे ४ हजार ५०० कोटी रुपयांची मागणी केली आहे. पिकांच्या नुकसानीसाठी प्रस्तावित आर्थिक मदतीमध्ये केंद्र सरकारचा ७५ टक्के आणि राज्य सरकारचा २५ टक्के हिस्सा राहणार आहे. केंद्राकडून प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर मदत वितरणाची पुढील प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.

पंचनाम्यानंतर अंतिम प्रस्ताव


- सध्या १७ हजार ५०० कोटी रुपयांचा प्रस्ताव अंतरिम स्वरूपाचा आहे. पिकांचे पंचनामे आणि सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर नुकसानीचा अंतिम आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष नुकसान लक्षात घेऊन केंद्राकडे अंतिम आर्थिक मदतीचा प्रस्ताव सादर केला जाईल. त्यामुळे नुकसानाचा अहवाल आल्यानंतर सध्याच्या प्रस्तावातील रक्कम वाढण्याची शक्यता आहे.
- राज्यात २५ सप्टेंबरच्या शासन निर्णयानुसार २०२६च्या खरीप हंगामातील ‘ट्रिगर-१’ लागू झालेल्या २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून विविध सवलती व उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत.
- दुष्काळामुळे पिकांचे झालेले नुकसान, चाऱ्याची निर्माण झालेली टंचाई आणि त्याचा ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम लक्षात घेता केंद्राकडून प्रस्तावाला किती मदत मिळते, याकडे आता लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

25 Years Of Seva : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जनसेवेची 25 वर्षे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शुभेच्छा

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनाला 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने महाराष्ट्राचे

Nitesh Rane : मंत्री नितेश राणे आंध्र प्रदेशच्या दोन दिवसीय अभ्यास दौऱ्यावर

सिंधुदुर्ग : मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे आजपासून आंध्र प्रदेशच्या दोन दिवसीय अभ्यास

नीती आयोगाच्या 'डेल्टा रँकिंग'मध्ये गडचिरोली देशात प्रथम

मुंबई : नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्ह्यांच्या तिमाही डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोली जिल्ह्याने देशात प्रथम

Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा हवामान बदलणार;'या' जिल्ह्यांत पावसाची शक्यता

महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्याची सुरुवात होताच अनेक भागांत उन्हाचा चटका वाढला आहे. दिवसा वाढलेली उष्णता आणि दमट

अवैध गर्भलिंग निदानाविरोधात राज्य सरकार ॲक्शन मोडवर, टास्क फोर्स सक्रिय

मुंबई: काही महिन्यांपूर्वी राज्यामध्ये अनेक ठिकाणी अवैध गर्भलिंग निदान आणि बेकायदेशीर गर्भपात केला जात

मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत OBC समाजाच्या मागण्यांवर चर्चा, सरकारकडून सकारात्मक निर्णयाचे आश्वासन

मुंबई: मंत्रालयामध्ये आज झालेल्या मंत्रीमंडळ उपसमितीच्या बैठकीमध्ये अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी