RBI Repo Rate: आरबीआयने रेपो रेट केला जाहीर, नेमकं काय आहे? जाणून घ्या

जवळपास चार वर्षांनंतर प्रथमच रेपो दरात वाढ करण्यात आली आहे.

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने कर्जदारांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 5 ते 7 ऑक्टोबरदरम्यान झालेल्या पतधोरण समितीच्या बैठकीनंतर RBI ने रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉइंट्सची वाढ केली आहे. त्यामुळे रेपो रेट आता 5.50% झाला आहे. जवळपास चार वर्षांनंतर प्रथमच रेपो दरात वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी रेपो रेट साधारण हा 5.25% वर स्थिर होता. या निर्णयाचा परिणाम गृहकर्ज, वाहन कर्ज आणि इतर कर्जांच्या व्याजदरावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही कर्जदारांच्या EMI मध्ये वाढ होऊ शकते.



महागाईचा धोका वाढतोय


RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पतधोरणाची माहिती देताना पश्चिम आशियातील संघर्ष, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि जागतिक पातळीवरील महागाईचा दबाव याकडे लक्ष वेधले. वाढत्या तेलाच्या किमती आणि खाद्यपदार्थांच्या दरातील बदलांमुळे महागाईचा धोका वाढत असल्याचे RBI ने म्हटले आहे.


रेपो रेटसोबतच SDF दर 5.25% करण्यात आला आहे. तर MSF आणि बँक रेट 5.75% करण्यात आले आहेत. तसेच RBI ने आपल्या पतधोरणाची भूमिका 'न्यूट्रल'वरून 'कॅलिब्रेटेड टाइटनिंग' म्हणजेच महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक कडक धोरणाकडे वळवली आहे. त्यामुळे भविष्यात लगेच रेपो दरात कपात होण्याची शक्यता कमी असल्याचे संकेत मिळत आहेत.






रेपो दरात वाढ करण्याव्यतिरिक्त रिझर्व्ह बॅंकेने आर्थिक वर्ष 2027 साठीचा आपला मुख्य महागाईचा अंदाजही 4.3% वरून 4.4%पर्यंत वाढवला आहे. महागाईचा अंदाजही RBI ने वाढवला आहे. आर्थिक वर्ष 2026-27 साठी CPI महागाईचा अंदाज 5.2% करण्यात आला आहे. कच्च्या तेलाच्या किमती, मान्सूनची स्थिती आणि एल निनोमुळे निर्माण होणारे धोके यांचा महागाईवर परिणाम होऊ शकतो.


दरम्यान, महागाईचा दबाव वाढत असला तरी भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीबाबत RBI सकारात्मक आहे. आर्थिक वर्ष 2026-27 साठी वास्तविक GDP वाढीचा अंदाज 6.7% वरून वाढवून 7.1% करण्यात आला आहे. दुसऱ्या तिमाहीसाठी GDP वाढीचा अंदाज 7.2%, तर तिसऱ्या तिमाहीसाठी 6.9% ठेवण्यात आला आहे.



रेपो रेट म्हणजे काय? 


रेपो रेट म्हणजे RBI कडून बँकांना अल्प कालावधीसाठी मिळणाऱ्या कर्जाचा दर. हा दर वाढल्यास बँकांचा निधीचा खर्च वाढू शकतो आणि त्याचा परिणाम ग्राहकांच्या कर्जाच्या व्याजदरावर होऊ शकतो. त्यामुळे आगामी काळात कर्जदारांच्या EMI वर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Gaurav Khanna: आकांक्षा चामोलासोबतच्या नात्यावर गौरव खन्नाचं वक्तव्य; लग्नातील स्थिरतेला दिलं महत्त्व

गेली काही वर्षे अभिनेता गौरव खन्नासाठी चढ उतारांनी भरलेली होती. एकीकडे 'सेलिब्रिटी मास्टरशेफ' आणि 'बिग बॉस १९'

IND vs NZ: भारताने न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटी केली ऐतिहासिक कामगिरी, 149 वर्षात पहिल्यांदाच असं घडलं

[caption id="attachment_1077725" align="aligncenter" width="800"] न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे. वेलिंग्टन

Shafqat Amanat Ali: 'मितवा' फेम गायक शफकत अमानत अली कॅन्सरशी झुंज देत होते; आता पुन्हा संगीतविश्वात परतणार

Mitwa Singer: 'मितवा' फेम सुप्रसिद्ध गायक शफकत अमानत अली सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. गायकाने आपल्या

मुंबई सेंट्रलमध्ये इमारतीला भीषण आग; 8 जणांची सुखरूप सुटका, अग्निशमन अधिकारी जखमी

मुंबई सेंट्रलमधील गिल्डर लेन येथील एका निवासी इमारतीला रविवारी मध्यरात्रीनंतर भीषण आग लागली. या आगीत वृद्ध

Yachting Championship: समुद्राच्या लाटांवर रंगली यॉटिंगची स्पर्धा; 121 नौकानयनपटूंनी दाखवले कौशल्य

मुंबईच्या समुद्रकिनारी राष्ट्रीय यॉटिंग स्पर्धेचा उत्साह पाहायला मिळाला. देशातील विविध भागांतून आलेल्या

विधान भवन आणि एअर इंडिया इमारतीजवळील खाद्य स्टॉल्सवर FDAचा दंड; ज्यूस स्टॉलचा परवाना निलंबित

विधान भवन आणि नरिमन पॉइंट येथील एअर इंडिया इमारतीच्या परिसरात कार्यरत असलेले खाण्याचे स्टॉल्स आणि खाद्य