Central Railway: मध्य रेल्वेने लाखो विना तिकीट प्रवाशांकडून करोडो रूपयांचा दंड वसूल
मध्य रेल्वेने विनातिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून कोट्यवधी रूपयांचा दंड वसूल केला आहे.
October 8, 2026 10:08 PM
फोटो सौजन्य: ANI News
मुंबई: मध्य रेल्वेने विनातिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून कोट्यवधी रूपयांचा दंड वसूल केला आहे. मध्य रेल्वेकडून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फुकट्या प्रवाशांवर ही धडक कारवाई करण्यात आलेली आहे. सुरक्षित, सुलभ आणि सन्मानजनक प्रवासाची खात्री करण्याच्या आपल्या कटिबद्धतेनुसार, मध्य रेल्वेने संपूर्ण मार्गिकेवर अनधिकृत आणि विनातिकीट प्रवासाविरुद्धची कारवाई अधिक तीव्र केली आहे. किमान दंडाच्या रकमेत झालेली वाढ आणि तिकीट तपासणीच्या तीव्र मोहिमांमुळे आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये अनेक विनातिकिट प्रवाशांवर कारवाई करण्यात आलेली आहे.
मुंबई: कफ परेड ते आरे जेव्हीएलआर मार्गावरील ॲक्वा लाईन मेट्रोला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. वर्षभरामध्ये मुंबईकरांनी ॲक्वा लाईनला दमदार प्रतिसाद दिला ...
मध्य रेल्वेने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केलेली कारवाई एप्रिल 2026 ते सप्टेंबर 2026 पर्यंतची आहे. एप्रिल ते सप्टेंबर 2026 या कालावधीत मध्य रेल्वेने विक्रमी कारवाई केलेली आहे. मध्य रेल्वेच्या तिकिट तपासणाऱ्या अधिकाऱ्यांनी विनातिकीट किंवा अयोग्य/ अवैध प्रवास प्राधिकरणासह प्रवास करणाऱ्या 20.47 लाख प्रवाशांना पकडले. 159.34 कोटी रूपयांचा विक्रमी दंड वसूल केला. गेल्या वर्षी याच कालावधीत 20.05 लाख प्रकरणे आणि 116.46 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता, त्या तुलनेत ही आकडेवारी अधिक आहे. यावरून उत्पन्नात 37% पेक्षा जास्त लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येते.
एप्रिल ते सप्टेंबर 2026 कालावधीत दंड वसुलीची आणि प्रकरणांची संख्या
मुंबई विभाग: 10.11 लाख प्रकरणांतून 66.92 कोटी रुपये.
भुसावळ विभाग: 3.77 लाख प्रकरणांतून 38.90 कोटी रुपये.
पुणे विभाग: 2.13 लाख प्रकरणांतून 18.68 कोटी रुपये.
नागपूर विभाग: 2.36 लाख प्रकरणांतून 17.93 कोटी रुपये.
सोलापूर विभाग: 1.10 लाख प्रकरणांतून 7.27 कोटी रुपये.
मुंबई : मुंबईतील मुलुंड पूर्व परिसरात गुरुवारी एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या आवारात भीषण आगीची घटना घडली. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) ...
सप्टेंबर 2026 महिन्यात, मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी पथकांनी विनातिकीट किंवा अवैध तिकीटासह प्रवास करणाऱ्या 2.44 लाख प्रवाशांवर कारवाई करत त्यांच्याकडून 18.53 कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. वैध तिकिटाशिवाय प्रवास करणे हा रेल्वे कायद्यांतर्गत गुन्हा आहे आणि त्यासाठी दंडात्मक कारवाई केली जाते. विनातिकीट प्रवासामुळे रेल्वेच्या महसुलावरही परिणाम होतो. हा महसूल प्रवाशांच्या सुविधा, सुरक्षा आणि पायाभूत सुविधांच्या सुधारणेसाठी वापरला जातो. विनातिकीट प्रवासासाठी किमान दंड 250 रुपयांवरून 500 रुपये करण्यात आल्यानंतर, मध्य रेल्वेने आपल्या हद्दीतील सर्व रेल्वे स्थानकांवर तिकीट तपासणीची तीव्र मोहीम सुरू ठेवली आहे.
मध्य रेल्वेवरील पायाभूत सुविधांचा विकास आणि रेल्वे प्रवासाचा वेग वाढवण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात येत आहे. आसनगाव ते कसारा दरम्यानच्या ...
मध्य रेल्वेकडून स्थानकांवरील तपासणी, अचानक तपासणी, 'फोर्ट्रेस' तपासणी (स्थानक पूर्णपणे सील करून केलेली तपासणी), सखोल तपासणी आणि 'मेगा' तिकीट तपासणी मोहीम अशा विविध पद्धतींचा अवलंब केला जात आहे. या मोहिमा मेल/एक्सप्रेस गाड्या, पॅसेंजर गाड्या, विशेष गाड्या तसेच मुंबई आणि पुणे विभागांतील उपनगरीय रेल्वे सेवांमध्ये राबविल्या जात आहेत. मध्य रेल्वेने प्रवाशांना दंड टाळण्यासाठी योग्य आणि वैध तिकीट काढून सन्मानाने आणि जबाबदारीने प्रवास करण्याचे आवाहन सर्व प्रवाशांना केले आहे. विनातिकीट प्रवासाबाबत रेल्वेचे धोरण 'झिरो टॉलरन्स' (कोणतीही सवलत न देणारे) आहे आणि प्रवाशांचा प्रवास सुखकर व सन्मानजनक असेल याची खात्री करण्यासाठी कायमच रेल्वे कटिबद्ध आहे.