Thursday, October 8, 2026

Mulund Fire News : मुलुंडमध्ये बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या आवारात भीषण आग; ७ गॅस सिलिंडरचे एकापाठोपाठ एक स्फोट, मोठी जीवितहानी टळली

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) प्रकल्पग्रस्तांसाठी (PAP) उभारल्या जाणाऱ्या या इमारतीच्या आवारातील कामगारांच्या तात्पुरत्या निवार्याला (लेबर कॅम्प) ही आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू केले.

मुंबई : मुंबईतील मुलुंड पूर्व परिसरात गुरुवारी एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या आवारात भीषण आगीची घटना घडली. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) प्रकल्पग्रस्तांसाठी (PAP) उभारल्या जाणाऱ्या या इमारतीच्या आवारातील कामगारांच्या तात्पुरत्या निवार्याला (लेबर कॅम्प) ही आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू केले.

सिलिंडरच्या स्फोटांमुळे आग आणखी भडकली

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बांधकामावर काम करणाऱ्या मजुरांच्या राहण्यासाठी येथे तळमजला अधिक एक मजला (Ground+1) अशा स्वरूपाचा लेबर कॅम्प तयार करण्यात आला होता. सुरुवातीला एका छोट्याशा ठिकाणी लागलेली आग बघता बघता पसरली आणि तिथे ठेवलेल्या गॅस सिलिंडरपर्यंत पोहोचली. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, आगीच्या ज्वालांमुळे तिथे असलेल्या तब्बल ७ गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला, ज्यामुळे परिसर हादरून गेला.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

आगीचे आणि धुराचे लोट दूरवरून दिसत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली. या घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. व्हिडिओंमध्ये कामगारांच्या या तात्पुरत्या निवासाला भीषण आगीने कशाप्रकारे वेढले आहे आणि आकाशात काळ्या धुराचे साम्राज्य कसे पसरले आहे, हे स्पष्ट दिसत आहे.

कामगार सुरक्षित; मोठी दुर्घटना टळली

सुदैवाने आग लागल्याचे लक्षात येताच आवारात उपस्थित असलेल्या सर्व कामगारांना वेळेवर आणि सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. त्यामुळे या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कोणीही जखमी झाले नाही, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

आगीचे मूळ कारण अस्पष्ट; पोलिसांकडून तपास सुरू

आग नेमकी कशामुळे लागली याचे अचूक कारण अद्याप समोर आलेले नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली की तिथे स्वयंपाक करताना अपघात घडला, या सर्व बाजूंचा तपास पोलिसांकडून आणि अग्निशमन दलाकडून केला जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >