Thursday, October 8, 2026

Mumbai Metro 3 Aqua Line ची वर्षपुर्ती, MMRC कडून प्रवाशांसाठी खास उपक्रम

Mumbai Metro Aqua Line: मुंबई मेट्रो 3 ॲक्वा लाईनच्या वर्षपुर्तीनिमित्त MMRC ने विशेष उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई: कफ परेड ते आरे जेव्हीएलआर मार्गावरील ॲक्वा लाईन मेट्रोला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. वर्षभरामध्ये मुंबईकरांनी ॲक्वा लाईनला दमदार प्रतिसाद दिला आहे. वर्षभरामध्ये या मार्गावरून तब्बल 7 कोटी प्रवाशांनी प्रवास केला आहे. वर्षभरामध्ये या मेट्रो मार्गाने 7 कोटींहून अधिक प्रवाशांनी प्रवास करत महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. या मेट्रो मार्गावर महत्त्वाचे मार्ग असल्यामुळे प्रवाशांकडून या ॲक्वा लाईन मेट्रोला दमदार प्रतिसाद मिळत आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून चालवल्या जाणाऱ्या ह्या पहिल्या भूमिगत मेट्रो मार्गिकेला वाढता प्रतिसाद मिळत आहे.

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRC) कडून चालवल्या जाणाऱ्या ‘ॲक्वा लाईन’ मार्गिकेवर 7 लाखांहून अधिक प्रवाशांनी एका वर्षामध्ये प्रवास केला आहे. कफ परेड ते आरे जेव्हीएलआर मार्गावर आतापर्यंत 7,18,52,473 प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद करण्यात आली आहे. मेट्रो मार्गिका ऑक्टोबर 2025 पासून सुरू झाल्यापासून प्रवाशांचा उत्सफुर्त प्रतिसाद मिळत आहे. सप्टेंबर 2026 मध्ये सोमवार ते शुक्रवार दरम्यान, दररोज सरासरी 2,24,602 प्रवाशांनी, तर शनिवार आणि रविवार या दिवशी दररोज सरासरी 1,31,138 प्रवाशांनी ‘ॲक्वा लाईन’ने प्रवास केला. मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासातील ‘ॲक्वा लाईन’चे वाढते महत्त्व यावरून स्पष्ट होते.

MMRC कडून ‘ॲक्वा लाईन time capsule’ आणि ‘ॲक्वा लाईन पासपोर्ट व शिक्का’ हे दोन विशेष उपक्रम करण्यात येणार आहेत. ‘ॲक्वा लाईन time capsule’ हा भारतातील मेट्रो क्षेत्रातील अशा स्वरूपाचा पहिलाच उपक्रम आहे. ‘अॅक्वा लाईन’च्या उभारणीपासून ते तिच्या कार्यान्वयनापर्यंतच्या प्रवासातील महत्त्वाची कागदपत्रे, छायाचित्रे, महत्त्वाचे टप्पे आणि आठवणी यात जतन केल्या जाणार आहेत. 2026 मधील ‘ॲक्वा लाईन’ आणि मुंबईचे एक चित्र पुढील पिढ्यांसाठी जतन करण्याचा हा प्रयत्न आहे. प्रवाशांना ‘ॲक्वा लाईन’चा प्रवास अधिक आनंददायी आणि वेगळ्या पद्धतीने अनुभवता यावा यासाठी ‘ॲक्वा लाईन पासपोर्ट व शिक्का’ हा उपक्रमही सुरू करण्यात येणार आहे.

या उपक्रमांतर्गत प्रवासी आणि मेट्रोप्रेमींना मार्गिकेवरील निवडक स्थानकांना भेट देऊन तेथील वैशिष्ट्यपूर्ण स्थानक- शिक्का संग्रहित करता येणार आहेत. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे म्हणाल्या, “मेट्रो लाईन 3 ‘ॲक्वा लाईन’च्या संपूर्ण मार्गावरील सेवेला एक वर्ष पूर्ण होत असताना, तिला आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग म्हणून स्वीकारल्याबद्दल मी मुंबईकरांचे मनापासून आभार मानते. 7 कोटी प्रवासी प्रवासांचा टप्पा गाठणे हा मुंबईकरांचा ‘ॲक्वा लाईन’वरील विश्वास आणि पाठिंबा दर्शवणारा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. Time capsule आणि पासपोर्ट व शिक्का संग्रह हे उपक्रम या सामूहिक प्रवासाचा आनंद साजरा करण्यासोबतच त्याच्या आठवणी पुढील पिढ्यांसाठी जतन करण्याचा आमचा प्रयत्न आहे.” मुंबईकरांनी त्यांच्या दैनंदिन प्रवासासाठी यापुढेही ‘ॲक्वा लाईन’ची निवड करावी, अशी MMRC ची अपेक्षा आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >