Thursday, October 8, 2026

Nana Patekar Passes Away : 'मी माझ्या सरणासाठी लागणारी लाकडं जमा करुन ठेवलीत..., नाना पाटेकर यांचं अंगावर काटा आणणारं 'ते' वक्तव्य

नाना पाटेकर यांच्या जुन्या मुलाखती, भाषणं आणि त्यांचे परखड विचार असलेले अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत. त्यापैकी त्यांच्या मृत्यूविषयी केलेल्या एका जुन्या वक्तव्याची सध्या विशेष चर्चा होत आहे.

Nana Patekar Passes Away : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने मराठी तसेच हिंदी मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. आपल्या दमदार अभिनयासाठी आणि बेधडक व्यक्तिमत्त्वासाठी ओळखले जाणारे नाना पाटेकर यांच्या आठवणींना सध्या सोशल मीडियावर उजाळा दिला जात आहे. नानांच्या जुन्या मुलाखती, भाषणं आणि त्यांचे परखड विचार असलेले अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत. त्यापैकी त्यांच्या मृत्यूविषयी केलेल्या एका जुन्या वक्तव्याची सध्या विशेष चर्चा होत आहे.

'मी माझ्या सरणासाठी लागणारी लाकडं जमा करुन ठेवलीत'

दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी नाना पाटेकर यांचा एक जुना व्हिडीओ ट्वीट केला आहे. या व्हिडिओत नाना पाटेकर यांनी या व्हिडीओमध्ये नाना पाटेकरांनी आपल्या मृत्यूबाबत थेट वक्तव्य केलंय. मृत्यू हा आयुष्याचा अपरिहार्य भाग आहे, अशी त्यांची भूमिका या संवादातून जाणवते. या मुलाखतीत नाना आपल्या अंत्यसंस्काराची तयारी आणि त्यासाठी लागणाऱ्या लाकडांबाबत अंगावर काटा आणणारे पण मिश्कील शैलीत भाष्य केले आहे. आपल्या सरणासाठी लागणारी लाकडं आधीच जमा करून ठेवली असल्याचं ते सांगतात.

 

...हिच माझी शेवटची संपत्ती

"मला माहितीय कधी ना कधी मला जायचंय, त्यासाठी 12 मण लाकडं लागणार आहेत, तेवढीच लागणार आहेत... हिच माझी शेवटची संपत्ती... बाळा मी माझ्या सरणासाठी लागणारी लाकडं जमा करुन ठेवलीत, ती सगळी लाकडं सुकलेली आहेत, त्यातच मला जाळायचंय, ओली लाकडं अजिबातच वापरु नका, नाहीतर खूप धूर होईल... मित्र-मंडळी, शेजारी-पाजारी सगळेच जमा होतील... त्यांच्या डोळ्यांत धूर जाईल, पाणी येईल त्यांच्या डोळ्यांतून... आणि माझ्या मृत्यूनंतर गैरसमज होईल की, हे सगळे माझ्यासाठीच रडतायत... कमीत कमी मी मेल्यानंतर तरी गैरसमज नकोत...", असं अंगावर काटा आणणारं वक्तव्य नाना पाटेकरांनी केले होतं.

नानांच्या बेधडक शैलीची पुन्हा चर्चा

नाना पाटेकर यांची खासियत म्हणजे ते कोणताही विषय असो, आपलं मत अत्यंत थेट आणि स्पष्टपणे मांडायचे. मृत्यूसारख्या गंभीर विषयाकडेही त्यांनी आपल्या मिश्कील आणि उपरोधिक शैलीतून पाहिलं. त्यांचा हा जुना व्हिडीओ पुन्हा समोर आल्यानंतर चाहते भावुक होत आहेत. नानांच्या अभिनयासोबतच त्यांची स्पष्टवक्तेपणाची शैली, विचार करण्याची पद्धत आणि आयुष्याकडे पाहण्याचा त्यांचा वेगळा दृष्टिकोन पुन्हा चर्चेत आला आहे. नानांच्या निधनाच्या वृत्तामुळे चाहत्यांमध्ये शोककळा पसरली असून, सोशल मीडियावर त्यांच्या जुन्या आठवणी आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत. त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीतील भूमिका आणि संवाद कायमच प्रेक्षकांच्या स्मरणात राहतील.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >