शनी साडेसाती काळात सोन्याचे दागिने घालणं अशुभ असतं का? ज्योतिषशास्त्र काय सांगते?
October 8, 2026 04:25 PM
शनी साडेसाती काळात भल्याभल्यांना घाम फुटतो. त्यामुळे साडे सात वर्षांच्या कालावधीत ज्योतिष काळजी घेण्यास सांगतात. साडेसातीत सोनं घालू नये, असं बोललं जातं. पण असं का सांगतात? ते जाणून घेऊयात.. (Photo- AI)
1/6 शनिची साडेसाती असली की सावधपणे पावलं टाकावी, असा सल्ला ज्योतिष देतात. या कालावधीत व्यक्तीला अनेक आव्हानांना सामोरं जावं लागू शकते. शनी साडेसातीत सोनं घालावं की नाही? असा प्रश्न अनेकांना पडतो. शनी आणि सोन्याचं काय आहे समीकरण? ज्योतिषशास्त्र काय सांगते जाणून घ्या. (Photo: AI)
2/6 ज्योतिषशास्त्रानुसार, शनी साडेसातीच्या काळात सोनं घालणं अशुभ मानलं जातं. कारण सोन्याचा संबंध थेट सूर्य ग्रहाशी जोडला जातो. सूर्य आणि शनी हे पिता पूत्र आहेत. पौराणिक कथेनुसार, या दोघांचं एकमेकांशी पटत नाही. त्यामुळे सोनं परिधान करणं टाळावं असं सांगितलं जातं.(Photo: AI)
3/6 ज्योतिषशास्त्रानुसार, साडेसातीच्या काळात सोनं घातलं तर शनीदेव नाराज होतात. त्यामुळे नकारात्मक परिणाम मिळतात. सोनं परिधान केल्याने सूर्याची उर्जा मिळते. त्यामुळे या कालावधीत व्यक्ती अधिक चिडखोर होतो.(Photo: AI)
4/6 ज्योतिषशास्त्रानुसार, शनी साडेसातीचा प्रभाव कमी करण्यासाठी लोखंडाची अंगठी घालण्याचा सल्ला दिला जातो. उजव्या हाताच्या मधल्या बोटात ही अंगठी घालणं शुभ मानलं जातं. घोड्याची नाळ किंवा होडीच्या खिळ्यापासून तयार केलेली लोखंडी अंगठी प्रभावी ठरते.(Photo: AI)
5/6 ज्योतिषशास्त्रानुसार, शनी ग्रहाचं प्रमुख रत्न नीलम आहे. साडेसाती काळात नीलम रत्न असलेली अंगठी परिधान केल्याने शनिचा प्रभाव कमी होतो. पण हे रत्न ज्योतिष्यांच्या सल्लानेच परिधान करावं.(Photo: AI)
6/6 ज्योतिषशास्त्रानुसार, नीलम ग्रह परिधान करण्यासाठी शुक्ल पक्षातील शनिवार निवडावा. तसेच नीलम हे रत्न चांदी, पंचधातू जडवून घालावं. पण सर्व उपाय करताना ज्योतिष्यांचा सल्ला घ्यावा. (Photo: AI) (Disclaimer: या बातमीतील माहिती धार्मिक श्रद्धा आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. प्रहार डॉट इन त्याची पुष्टी करत नाही. )