Tuesday, November 24, 2026

कसोटीत प्रतिस्पर्ध्यांना 100 धावांच्या आत सर्वाधिक वेळा ऑल-आऊट करण्याचा विश्वविक्रम कोणाच्या नावावर? जाणून घ्या

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेमुळे गेल्या काही वर्षात कसोटीचं महत्त्व वाढलं आहे. अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी चढाओढ सुरू आहे. असं असताना एका विक्रमाची चर्चा होत आहे. कसोटीत प्रतिस्पर्धी संघाला 100 धावांच्या आत गुंडाळणारा संघ कोणता? चला जाणून घेऊयात..

1/5 क्रिकेट इतिहासात अनेक विक्रम रचले आणि मोडले गेलेत. त्यामुळे प्रत्येक विक्रमाची चर्चा होत असते. दक्षिण अफ्रिका बांगलादेश कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याची अशीच चर्चा आहे. कारण दक्षिण अफ्रिकेने बांगलादेशला 91 धावांवर गुंडाळलं. प्रतिस्पर्धी संघाला 100 धावांच्या आत गुंडाळण्याची ही दक्षिण अफ्रिकेची ही 24वी वेळ आहे. (Photo: Proteas Cricket Twitter) 2/5 दक्षिण अफ्रिकेने 24व्यांदा ही कामगिरी केली असली तरी कसोटीत हा विक्रम कोणाच्या नावावर आहे? हा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. वर्ल्ड रेकॉर्डनुसार इंग्लंडच्या नावावर हा विक्रम आहे. इंग्लंडने प्रतिस्पर्धी संघाला कसोटीत 86वेळा 100 धावांच्या आत गुंडाळलं आहे. (Photo: Proteas Cricket Twitter) 3/5 ऑस्ट्रेलियाने कसोटी अशी कामगिरी 57 वेळा केली आहे आणि या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियानंतर दक्षिण अफ्रिकेचा क्रमांक लागतो. 24 वेळा अशी कामगिरी करून तिसरं स्थान गाठलं आहे. (Photo: ANI) 4/5 आशियाई देशात प्रतिस्पर्धी संघाला सर्वाधिक वेळा 100 धावांच्या आत गुंडाळण्याचा विक्रम पाकिस्तानच्या नावावर आहे. पाकिस्तानने अशी कामगिरी 17वेळा केली आहे. म्हणजेच आशियाई देशांमध्ये पाकिस्तानचा संघ अव्वल स्थानी आहे. (Photo: ICC) 5/5 भारतीय संघ या यादीत कितव्या स्थानावर आहे हा प्रश्न पडणं सहाजिकच आहे. पाकिस्ताननंतर या यादीत भारताचा क्रमांक लागतो. भारताने प्रतिस्पर्धी संघाला 11वेळा 100 धावांच्या आत गुंडाळलं आहे. (Photo: ICC)  
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >