Thursday, October 8, 2026

Nana Patekar: निधनानंतरही चाहत्यांना नाना पाटेकर रुपेरी पडद्यावर पाहता येणार, कसं काय? ते जाणून घ्या

Nana Patekar Movie: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर चाहत्यांना त्यांच्या चित्रपटांतून रूपेरी पडद्यावर पाहता येणार आहे. त्यांचे अद्यापही 5 चित्रपट रिलीज झालेले नाहीत. ते आता लवकरच रिलीज होणार आहेत.

मुंबई: ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर यांचं वयाच्या 75 व्या वर्षी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. त्यांनी गोव्यातील डोना पाऊलमधील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. नाना पाटेकर यांच्या अकाली एक्झिटने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. अनिल कपूर यांचा 'सुबेदार' चित्रपट नाना पाटेकर यांचा शेवटचा चित्रपट ठरला आहे. कोणतीही भूमिका असो, अगदी सहज लिलया साकारणाऱ्या नानांनी आपल्या दमदार अभिनयाच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. जरीही आज नाना आपल्यामध्ये नसले तरीही ते त्यांच्या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांमध्ये जीवंत आहेत. नानांच्या निधनानंतर त्यांचे पाच चित्रपट चाहत्यांना पाहता येणार आहेत. जे अजूनही रिलीज झालेले नाहीत.

नानांनी अनेक चित्रपटांची शूटिंग त्यांच्या निधनाच्या आधी करून ठेवली आहे. येत्या काही महिन्यांमध्ये त्यांचा ईठा, शक्ती शालिनी, द कन्फेन ऑफ मेरी, कुकु की कुंडली आणि वेदांता हे चित्रपट रिलीज होणार आहेत. यातील अनेक चित्रपटांची रिलीज डेट अद्याप जाहीर झालेली नाही. आदित्य सरपोतदार दिग्दर्शित, 'शक्ती शालिनी' चित्रपटामध्ये नाना पाटेकर यांच्यासह अनीत पड्डा आणि विशाल जेठवा हे प्रमुख भूमिकेत आहे. मेडॉक फिल्म्सच्या बॅनरखाली चित्रपट रिलीज होणार आहे. अद्याप चित्रपटाची रिलीज डेट जाहीर झालेली नाही. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित, 'ईठा' चित्रपटामध्ये नाना पाटेकर दिसणार आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध लावणी कलावंत विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असून या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत अभिनेत्री श्रद्धा कपूर आहे. हा चित्रपट 4 डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

'द कन्फेन ऑफ मेरी' या चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी केले आहे. एका हत्येवर आधारित हा चित्रपट आहे. ह्या चित्रपटाचं प्रीमियर टॉरोंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये करण्यात आलं होतं. नाना पाटेकरांसह चित्रपटामध्ये, आदिल हुसेन, आशिष विद्यार्थी, गौतम रोडे, जॉय सेनगुप्ता, नेहा महाजन, पंखुरी अवस्थी आणि मिनाक्षी मार्टिन्स हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. 'कुकू की कुंडली' चित्रपटाचं दिग्दर्शन शरण शर्मा यांनी केले असून चित्रपटामध्ये नाना पाटेकरांसह भुवन बाम आणि वामिका गब्बी प्रमुख भूमिकेमध्ये आहे. अद्याप चित्रपटाची रिलीज डेट जाहीर झालेली नाही. राजेश्वर पांडे राज दिग्दर्शित, 'वेदांता' चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत नाना पाटेकरांसह संदीपा धर, विक्रांत मेस्सी आणि मुकेश तिवारी हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटाची सुद्धा अद्याप रिलीज डेट जाहीर झालेली नाही.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा