
मुंबई : मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या (एएनसी) वरळी युनिटने लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथे मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत अंदाजे 1.22 कोटी रुपये किमतीचे 12 किलो 200 ग्रॅम चरस जप्त करण्यात आले. याप्रकरणी दोन कथित अंमली पदार्थ तस्करांना अटक करण्यात आली आहे.
http://prahaar.in/2026/11/27/fadnavis-praises-action-taken-against-illegal-hoardings-in-pune-says-take-action-even-if-a-hoarding-bears-my-name/गुप्त माहितीच्या आधारे एलटीटीमध्ये सापळा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थांची खरेदी-विक्री, पुरवठा आणि साठवणूक करणाऱ्या दोन व्यक्तींबाबत एएनसीला गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे 24 ते 25 नोव्हेंबरदरम्यान पोलिसांच्या पथकाने एलटीटी परिसरात सापळा रचला. यावेळी दोन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेण्यात आली. त्यांच्या ताब्यातून 12 किलो 200 ग्रॅम चरस आढळले. जप्त करण्यात आलेल्या चरसची किंमत अंदाजे 1.22 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात अमली पदार्थ आणि मनःप्रभावी पदार्थ प्रतिबंधक कायदा (NDPS Act), 1985 अंतर्गत कलम 8(क), 20(क), 29 आणि संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
🔶The Anti-Narcotics Cell, Worli Unit, conducted an operation at Lokmanya Tilak Terminus and arrested two individuals. A total of 12.2 kg of Charas, valued at approximately ₹12.20 crore, was seized from their possession. A case has been registered in this regard.
🔸 अंमली पदार्थ विरोधी कक्ष, वरळी युनिटच्या पथकाने लोकमान्य टिळक टर्मिनस येथे कारवाई करत दोन इसमांना अटक केली. त्यांच्याकडून तब्बल १२ किलो २०० ग्रॅम वजनाचा, अंदाजे ₹१२.२० कोटी रुपये किमतीचा 'चरस' हा अंमली पदार्थ जप्त करून सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. #MumbaiPolice4All #DrugFreeMumbai — मुंबई पोलीस Mumbai Police (@MumbaiPolice) November 27, 2026
पुढील तपासासाठी पोलीस पथक उत्तर प्रदेशात
अटक केलेल्या आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. जप्त केलेल्या चरसचा स्रोत शोधणे आणि या कथित तस्करी नेटवर्कमध्ये सहभागी असलेल्या इतर व्यक्तींची माहिती मिळवणे, हा तपासाचा मुख्य उद्देश आहे. यासाठी मुंबई पोलिसांचे एक पथक उत्तर प्रदेशात रवाना झाल्याचे वृत्त आहे.
मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, सह पोलीस आयुक्त (गुन्हे) अनिल कुंभारे आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) कृष्णकांत उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. एएनसीच्या वरळी युनिटसह मुंबई पोलीस गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.






