Sinhasth Kumbhmela: नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांना वेग, त्र्यंबकेश्वर मंदिर 2 महिने राहणार बंद!

Nashik Sinhasth Kumbhmela: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरचं शिव मंदिर काही कामानिमित्त बंद राहणार असल्याची माहिती आहे.

नाशिक: अवघ्या काही दिवसांवर नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळा येऊन ठेपला आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये विकास कामं केली जात आहे. येत्या 31 ऑक्टोबर 2026 रोजी ध्वजारोहन करून नाशिक- त्र्यंबकेश्वरमधील कुंभमेळ्याला सुरूवात होणार आहे. आता अशातच कुंभमेळ्याच्या आधी त्र्यंबकेश्वर मंदिराचे विकास कामं हाती घेण्यात येणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याआधी त्र्यंबकेश्वर मंदिरातील काम पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने 2 महिने मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नेमकी अद्याप तारीख जाहीर करण्यात आली नसून येत्या काही दिवसांमध्ये तारीख करण्यात येणार आहे.



त्र्यंबकेश्वर मंदिर नेमकं केव्हापासून बंद होणार आहे? याची माहिती मंदिर प्रशासनाने किंवा राज्य शासनाने अजूनही दिलेली नाही. पण त्र्यंबकेश्वर मंदिर पुढील 2 महिने बंद राहणार असल्याची माहिती नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हा प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, त्र्यंबकेश्वर मंदिर येत्या 15 ऑक्टोबर 2026 किंवा 16 ऑक्टोबर 2026 पासून बंद राहण्याची शक्यता नाही. लवकरच मंदिर प्रशासनाकडून आणि राज्य शासनाकडून अंतिम तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे. येत्या 31 ऑक्टोबर 2026 रोजी ध्वजारोहन करून नाशिक- त्र्यंबकेश्वरमधील कुंभमेळ्याला सुरूवात होणार आहे. त्या अनुषंगाने आता मंदिर प्रशासनाकडून हालचालींना वेग आला आहे.



दरम्यान, नाशिक सिंहस्थ महाकुंभासाठी देशासह जगभरातून करोडो भाविक येणार आहेत. त्या दृष्टीनेच जिल्हा प्रशासनाकडून आणि राज्य शासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे अमृत स्नानासाठी येणाऱ्या भाविकांसाठी शासनाकडून अनेक वेगवेगळ्या उपाययोजना आखल्या जात आहेत. भाविकांची गर्दी, वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षेचे आव्हान लक्षात घेऊन नाशिक शहर पोलिसांनी विशेष नियोजन सुरू केले आहे. मागील कुंभमेळ्यात पर्वणीच्या काळात भाविकांना मोठ्या प्रमाणावर पायपीट करावी लागली होती. त्यामुळे यंदा वाहनतळापासून स्नानाच्या घाटापर्यंतचे अंतर कमीत कमी ठेवण्यावर पोलि‍सांचा विशेष भर आहे. भाविकांच्या आणि साधु महंतांच्या दृष्टीने सर्व उपाययोजना आखल्या जात आहेत.

Comments
Add Comment

दुष्काळाबाबत महाराष्ट्र सरकारकडून केंद्रीय पथकासमोर सादरीकरण

मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्र

जाती-पातीच्या भिंती दूर करत विद्यार्थ्यांसाठी उभारणार एकत्रित हॉस्टेल; १३ ऑक्टोबरपर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे बावनकुळेंचे निर्देश

राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांबाबत

दुष्काळग्रस्त महाराष्ट्राची केंद्रीय पथकांकडून पाहणी सुरू; ११ सदस्यांचे पथक राज्यात दाखल

मुंबई : खरीप हंगामातील दुष्काळ आणि पिकांच्या नुकसानीची वस्तुनिष्ठ पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे ११

दुष्काळ जाहीर झालेल्या 265 तालुक्यांसाठी रेशन वितरणाचे निकष जाहीर

मुंबई : दुष्काळ जाहीर झालेल्या राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये आता अन्नधान्याच्या उपलब्धतेवर सरकारने लक्ष

Female Foeticide : लिंगनिदान आणि स्त्रीभ्रूणहत्या झाल्यास ‘मोका’ लागणार! हिवाळी अधिवेशनात होणार निर्णय

मुंबई : प्रसूतीपूर्व लिंगनिदान आणि स्त्रीभ्रूणहत्येच्या प्रकरणांमध्ये संघटितपणे काम करणाऱ्या व्यक्ती आणि

Nana Patekar Passes Away : दुष्काळाच्या काळोखात ‘नाम फाउंडेशन’ची मशाल पेटवणारे नाना

- हजारो कुटुंबांना आधार; शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीपलीकडे उभारली जलसंधारणाची चळवळ मुंबई : अभिनयाच्या क्षेत्रात