Friday, October 9, 2026

ब्लॉकबस्टर Drishyam 3, स्वत:चाच रेकॉर्ड मोडत अजय देवगणचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

Drishyam 3 Movie Collection: अजय देवगणच्या 'दृश्यम 3' चित्रपटाने एका आठवड्यात बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत स्वत:चेच रेकॉर्ड्स त्याने मोडले आहे.

मुंबई: अजय देवगणच्या 'दृश्यम 3'ची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा होताना दिसत आहे. 2 ऑक्टोबरला थिएटरमध्ये रिलीज झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. चित्रपटातील पात्र आणि सीन्स हे चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहेत. चित्रपटाने फक्त भारतामध्ये 248 कोटींची कमाई केली असून जगभरामध्ये चित्रपटाने 384.57 कोटींची कमाई केलेली आहे. विकेंडच्या दिवसांमध्ये आणि इतरत्र दिवशी चित्रपटाच्या कमाईमध्ये चढ- उतार पाहायला मिळाला. चित्रपटाने रिलीजच्या 7 व्या दिवशी किती कोटींचा आकडा गाठलाय,जाणून घेऊया...

'दृश्यम 3'ला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळत आहे. विकेंडच्या तुलनेत इतरत्र दिवशी चित्रपटाची कमाई फारशी होत नाहीये. तरीही सुद्धा चित्रपटाने जेमतेम 6 दिवसांत 240 कोटींचा टप्पा गाठला. सातव्या दिवशी देशभरातल्या थिएटरमध्ये 15,758 शोज होते. त्यातून 13 कोटींची कमाई झालेली आहे. त्यावरून चित्रपटाने सातव्या दिवसापर्यंत 248 कोटींची कमाई केलेली आहे. तर, जगभरामध्ये चित्रपटाने 385 कोटींच्या आसपास कमाई केलेली आहे. खुर्चीला खिळवून ठेवणारं चित्रपटाचं कथानक, क्लायमॅक्स आणि सीन्सने प्रेक्षकांच्या मनामध्ये चित्रपटाचं गारूड आहे.

'दृश्यम -३' आता जरी धुमाकूळ घातला असला तरी वीकेंड चा वेळी कलेक्शन मध्ये काही उतार चढाव बगायला मिळाले. पहिलया आणि दुसऱ्या भागामुळे लोकांचा मनात विजय साळगावकर अभिनयाने आणि चित्रपटातील थ्रिलींग सीन्स या मुळे या चित्रपटाने लोकांच्या मनात घर केली. तसाच हा चित्रपट विजय साळगावकरांचा कुटुंबाभोवती आणि सॅमचा मृत्यूभोवती फिरताना दिसत आहे. या चित्रपटातील शेवटचा क्लायमॅक्स लोकांना चक्रावून टाकणारा आहे. दरम्यान, अजय देवगणने covid-19 नंतर केलेला हा तिसरा चित्रपट खूप सुपरहिट ठरला. अजयने याआधी केलेल्या 'दृश्यम 2' आणि 'शैतान' या दोन्ही चित्रपटांना चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळाले आहे.

परदेशातील प्रेक्षकांच्या मनामध्ये चित्रपटाने घर निर्माण केलेय. परदेशात, चित्रपटाने सातव्या दिवशी 4 कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाने परदेशात तब्बल 89 कोटींची कमाई केलेली आहे. तर चित्रपटाची एकूण कमाई 385 कोटी इतकी आहे. 'दृश्यम 2' आणि 'शैतान' नंतर, 'दृश्यम ३' च्या माध्यमातून अजय देवगनने कोविडनंतर तिसरा हिट चित्रपट दिला आहे. या तीन हिट चित्रपटांमुळे, अजय कोविडच्या नंतरच्या काळात सलग तीन हिट चित्रपट देणारा एकमेव बॉलिवूड स्टार ठरला आहे. प्रत्येकी दोन हिट चित्रपट देण्याचा विक्रम शाहरुख खान आणि रणवीर सिंग यांच्या नावावर आहे. चित्रपटाविषयी सांगायचे तर, अजय देवगणने विजय साळगावर यांची भुमिका साकारून प्रेक्षकांचे मन जिंकलेय. श्रिया सरन, रजत कपूर और इशिता दत्ता या कलाकारांनी चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारलीये. तर, 'दृश्यम 3'मध्ये जयदिप अहलावत आणि प्रकाश राज हे दोन कलाकार मुख्य भूमिकेत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >