Friday, October 9, 2026

बस्स इतक्या धावा केल्या की झालं! वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात अभिषेक शर्मा रचणार इतिहास

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा टी20 सामना रांचीत होत आहे. या सामन्यात क्रीडाप्रेमींच्या नजरा या अभिषेक शर्माच्या खेळीकडे लागून आहेत. या सामन्यात अभिषेक शर्माकडे एक मोठी विक्रम करण्याची संधी आहे.

1/5 भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना 9 ऑक्टोबरला रांचच्या जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होत आहे. या सामन्यात सलामीवर अभिषेक शर्माकडे एक मोठा विक्रम रचण्याची संधी आहे. (Photo: ANI) 2/5 अभिषेक शर्माला आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 2000 धावांचा पल्ला गाठण्यासाठी अवघ्या 53 धावांची गरज आहे. सध्या अभिषेक शर्माचा फॉर्म पाहता या सामन्यात या धावा सहज गाठेल, असं दिसत आहे. जर त्याने तसं केलं तर 2000 धावांचा पल्ला जलदगतीने गाठणारा फलंदाज ठरले. यासह सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडीत काढेल. (Photo: ANI) 3/5 टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत 2000 धावांचा पल्ला गाठण्याचा विश्वविक्रम सध्या सूर्यकुमार यादवच्या नावावर आहे. सूर्यकुमार यादवने 1164 चेंडूत हा पल्ला गाठला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार एरॉन फिंचने 1283 चेंडूत हा पल्ला गाठला आहे. (Photo: ANI) 4/5 अभिषेक शर्माने आतापर्यंत खेळलेल्या सामन्यात 997 चेंडूत 1947 धावा केल्या आहे. आता त्याला फक्त 53 धावांची गरज आहे. त्याला 53 धावांचा पल्ला 166 चेंडूत पूर्ण करायचा आहे. असं केलं तर सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडेल. (Photo: ANI 5/5 अभिषेक शर्मा जबरदस्त फॉर्मात आहे. अभिषेक शर्माने टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 195.29 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. यात 135 षटकार मारले आहेत. पण पहिल्या टी20 सामन्यात मैदानात फार काळ तग धरू शकला नाही. त्याने 10 चेंडूत एक षटकार आणि 3 चौकार मारत 21 धावा केल्या होत्या. (Photo: ANI)
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >