Friday, November 27, 2026

Eknath Shinde : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; गरज पडल्यास नियम बाजूला ठेवून मदत करू - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बुलढाणा : दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकरी कुटुंबांना सरकार आणि शिवसेना मदतीसाठी उभी राहील, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिला. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे आयोजित दुष्काळग्रस्त शेतकरी संवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीचा तगादा लावणाऱ्या संस्थांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. तसेच गरज पडल्यास नियम बाजूला ठेवून शेतकऱ्यांना मदत केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शेतकरी कुटुंबाच्या घरी जाऊन जाणून घेतल्या अडचणी

मेहकर दौऱ्यादरम्यान शिंदे यांनी दामोदर इंगळे आणि कमलाबाई इंगळे यांच्या घरी भेट दिली. त्यांच्या घरातील भाकरीसोबत भोजन स्वीकारताना त्यांनी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती, मुलांचे शिक्षण आणि भविष्याबाबतच्या चिंता जाणून घेतल्या. आर्थिक अडचणींमुळे मुलांच्या शिक्षणात खंड पडू देणार नाही, त्यासाठी शिवसेना मदत करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच शेतकरी कुटुंबातील मुलींचे विवाह रखडू नयेत, यासाठी सामूहिक विवाह सोहळ्यांच्या माध्यमातून मदत करण्याचे आवाहन स्थानिक पदाधिकाऱ्यांना केले. ( Farmer Relief)

कर्जवसुलीसाठी धमकावणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश

सावकार, बँका आणि मायक्रोफायनान्स संस्थांकडून कर्जवसुलीच्या नावाखाली शेतकऱ्यांना धमकावले जाऊ नये, असे शिंदे ( Eknath Shinde) यांनी सांगितले. अशा प्रकारे त्रास देणाऱ्या संस्थांवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

यावेळी त्यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे 6 हजार रुपये आणि राज्य सरकारकडून दिले जाणारे अतिरिक्त 6 हजार रुपये, शेतकऱ्यांना 5 हजार रुपयांची आगाऊ मदत, कर्जवसुली स्थगिती, जमीन महसूल सवलत, कृषी पंपांच्या वीज बिलाबाबत दिलासा आणि परीक्षा शुल्क सवलत अशा उपाययोजनांचा उल्लेख केला.

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

दुष्काळात चारा आणि पाणीपुरवठ्यावर भर

दुष्काळी परिस्थितीत जनावरांसाठी चारा छावण्या, पाणीपुरवठा आणि चाऱ्याची उपलब्धता यावर सरकार भर देत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. चारा छावण्यांपर्यंत पोहोचू न शकणाऱ्या शेतकऱ्यांना घरपोच चारा देण्याचाही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. जलयुक्त शिवार, जलसंधारण, क्लस्टर शेती आणि कमी पाण्यात येणाऱ्या पिकांना प्रोत्साहन देऊन शेतीला पर्याय उपलब्ध करण्यावरही भर दिला जात असल्याचे ते म्हणाले. ( Drought Affected Farmer)

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असा विश्वास देत महिलांसाठीच्या विविध योजनांचाही त्यांनी उल्लेख केला. मुलींच्या उच्च शिक्षणासाठी 100 टक्के शुल्क परतावा आणि एसटी प्रवासात महिलांना 50 टक्के सवलत दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रतापराव जाधव यांचे सहा महिन्यांचे मानधन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आपल्या सहा महिन्यांच्या मानधनाची 7 लाख 51 हजार रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिली. त्यांनी ही रक्कम धनादेशाद्वारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे सुपूर्द केली.

या कार्यक्रमात विविध विकासकामांचे ऑनलाइन भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले. तसेच गरजू लाभार्थ्यांना ट्रॅक्टर, शिलाई मशीन आणि सायकलींचे वितरण करण्यात आले. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांतील पात्र लाभार्थ्यांना अनुदान व धनादेशही देण्यात आले.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, आमदार संजय गायकवाड, वसंत खंडेलवाल, किरण सरनाईक, मनोज कायंदे यांच्यासह प्रशासनातील अधिकारी आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. ( Maharashtra Government)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >