Friday, October 9, 2026

IND vs WI T20: पहिल्या षटकात षटकार मारताच अभिषेक शर्माच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड, नेमकं काय केलं जाणून घ्या

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात संजू सॅमसनचा खेळ अवघ्या 20 धावांवर आटोपला. पण या खेळीत त्याने मारलेला षटकार विशेष ठरला. कसं काय ते समजून घ्या

1/5 भारत वेस्ट इंडिज दुसरा टी20 सामना रांचीत सुरू आहे. या सामन्यात मोठी खेळी करण्यात अभिषेक शर्मा अपयशी ठरला. त्याचा खेळ फक्त 20 धावांवर आटोपला. पण त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. (Photo: ANI) 2/5 अभिषेक शर्माने पहिल्या षटकाच्या सहाव्या चेंडूवर षटकार मारला आणि विश्वविक्रम आपल्या नावावर केला. पहिल्या षटकात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम त्याने आपल्या नावावर केला. त्याने आपल्या कारकिर्दीत पहिल्या षटकात 14 षटकार मारले.(Photo: ANI) 3/5 अभिषेक शर्माने या षटकारासह पॉल स्टर्लिंगचा विश्व विक्रम मोडला. त्याने टी20 क्रिकेटमध्ये पहिल्या षटकात 13 षटकार मारण्याच विक्रम केला होता. तसेच या विक्रमाची एविन लुईस याने बरोबरी केली होती. आता संजू सॅमसन त्यांच्या पुढे निघून गेला आहे. (Photo: ANI) 4/5 अभिषेक शर्माने पहिल्या षटकात षटकार मारून विश्वविक्रम रचला. पण मोठी खेळी करण्यात त्याला अपयश आलं. कारण 20 धावा करून तंबूत परतला. (Photo: ANI) 5/5 अभिषेक शर्मा वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन्ही सामन्यात एकाच पद्धतीने बाद झाला. त्याला दोन्ही वेळेस ऑफ स्पिनरने बाहेरचा रस्ता दाखवला. रॉस्टन चेजने त्याला बाद केलं. त्यामुळे त्याची कमकुवत बाजू अधोरेखित झाल्याची क्रीडावर्तुळात चर्चा आहे. (Photo: ANI)
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >