IND vs WI: वेस्ट इंडिजने भारताला 6 गडी राखून नमवलं, सामना 10व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर गमावला

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना वेस्ट इंडिजने जिंकला आणि 1-1 अशी बरोबरी साधली. हा सामना भारताने 10 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर गमावला.

वेस्ट इंडिजने दुसऱ्या टी20 सामन्यात भारताला 6 गडी राखून मात दिली. या सामन्यात नाणेफेकीचा कौल गमवल्यानंतर भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली होती. भारताने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 5 गडी गमवून 249 धावा केल्या. तसेच विजयासाठी 250 धावांचं आव्हान दिलं होतं. विजयासाठी दिलेलं आव्हान वेस्ट इंडिजने 4 गडी गमवून 18.3 षटकात पूर्ण केलं. या विजयासाठी पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. या सामन्यात कर्णधार शाई होपचं वादळ घोंगावलं. त्याने 45 चेंडूत नाबाद 102 धावांची खेळी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. शाई होपने या खेळीत 9 षटकार आणि 6 चौकार मारले. त्याला मधल्या फळीतून शेर्फेन रदरफोर्डची साथ मिळाली. त्याने 37 चेंडूत 84 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 7 चौकार आणि 7 षटकार मारले.

भारताने दहाव्या षटकात गमावला सामना


शाई होप आणि शेर्फेन रदरफोर्ड यांची जोडी फोडण्याची संधी भारतीय संघाकडे दहाव्या षटकात आली होती. हे षटक कुलदीप यादव टाकत होता. तेव्हा रदरफोर्ड हा 38 धावांवर खेळत होता. या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रदरफोर्ड सहज बाद झाला असता. पण मयंक यादवने शॉर्ट फाइन लेगला एक अगदी सोपा झेल सोडला. त्यामुळे कुलदीप चांगलाच संतापला. त्याचे परिणाम भारतीय संघाला पराभवाच्या रुपाने भरावे लागले. कारण शाई होप आणि रदरफोर्ड जोडी टिकली आणि भारताला पराभवचं तोंड पाहावं लागलं. कारण या जोडीने चौथ्या विकेटसाठी 54 चेंडूत 120 धावांची भागीदारी केली. त्यामुळे संघाचा विजय सोपा झाला. शाई होपच्या नावावर आता भारताविरुद्ध कोणत्याही खेळाडूने केलेले संयुक्त-सर्वात जलद टी20 आंतरराष्ट्रीय शतक आहे. जेकब बेथेलनेही 2026 च्या टी20 विश्वचषकात वानखेडेवर 45 चेंडूंमध्ये हे शतक पूर्ण केले होते.


काय म्हणाला कर्णधार श्रेयस अय्यर?


कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला की, ' तुम्ही याला काही ठराविक आकडा देऊ शकत नाही, कारण जेव्हा दव पडते तेव्हा ते अवघड होऊन बसते. 249 धावांचा पाठलागसुद्धा जवळपास 2 षटके शिल्लक असतानाच पूर्ण झाला. या खेळपट्टीवर चुकीला अजिबात वाव नव्हता. जर तुम्ही अगदी थोड्या फरकाने लक्ष्य चुकवले असते, तर चेंडू थेट प्रेक्षकांमध्ये गेला असता. ते अप्रतिम खेळले, त्यांचे कौतुक करायलाच हवे. दोघेही आपापल्या जागी उत्कृष्ट खेळले. संजू, अभिषेक आणि मयंक यांच्याकडून आम्हाला अशाच कामगिरीची अपेक्षा असते. त्या भागीदारीनंतर सामन्याची गती त्यांच्या बाजूने वळली.'

गोलंदाजांनी केली निराशा


भारताकडून अक्षर पटेल सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने 3.3 षटकात 63 धावा दिल्या. त्याला एकही विकेट घेता आली नाही. तर कुलदीप यादवने 4 षटकात 53 धावा देत एक विकेट घेतली. तर मयंक यादवने 3 षटकात 36 धावा देत तीन विकेट काढल्या. अर्शदीप सिंगने 4 षटकात 45, शिवम दुबेने 2 षटकात 30, आणि नमन धीरने 2 षटकात 25 धावा दिल्या.
Comments
Add Comment

विंडीजला 76 धावांचा फटका, पूरनची चूक पडली महागात! संजू सॅमसनने केलं संधीचं सोनं

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा टी20 सामना रांचीत सुरू आहे. या सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल गमावला आणि

IND vs WI, 2nd T20: नाणेफेकीचा कौल विंडिजच्या बाजूने, भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी, श्रेयस अय्यर म्हणाला...

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला आहे.

वनडे मालिकेत ऑस्ट्रेलिया अ संघाने भारताला पाजलं पराभवाचं पाणी, दुसऱ्या सामन्यात 70 धावांनी पराभव, काय चुकलं जाणून घ्या

भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना पार पडला आणि

विनोद कांबळीला बघा...तीन वर्षानंतर बोलू...! माजी क्रिकेटपटू कपिल देव वैभव सूर्यवंशीबाबत काय म्हणाले?

वैभव सूर्यवंशी भारतीय क्रिकेटमधील मोठं नाव.. कमी वयात आणि अल्पावधीतच त्याने नावलौकीक मिळवला. आयपीएल स्पर्धा ते

IND vs NZ: भारत न्यूझीलंड टी20 मालिकेसाठी संघात अचानक बदल, हे दोन खेळाडू दुखापतीमुळे आऊट

भारत न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. यासाठी न्यूझीलंड आणि भारतीय संघ आधीच जाहीर

Hong Kong Sixes: 30 ऑक्टोबरला भारत पाकिस्तान हायव्होल्टेज सामना, पीसीबीकडून संघाची घोषणा

हाँगकाँग सिक्सेस 2026 स्पर्धेचं बिगुल वाजलं आहे. या स्पर्धेला 31 ऑक्टोबरपासून सुरुवात होणआर आहे. ही स्पर्धा तीन