
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला आहे. त्यामुळे मालिकेत भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे. आता दुसऱ्या टी20 सामन्यात विजय मिळवून मालिकेत मजबूत आघाडी घेण्याचा टीम इंडियाचा मानस आहे. पण दुसऱ्या टी20 सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल गमावला. यामुळे भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली आहे. खरं तर या मैदानात धावांचा पाठलाग करणं सोपं जातं. त्यामुळे भारतीय संघापुढे मोठी धावसंख्या उभारण्याचं आव्हान असणार आहे. नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर वाटेला प्रथम फलंदाजी आल्यानंतर श्रेयस अय्यरने आपल्या भावना व्यक्त केल्या.
काय म्हणाला श्रेयस अय्यर?
श्रेयस अय्यर म्हणाला की, 'खरं तर, आम्हीही प्रथम गोलंदाजी करण्याचाच विचार केला असता. पण साहजिकच, तुम्हाला शक्य तितक्या लवकर परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागते. ही एक सुखद संध्याकाळ आहे आणि थोडे दवही आहे, त्यामुळे आशा आहे की दुसऱ्या डावातही परिस्थिती अशीच राहील. आम्ही खेळत असलेल्या 40 षटकांमध्ये आमचा दर्जा कायम ठेवण्याबद्दल नुकतीच चर्चा केली आहे. आम्ही आमच्या दृष्टिकोनावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करत आहोत, याची खात्री करू इच्छितो. मी म्हटल्याप्रमाणे, प्रत्येक वेळी मैदानावर उतरताना आम्हाला आमचा दर्जा उंचावत राहायचा आहे. आम्ही स्वतःला सतत अधिक चांगले होण्यासाठी आव्हान देऊ इच्छितो आणि अधिक सामने जिंकू याची खात्री करू इच्छितो. आम्ही त्याच संघासोबत खेळणार आहोत.
वैभव सूर्यवंशी भारतीय क्रिकेटमधील मोठं नाव.. कमी वयात आणि अल्पावधीतच त्याने नावलौकीक मिळवला. आयपीएल स्पर्धा ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या ...
काय म्हणाला वेस्ट इंडिजचा कर्णधार?
शाई होप म्हणाला की, आम्हाला धावांचा पाठलाग करणे सोयीचे वाटते. पण पुन्हा, आम्हाला भारतातील परिस्थितीचा विचार करावा लागेल. खेळपट्टी आधीच थोडी ओली आहे, त्यामुळे जसजशी संध्याकाळ होईल तसतशी ती आणखी खराब होईल. आम्ही फक्त गोलंदाजीने त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि मग धावांचा पाठलाग करू. पहिल्या सामन्यात झालेल्या चुकांमधून शिकण्याचा हा प्रयत्न आहे. विशेषतः भारतासारख्या दर्जेदार संघाविरुद्ध, तुम्ही त्यांना फारशा संधी देऊ शकत नाही. आम्हाला तो सामना लवकर विसरून आज अधिक जोमाने परत यावे लागेल. एक बदल. फोर्ड बाहेर आहे आणि मोती संघात आहे. या दौऱ्यावर कदाचित प्रत्येकाला संधी मिळेल.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
भारत (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, नमन धीर, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, मयंक यादव.
वेस्ट इंडीज (प्लेइंग इलेव्हन): शाई होप (विकेटकीपर/कर्णधार), कामिल पूरन, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, शेरफेन रदरफोर्ड, रोस्टन चेस, रोमॅरियो शेफर्ड, गुडाकेश मोती, शमर स्प्रिंगर, अकेल होसेन, शामर जोसेफ





