Friday, October 9, 2026

IND vs NZ: भारत न्यूझीलंड टी20 मालिकेसाठी संघात अचानक बदल, हे दोन खेळाडू दुखापतीमुळे आऊट

IND vs NZ T20I Series: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका 22 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघ जाहीर करण्यात आले आहे. पण आता दोन स्टार खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने संघात बदल करावा लागला आहे.

भारत न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. यासाठी न्यूझीलंड आणि भारतीय संघ आधीच जाहीर करण्यात आला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धची टी20 मालिका संपल्यानंतर भारतीय संघ लगेचच न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळे या मालिकेबाबत प्रचंड उत्सुकता आहे. कारण तिथल्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी भारतीय संघाला फार कमी वेळ मिळणार आहे. दुसरीकडे, ही मालिका सुरू होण्यापूर्वीच न्यूझीलंड संघाला दोन धक्के बसले आहेत. दुखापतीमुळे दोन दिग्गज खेळाडू या स्पर्धेला मुकणार आहेत. न्यूझीलंडचा मधल्या फळीतील आक्रमक फलंदाज मार्क चॅपमॅन आणि वेगवान गोलंदाज जॅक फाउल्क्स जखमी झाला आहे. त्यामुळे संपूर्ण टी20 मालिकेला मुकले आहेत. मागच्या महिन्यात युरोपियन टी20 लीग स्पर्धेत चॅपमॅनच्या हॅमस्ट्रिंगला दुखापत झाली होती. त्यामुळे टी20 मालिकेतून आऊट झाला आहे. पण भारताविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी फिट होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, वेगवान गोलंदाज जॅक फाउल्क्स कँटरबरी पुरूष संघाच्या सराव शिबिरात दुखापतग्रस्त झाला. त्याच्या उजव्या हिप फ्लेक्सरमध्ये दुखापत झाली होती. त्या दुखापतीतून जॅक अजूनही सावरलेला नाी. त्याच्या दुखापतीवर वैद्यकीय टीम लक्ष ठेवून आहे. न्यूझीलंडच्या या दोन खेळाडूंच्या बदली खेळाडूंची घोषणाही करण्यात आली आहे. अष्टपैलू जोश क्लार्कसन आणि वेगवान गोलंदाज ब्लेयर टिकनर यांनी दुखापतग्रस्त खेळाडूंची जागा घेतली आहे. आता या दोन्ही खेळाडूंना मिळालेल्या संधीचं सोनं करण्याची संधी आहे.
न्यूझीलंडचा अपडेट टी20 संघ: मिचेल सँटनर (कर्णधार), फिन एलन, मायकल ब्रेसवेल, जोश क्लार्कसन, डेवोन कॉनवे, जॅकब डफी, लॉकी फर्ग्यूसन, मॅट हेनरी, बेवोन जॅकब्स, काइल जॅमीसन, एडम मिल्ने, डेरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, टिम सीफर्ट, नाथन स्मिथ, ब्लेयर टिकनर. भारताचा टी20 संघ : श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सैमसन (विकेटकीपर), वैभव सूर्यवंशी, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा (उपकर्णधार), अक्षर पटेल, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, नमन धीर, प्रिंस यादव, मयंक यादव, अर्शदीप सिंह, भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >