IND vs NZ, 2nd Test: पहिल्या दिवसाचा खेळ संपला, न्यूझीलंडच्या 5 बाद 246 धावा
भारत न्यूझीलंड यांच्यात दुसरा कसोटी सामना क्राईस्टचर्च येथील हॅगले ओव्हल येथे सुरू आहे. या सामन्याचा पहिला दिवस पार पडला असून न्यूझीलंडने 5 बाद 246 धावा केल्या आहेत. पहिल्या दिवशी काय घडलं? ते जाणून घेऊयात...
November 27, 2026 01:13 PM
IND vs NZ, 2nd Test: पहिल्या दिवसाचा खेळ संपला, न्यूझीलंडच्या 5 बाद 246 धावा (Photo: BCCI Twitter)
भारत न्यूझीलंड यांच्यात दुसरा कसोटी सामना काईस्टचर्च येथे सुरू आहे. नाणेफेकीचा कौल टीम इंडियाने जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार शुभमन गिलने सांगितलं की, 'प्रथम गोलंदाजी करणार आहोत. खेळपट्टी बऱ्यापैकी चांगली दिसतेय, थोडा ओलावा आहे. मी मागच्या सामन्यात म्हटल्याप्रमाणे, आशा आहे की पहिल्या आणि दुसऱ्या सत्रात आपण काही धावा काढू शकू.तयारीबद्दल खरं सांगायचं तर, तयारी बरीच चांगली आहे. त्यांच्यापैकी काहींनी काल नेटमध्ये गोलंदाजी केली. ते खूप ताजेतवाने आहेत.' भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय काही अंशी योग्यच ठरला असं म्हणावं लागेल. कारण आघाडीचे 5 फलंदाज झपट बाद करण्यात यश आलं. पण या सामन्यातही टॉम ब्लंडल आणि ग्लेन फिलिप्स हे दोघं भारतासाठी डोकेदुखी ठरले. पहिल्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडने 5 गडी गमवून 246 धावा केल्या आहेत. आता दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात पाच गडी झटपट बाद करण्याचं आव्हान टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर असणार आहे.
न्यूझीलंडचा डाव
न्यूझीलंडकडून टॉम लॅथम आणि डेवॉन कॉनवे ही जोडी मैदानात उतरली होती. या जोडीने पहिल्या विकेटसाठी 77 धावांची भागीदारी केली. डेवॉन कॉनवे 31 धावा करून बाद झाला. त्यानंतर टॉम लॅथमने डाव सावरण्याचा प्रय्तन केला. त्याने 128 चेंडूत 6 चौकार मारत 59 धावा केल्या. त्यानंतर धडाधड तीन विकेट पडल्या. संघाच्या 110 धावा असताना हेनरी निकोल्स, रचिन रवींद्र आणि डेरिल मिचेल बाद झाले. त्यामुळे न्यूझीलंडचा संघ अडचणीत आला होता. मात्र टॉम ब्लंडल आणि ग्लेन फिलिप्स यांनी डाव सावरला. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 122 चेंडूत 62 धावांची भागीदारी केली. भारताकडून आकाश दीपने 2, गुरनूर ब्रार आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
Stumps on Day 1!
#TeamIndia with the wicket of Daryl Mitchell in the final session
Action resumes tomorrow ⏳
Scorecard ▶️ https://t.co/6iCwvH4Zap
#NZvIND https://t.co/6ONWCreg3R
— BCCI (@BCCI) November 27, 2026