BJP Women's Front: भाजप महिला मोर्चाचा काँग्रेस कार्यालयावर मोर्चा

मुंबई : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) ११ विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांवरून भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाने शनिवारी मुंबईत काँग्रेसविरोधात आंदोलन केले. भाजपच्या प्रदेश कार्यालयापासून काँग्रेस कार्यालयापर्यंत धडक मोर्चा काढत काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने या प्रकरणावर भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा वाघ यांनी केली. आंदोलनादरम्यान पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याची माहितीही वाघ यांनी दिली.


काँग्रेस खासदार डॉ. बिमोल अकोइजम यांच्यावरील विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषणाचे आरोप आणि त्यासंदर्भातील कारवाईचा मुद्दा उपस्थित करत वाघ यांनी राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यावर टीका केली. संबंधित खासदाराला चौकशीनंतर सेवेतून बडतर्फ करण्यात आल्याचा दावा करत, या प्रकरणावर काँग्रेसचे वरिष्ठ नेतृत्व मौन का बाळगून आहे, असा सवाल त्यांनी केला. ‘लडकी हूँ, लड सकती हूँ’ अशी घोषणा देणाऱ्या प्रियंका गांधी यांनी या प्रकरणातील पीडित विद्यार्थिनींसाठी भूमिका घ्यावी, अशी मागणीही वाघ यांनी केली. राहुल गांधी यांच्या ‘मोहब्बत की दुकान’ या घोषणेचा संदर्भ देत, महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर काँग्रेसने उत्तर द्यावे, असे आव्हान त्यांनी दिले.



आंदोलनाच्या माध्यमातून भाजप महिला मोर्चाने दोन प्रमुख मागण्या मांडल्या. संबंधित खासदाराचा तातडीने राजीनामा घेऊन त्यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करावी, तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या प्रकरणात भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) तरतुदींनुसार तातडीने प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करून कठोर कारवाई करण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली. भाजपच्या मुंबई महिला मोर्चाच्या अध्यक्ष योजना ठोकळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असले, तरी अन्यायाविरोधातील लढा सुरूच राहील, असा इशाराही चित्रा वाघ यांनी दिला.

Comments
Add Comment

Kalyan Traffic: नवरात्रीनिमित्त अवजड वाहनांना कल्याणमध्ये निर्बंध, 7 मार्गांवर असणार प्रवेशबंदी; पर्यायी मार्ग कोणते?

ठाणे: कल्याण शहरामध्ये नवरात्रोत्सव आणि दसऱ्यानिमित्त वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात येणार आहेत. दुर्गाडी

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी पाण्याचा प्रत्येक थेंब अडवणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने, नियोजनबद्ध आणि गतिमान

नवरात्रीत ‘जिहादी’ दिसले तर खबरदार! मंत्री नितेश राणे यांचा इशारा

मुंबई: नवरात्रोत्सवातील गरबा आणि दांडियाच्या कार्यक्रमांत खोटी ओळख सांगून प्रवेश करण्याचा किंवा हिंदू

Deepika Padukone : मानसिक आरोग्यासाठी पीव्ही सिंधू आणि दीपिका पादुकोण एकत्र! ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूचे कपडे फक्त ८५० रुपयांत विक्रीसाठी उपलब्ध

मुंबई : जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि भारताची स्टार

मुंबईतील झगमगाटावर निर्बंध? प्रकाश प्रदूषण रोखण्यासाठी उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश

मुंबई हे शहर दिवसरात्र गजबजलेलं असतं. रात्रीच्यावेळी मुंबईत खास करून दक्षिण मुंबई तसेच वांद्रे परिसरात झगमगते

Navratri 2026 : नवरात्रीच्या पहिल्या दिवशी माता शैलपुत्रीला दाखवा ‘या’ खास पांढऱ्याशुभ्र बर्फीचा नैवेद्य!

घरच्या घरी अवघ्या १५ मिनिटांत बनवा हलवाईसारखी मावा बर्फी! पवित्र अशा नवरात्रोत्सवाला लवकरच सुरुवात होत आहे. या